Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’मध्ये आणखी एक एलिमिनेशन! सलमान खान कोणाला दाखवणार घराबाहेरचा रस्ता?

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’मधून अमन गांधीचा पत्ता कटणार असल्याची चर्चा आहे. आगामी ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान कोणाला घराबाहेरचा रस्ता दाखवणार? जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 18, 2026 | 02:00 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Bigg Boss 20:  सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस २०’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरातील स्पर्धकांमधील वाद, भांडणं आणि नवनवीन घडामोडींमुळे हा शो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. नुकत्याच झालेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने काही स्पर्धकांना त्यांच्या खेळावरून चांगलंच सुनावलं, तर काहींचं कौतुकही केलं. आता आगामी एपिसोडमध्ये आणखी एका स्पर्धकाचा प्रवास संपणार असल्याची चर्चा आहे. या आठवड्यात अमन गांधी घराबाहेर होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अमन गांधी होणार घराबाहेर?

‘बिग बॉस २०’मधील घडामोडींचे अपडेट्स देणाऱ्या ‘बीबी टॉक’ या फॅन पेजनुसार, या आठवड्यात शोमध्ये केवळ एकच एलिमिनेशन होणार आहे. आगामी ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांपैकी एका सदस्याला घराबाहेरचा रस्ता दाखवणार असल्याची चर्चा आहे. या एलिमिनेशनसाठी अमन गांधीचं नाव समोर आलं आहे.

अमन गांधीचा खेळ अपेक्षेइतका प्रभावी ठरत नसल्याची चर्चा असून, त्याला कमी मतं मिळाल्याचंही वृत्त आहे. त्यामुळे आगामी एपिसोडमध्ये त्याचा प्रवास संपणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. मात्र, एलिमिनेशनबाबत अधिकृत पुष्टी झालेली नसल्याने या वृत्ताकडे संभाव्य घडामोड म्हणून पाहणं महत्त्वाचं आहे.

लाईफलाईनमुळे अमनचं टेन्शन वाढलं?

समोर आलेल्या वृत्तानुसार, मागील आठवड्यात अमन गांधी नॉमिनेट झाला होता. त्याला कमी मतं मिळाल्यामुळे त्याची एक लाईफलाईन गेल्याचं सांगितलं जात आहे. आता त्याच्याकडे केवळ एकच लाईफलाईन शिल्लक असल्याची चर्चा आहे. आगामी ‘वीकेंड का वार’मध्ये ही लाईफलाईनही गमवावी लागल्यास अमनला शोमधून बाहेर पडावं लागू शकतं. त्यामुळे या आठवड्यात त्याचं भवितव्य काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Sidhu moose Wala: सिद्धू मूसेवालाच्या अडीच वर्षांच्या भावाला कोणापासून धोका? तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

नकुल धुलचं पुन्हा घरात येण्याचं स्वप्न अपूर्ण?

गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस २०’च्या घरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता. वाइल्ड कार्ड स्पर्धक नकुल धुल आणि गुल्लू यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर हिंसक वर्तनामुळे नकुल धुलला शोमधून बाहेर काढण्यात आल्याचं वृत्त आहे.

नकुलच्या चाहत्यांना तो ‘वीकेंड का वार’मध्ये पुन्हा घरात प्रवेश करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ‘बीबी टॉक’च्या रिपोर्टनुसार, नकुल धुलचा शोमध्ये पुन्हा प्रवेश होण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाबाबतच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

आता आगामी ‘वीकेंड का वार’मध्ये अमन गांधी खरंच घराबाहेर जाणार का आणि नकुल धुलच्या पुनरागमनाबाबत सलमान खान काय सांगणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Jailer 2 Box Office Collection: ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ३ दिवसांत कमाई ३०० कोटींच्या पार, रजनीकांत यांचा पुन्हा जलवा

Web Title: Bigg boss 20 aman gandhi eviction weekend ka vaar ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Bigg Boss 20
  • entertainment
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Kon Honaar Crorepati: ‘हम आपके है कौन’च्या आठवणींना उजाळा; माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांची रंगणार मैफल
1

Kon Honaar Crorepati: ‘हम आपके है कौन’च्या आठवणींना उजाळा; माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांची रंगणार मैफल

Nayi Naveli Box Office Collection: यामी गौतमच्या ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी कमाईत मोठी वाढ
2

Nayi Naveli Box Office Collection: यामी गौतमच्या ‘नई नवेली’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी कमाईत मोठी वाढ

Belraj Kalarickal: मनोरंजनविश्वावर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शक बेलराज कलारिकलचं निधन, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
3

Belraj Kalarickal: मनोरंजनविश्वावर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शक बेलराज कलारिकलचं निधन, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Jailer 2 Box Office Collection: ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ३ दिवसांत कमाई ३०० कोटींच्या पार, रजनीकांत यांचा पुन्हा जलवा
4

Jailer 2 Box Office Collection: ‘जेलर २’चा जगभरात डंका! अवघ्या ३ दिवसांत कमाई ३०० कोटींच्या पार, रजनीकांत यांचा पुन्हा जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.