
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Vanita Kharat: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात तिच्या वेट लॉस जर्नीमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वनिताने तिची वेट लॉस जर्नी सांगितली. तिने या काळात नेमकं काय काय केले जाणून घेऊया.
वनिताने नुकताच राजश्री मराठीला मुलाखती दिली. यावेळी तिने तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितले. ती म्हणाली, ”मी जीम लावली असती तर मला तेच तेच करून कंटाळा आला असता. कारण याआधी मी बऱ्याचदा जीम लावली आहे आणि वर्कआऊटचा कंटाळा देखील केला आहे. पण, आता मी जे करतेय त्यामध्ये मला खूप मज्जा येतेय. कारण -मला यातून रोज वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. मी आदी कधीच लाठीकाठी शिकले नाही, मुदगल कधीच फिरवलं नाही, धावले नव्हते. मला जिना चढताना देखील खूप त्रास व्हायटा. मला वाटायचे की मी कधीच धावू शकणार नाही. पण, आम्ही हळूहळू सुरूवात केली आणि आता मला इतकं भारी वाटतंय की मी १० किलोमीटर धावू शकते, मी सलग १० किलोमीटर धावत नाही, पण मी प्रयत्न करते.”
पुढे तिने तिच्या फिटनेस जर्नीला कशी सुरूवात केली याबद्दल सांगितले, वनिता म्हणाली, ”मला मी जशी दिसाचे ते आवडयाचंच. पण, मला बसताना त्रास व्हायचा, माझे पाय सुजायचे, खूप वेळ उभं राहिले की माझी कंबरदुखायची. तेव्हा मी विचार केला की आता आपण तिशीत आहोत. आता जर हे असं होत असेल, तर पुढे कठीण आहे. मग थोडंसं काहीतरी करून बघुया. फेब्रुवारीमध्ये डाएटने सुरूवात केली. या वर्षी माझ्या आयुष्यात दोन खूप भारी माणसं आली.डॉक्टर जयेश जाधव आणि ओंकार पवार.
वनिताने पुढे सांगितले,”मी प्रचंड आळशी व्यक्ती होते. मला रात्रीच्या पार्ट्या करायाला खूप मजा यायची. मी उगवणारा सुर्य कित्येक वर्षात पाहिला नव्हता. पण ओंकार सरांनी मला शिस्त लावली. ते मला साडे पाच वाजता शिकवण्यासाठी येतात. आता मला साडेपाट वाजता उठून वर्कआऊट करण्याची सवय झाली आहे.”
आतापर्यंत किती वजन कमी केले आहेस? याबद्दल वनिता म्हणाली,” मी आतापर्यंत २९ किलो वजन कमी केले आहे, अजून मला ९ किलो वजन कमी करायचे आहे.”
पुढे डाएटबद्दल वनिता म्हणाली, ”माझं डॉक्टरांनी लिहून दिलेले डाएट असतं. ते १५-१५ दिवसात बदलतात. ” काय, का खाणं सोडलं आहेस? यावर वनिता म्हणाली, “मला गोड आधीही आवडायचे नाही, पण मला डार्त चॉकलेट केक खूप आवडतो. पण, मी ते सोडलं आहे. मी भात खात नाही. मी संध्याकाळी शक्यतो खात नाही, जमलं तर सूप पिते. ज्वारीची भाकरी, चवळीची भाजी, मसूरची भाजी, लाल माठ अशा भाज्या खाते, फळं खाते.”
वनिताला वडापाव प्रचंड आवडतो.पण तिने तो गेले आठ महिने खाल्ला नाही. पण अजून ४-५ किलो वजन कमी केल्यानंतर मी वडापाव खाईन असं तिने सांगितले आहे.