Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBFC New Board: तब्बल ७ वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाची नवी कार्यकारिणी जाहीर; बॉलिवूडसह ‘या’ मराठी चेहऱ्यांना मिळालं स्थान!

CBFC New Board: भारत सरकारने CBFC अर्थात सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना केली. पंकज त्रिपाठी, प्रीती झिंटा, सुनील शेट्टी, पल्लवी जोशींसह १८ सदस्यांचा नव्या बोर्डात समावेश आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 17, 2026 | 09:55 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

CBFC New Board: भारत सरकारने बुधवारी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात CBFC (सेन्सॉर बोर्ड) ची पुनर्रचना केली. नव्या कार्यकारिणीत एकूण १८ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी, सुनील शेट्टी, मनोज जोशी, अभिनेत्री प्रीती झिंटा, रूपाली गांगुली आणि पल्लवी जोशी यांच्यासह सिनेमा, संगीत, साहित्य आणि कला क्षेत्रातील विविध मान्यवरांना या बोर्डात स्थान देण्यात आलं आहे.

कोणकोणत्या सदस्यांचा समावेश?

पुनर्गठित CBFCमध्ये विनोद अनुपम, मनोज जोशी, अभिषेक जैन, रिकी केज, प्रियदर्शन, सुनील शेट्टी, हंसराज हंस, सुप्रिया यार्लगड्डा, यतींद्र मिश्रा, रूपाली गांगुली, प्रीती झिंटा, नीला माधब पांडा, पंकज त्रिपाठी, प्रोसेंजीत चटर्जी, पल्लवी जोशी, निशिगंधा वाड, वामन केंद्रे आणि रमेश पतांगे यांचा समावेश करण्यात आला आहे.

नव्या यादीत मनोरंजन क्षेत्रासोबतच संगीत, साहित्य, कला आणि इतर क्षेत्रांतील व्यक्तींनाही प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांचा अनुभव असलेल्या सदस्यांचा समावेश या नव्या बोर्डात पाहायला मिळतो.

CBFCच्या सदस्यांची भूमिका काय?

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचं प्रमुख काम चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याशी संबंधित आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याचं प्रमाणन करण्याची जबाबदारी CBFCची असते. बोर्डाच्या निर्णयांचा चित्रपटांच्या प्रदर्शनावर थेट परिणाम होऊ शकतो.

नव्या कार्यकारिणीच्या स्थापनेनंतर या १८ सदस्यांची चित्रपट प्रमाणनाशी संबंधित विविध प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका असेल.

Flight Turbulence: फ्लाइटमध्ये नेमकं काय घडलं? थरथर कापू लागली ‘अभिनेत्री’; देवाचा जप करत म्हणाली,…

किती वर्षांचा असेल कार्यकाळ?

CBFCच्या पुनर्रचनेनंतर मुख्यतः बोर्डाच्या सदस्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. मंडळाची कायदेशीर भूमिका आणि कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.

CBFC Cinematograph Act आणि 2024 च्या Film Certification Rules अंतर्गत काम करतं. नव्या सदस्यांचा कार्यकाळ कमाल तीन वर्षांचा असेल.

दरम्यान, पंकज त्रिपाठी, प्रीती झिंटा, सुनील शेट्टी, पल्लवी जोशी यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश झाल्याने नव्या CBFC बोर्डाची रचना चर्चेत आली आहे.

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’, गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Web Title: Cbfc new board pankaj tripathi preity zinta 18 members

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Pankaj Tripathi
  • Preity Zinta

संबंधित बातम्या

Kantara SIIMA Awards: ‘कांतारा’ने रचला इतिहास; सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तब्बल 9 पुरस्कारांवर कोरले नाव
1

Kantara SIIMA Awards: ‘कांतारा’ने रचला इतिहास; सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तब्बल 9 पुरस्कारांवर कोरले नाव

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’,  गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
2

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’, गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव
3

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव

Flight Turbulence: फ्लाइटमध्ये नेमकं काय घडलं? थरथर कापू लागली ‘अभिनेत्री’; देवाचा जप करत म्हणाली,…
4

Flight Turbulence: फ्लाइटमध्ये नेमकं काय घडलं? थरथर कापू लागली ‘अभिनेत्री’; देवाचा जप करत म्हणाली,…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.