Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘प्राइम फोकस स्टुडिओज’चे उद्घाटन; जागतिक मनोरंजन उद्योगासाठी मुंबई सज्ज

Devendra Fadnavis : मुंबईतील फिल्म सिटीमध्ये नमित मल्होत्रा यांच्या Prime Focus Studios Phase 1 चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 'रामायणम्'साठी ऑस्कर भारतात आणण्याचे स्वप्न व्यक्त.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 07, 2026 | 08:18 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Devendra Fadnavis : मनोरंजन क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड ठरत, निर्माता नमित मल्होत्रा यांच्या ‘प्राइम फोकस स्टुडिओज फेज 1’ या अत्याधुनिक स्टुडिओ कॅम्पसचे उद्घाटन 6 ऑगस्टला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईतील फिल्म सिटीमध्ये उभारलेल्या या जागतिक दर्जाच्या कॅम्पसमध्ये क्रिएटिव्ह आणि टेक्नॉलॉजी टीम्सना एकाच छताखाली आणण्यात आले असून, मीडिया आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन त्याची उभारणी करण्यात आली आहे.

‘प्राइम वन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मुख्यालयाच्या उद्घाटनावेळी नमित मल्होत्रा यांनी आपल्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आगामी ‘रामायणम्’ चित्रपटासाठी भारतात अकादमी पुरस्कार (ऑस्कर) आणण्याचे आपले स्वप्न आणि व्हिजनही उपस्थितांसमोर मांडले.

‘प्राइम वन’मध्ये 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांचे जागतिक मुख्यालय

याआधी WAVES Summit दरम्यान प्राइम फोकस आणि महाराष्ट्र सरकार यांनी मुंबईत जागतिक दर्जाची एंटरटेनमेंट इकोसिस्टम उभारण्याची घोषणा केली होती. त्याच घोषणेची प्रत्यक्ष पूर्तता म्हणून हा स्टुडिओ कॅम्पस उभारण्यात आला आहे. कंपनीचे जागतिक मुख्यालय असलेल्या ‘प्राइम वन’मध्ये प्राइम फोकसचे 1,000 हून अधिक कर्मचारी कार्यरत असतील, तर कंपनीच्या जागतिक नेटवर्कमध्ये 10,000 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत.

Aishwarya Harishankar: १३ लाख फॉलोअर्स, अभिनय-निर्मितीतही दमदार कामगिरी; कोण आहे ‘माझ्या सोन्या’ फेम ऐश्वर्या हरिशंकर?

DNEG ला मिळाले 8 ऑस्कर; नमित मल्होत्रा यांची जागतिक ओळख

नमित मल्होत्रा यांच्या DNEG या व्हिज्युअल इफेक्ट्स कंपनीने जागतिक स्तरावर मोठी ओळख निर्माण केली आहे. सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी DNEG ला आतापर्यंत तब्बल 8 अकादमी पुरस्कार (ऑस्कर) मिळाले आहेत. ‘Dune: Part Two’, ‘Dune’ आणि ‘Tenet’ यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमधील व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी कंपनीचे विशेष कौतुक झाले आहे.

‘रामायणम्’साठी ऑस्कर भारतात आणण्याचे नमित मल्होत्रा यांचे स्वप्न

दरम्यान, DNEG आणि यश यांच्या Monster Mind Creations यांच्या सहनिर्मितीत साकारत असलेला ‘रामायणम्’ हा भारतातील सर्वात भव्य चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर देशभरात मोठी चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे, जागतिक प्रेक्षकांपर्यंत भारतीय महाकाव्याची कथा पोहोचवण्यासाठी चित्रपटाची इंग्रजी लिप-सिंक्ड आवृत्तीही प्रदर्शित करण्यात आली आहे.

Yellamma First Look: डीएसपीच्या अभिनय पदार्पणावर अनीस बज्मी फिदा; ‘येल्लम्मा’च्या फर्स्ट लुकचं केलं भरभरून कौतुक

Web Title: Devendra fadnavis inaugurates prime focus studios phase 1 mumbai marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 08:18 AM

Topics:  

  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’च्या म्युझिक लॉन्चसाठी रॉयल ऑपेरा हाऊसचीच निवड; शर्वरीने सांगितलं खास कारण
1

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’च्या म्युझिक लॉन्चसाठी रॉयल ऑपेरा हाऊसचीच निवड; शर्वरीने सांगितलं खास कारण

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता
2

Maitreya Teaser: प्रेम की मैत्री? ‘मैत्रेया’च्या टीझरने वाढवली उत्सुकता; पाहायला मिळणार नात्यांचा वेगळा गुंता

Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या आयुष्यातील हे किस्से माहीत आहेत का? ‘सिद्धिमा’पासून ‘करीना’ नावापर्यंतची रंजक कहाणी
3

Kareena Kapoor Birthday: करीना कपूरच्या आयुष्यातील हे किस्से माहीत आहेत का? ‘सिद्धिमा’पासून ‘करीना’ नावापर्यंतची रंजक कहाणी

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री
4

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.