
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या सीझनमध्येही टीव्ही कलाकार, सोशल मीडिया स्टार्स, इन्फ्लुएन्सर्स आणि इतर क्षेत्रातील चर्चेत असलेले चेहरे सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, ‘बिग बॉस’शी संबंधित अपडेट्स शेअर करणाऱ्या ‘BBTak’ या सोशल मीडिया पेजने १८ स्पर्धकांची यादी शेअर केली आहे.
समोर आलेल्या यादीनुसार, माही विज, आम्रपाली दुबे, रिती तिवारी, अमन गांधी, उदिती सिंग, काझी तौकीर, मेरी कोम, अरिशफा खान, कुशल तंवर उर्फ गुल्लू, ईशा रिखी, आसिफ खान, रोहेद खान, फैसल खान आणि कनिका मान यांची नावे समाविष्ट आहेत. याशिवाय आणखी काही नावे या यादीत असल्याचे सांगितले जात आहे.
‘बिग बॉस २०’मध्ये सहभागी होणाऱ्या संभाव्य स्पर्धकांमध्ये माही विज, अर्शिफा खान, कनिका मान, ईशा रिखी, काझी तौकीर आणि कुशल तंवर उर्फ गुल्लू यांच्या नावांना यापूर्वीही मोठी चर्चा मिळाली आहे. India Today नेही यापैकी काही नावांना शोसाठी कन्फर्म असल्याचे रिपोर्ट केले होते.
मेरी कोम, आम्रपाली दुबे आणि अरिशफा खान यांसारख्या नावांमुळेही चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. मात्र, संपूर्ण अधिकृत स्पर्धक यादी शोच्या निर्मात्यांकडून जाहीर होईपर्यंत सोशल मीडिया आणि रिपोर्ट्समध्ये समोर आलेल्या नावांकडे संभाव्य यादी म्हणून पाहणे योग्य ठरेल.
सलमान खान पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहे. ‘बिग बॉस २०’चा प्रीमियर ६ सप्टेंबर रोजी होणार असून, शो आधी जिओ हॉटस्टारवर रात्री ९ वाजता आणि त्यानंतर कलर्स टीव्हीवर रात्री १०.३० वाजता प्रसारित होणार असल्याचे रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आले आहे.
आता या चर्चेत असलेल्या नावांपैकी नेमके कोणते चेहरे ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार, हे ग्रँड प्रीमियरनंतर स्पष्ट होणार आहे.