Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

करिअर की प्रेम? आयुष्यातील ‘या’ कठीण समतोलाबाबत सिद्धार्थ मेननने व्यक्त केल्या भावना

‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ मालिकेतील रिषीची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ मेननने करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल, प्रेमाविषयीचे विचार आणि मालिकेचा खास संदेश याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 25, 2026 | 03:30 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

झी5 वरील ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रेम, करिअर आणि नात्यांमधील गुंतागुंत दाखवणारी ही कथा तरुणाईला जवळची वाटत आहे. मालिकेत रिषीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ मेननने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्य, करिअर आणि प्रेमाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.

रिषीप्रमाणेच स्वतःलाही करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल साधावा लागतो का, असा प्रश्न विचारण्यात आला असता सिद्धार्थ म्हणाला, “मी ज्या क्षेत्रात काम करतो ते खूप मागणी करणारे आहे. काम करताना मी पूर्णपणे त्यात गुंतलेला असतो आणि मोकळा वेळ मिळाला की कुटुंबीयांसोबत राहण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा कामामुळे वाढदिवस, सण आणि कुटुंबातील महत्त्वाचे क्षण चुकले आहेत. मात्र काही वेळा प्रिय व्यक्तींना प्राधान्य देत कामालाही नकार दिला आहे.”

मुलाखतीदरम्यान रिषीने अनन्याला स्क्रिप्टबाहेर एखादा उशिरा रात्रीचा मेसेज पाठवला असता तर तो काय असता? असा मजेशीर प्रश्नही त्याला विचारण्यात आला. यावर तो हसत म्हणाला, “चल, आपण दोघं नोकऱ्या सोडून कुठेतरी दूर निघून जाऊया. दिवसाच्या शेवटी फक्त आपण दोघंच महत्त्वाचे आहोत. उद्याच करूया हे.”

‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’बद्दल बोलताना सिद्धार्थने सांगितले की, ही प्रेमकथा पारंपरिक प्रेमकथांचे सर्व घटक जपत असली तरी ती आधुनिक आणि ताजी वाटते. रिषी आणि अनन्याचा प्रवास अत्यंत वास्तववादी असून प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्याशी त्याची सहज सांगड घालता येईल.

हास्याचा फुल ऑन डोस! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा धमाकेदार टीझर आऊट, अंकुश, कुशल, अभिजीत अन् संतोषची भन्नाट गँगमस्ती

प्रेम आणि रोमॅन्सबद्दल मालिकेतून कोणता संदेश दिला जातो, याबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला, “रोमॅन्स साजरा केला पाहिजे. प्रेम ही आयुष्यातील सर्वात सुंदर भावना आहे. प्रेम माणसाला घडवतं, बदलतं आणि वाढायला शिकवतं. त्यामुळे प्रेमासाठी मन खुलं ठेवा, प्रत्येक अनुभव स्वीकारा आणि या प्रवासाचा आनंद घ्या, हाच या मालिकेचा मुख्य संदेश आहे.”

Ketan Agarwal Murder Case: ‘एखाद्याचा जीव घेणं सोपं..’, केतन हत्याकांडावर Hina Khanचा संताप, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

रिषी आणि अनन्याच्या नात्यातील भावनिक चढ-उतार, करिअरची स्वप्नं आणि प्रेमासाठी केलेला संघर्ष यामुळे ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे.

Web Title: Career or love siddharth menon opens up about the tough balancing act in life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actor
  • zee5

संबंधित बातम्या

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
1

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?
2

Onkar Bhojane: ‘ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल’; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा
3

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात
4

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.