Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhasal Movie Teaser Out : धम्मा फेस्टिव्हलमध्ये ‘ढसाळ’चा हुंकार; ललित प्रभाकरचा दमदार लूक समोर

Dhasal Movie Teaser Out : नागपूर येथे आयोजित धम्मा फेस्टिव्हलमध्ये ‘ढसाळ’ या नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चरित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता ललित प्रभाकर नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेत दिसणार असून, टीझरमधून त्यांच्या दमदार लूकची झलक समोर आली आहे. वरुणा मदनलाल राणा आणि संजय पांडेय यांनी चित्रपटाची निर्मिती केली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 21, 2026 | 08:33 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • ललित प्रभाकरने साकारलेल्या ढसाळांच्या भूमिकेची झलक  
  • पद्मश्री नामदेव ढसाळ हे केवळ कवी नव्हते, तर एक विद्रोही विचारवंत   
  • दाक्षिणात्य संगीतकार इलैयाराजा यांचे संगीत  
Dhasal Movie Teaser Out:   पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ एका कवीचा जीवनप्रवास नाही, तर अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या विचारांची क्रांती! हेच वादळी व्यक्तिमत्त्व मोठ्या पडद्यावर उलगडणाऱ्या ‘ढसाळ’ या बहुप्रतीक्षित चरित्रपटाचा टीझर नागपूर येथे आयोजिलेल्या धम्मा फेस्टिव्हलच्या भव्य व्यासपीठावर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमधून अभिनेता ललित प्रभाकर याने साकारलेल्या नामदेव ढसाळ यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रभावी झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

बंडखोर विचार, परखड लेखणी आणि सामाजिक वास्तवाला भिडणारी कविता यांच्या जोरावर मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या नामदेव ढसाळ यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर कसा उलगडणार, याची उत्सुकता या टीझरमुळे अधिकच वाढली आहे.

ललित प्रभाकरने साकारलेल्या ढसाळांच्या भूमिकेची झलक

संजय पांडेय आणि दि बायोस्कोप फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती वरुणा मदनलाल राणा, संजय पांडे यांनी केली असून लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. नामदेव ढसाळ यांच्या जीवनातील संघर्ष, त्यांच्या विचारांमधील विद्रोह आणि समाजव्यवस्थेला प्रश्न विचारण्याची त्यांची निर्भीड वृत्ती यांचा वेध या चित्रपटातून घेतला जाणार आहे. ललित प्रभाकरने साकारलेल्या ढसाळांच्या भूमिकेची झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली. त्याने या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाला दिलेले रूप आणि त्यामागील मेहनत यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

दिग्दर्शिका वरुणा मदनलाल राणा म्हणाल्या, “नामदेव ढसाळ यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे म्हणजे एका माणसाचा प्रवास जाणून घेणे एवढेच नाही, तर त्यांच्या विचारांमागची अस्वस्थता, त्यांचा विद्रोह आणि समाजातील अन्यायाविरुद्ध उभे राहाण्याची त्यांची ताकद समजून घेणे आहे. या चित्रपटासाठी आम्ही त्यांच्या आयुष्याचा आणि साहित्याचा अनेक वर्षे अभ्यास केला. त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या विचारांची धार पडद्यावर प्रामाणिकपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. धम्मा फेस्टिव्हलसारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणे आमच्यासाठी विशेष आनंदाची बाब होती.’’

Ranbir Kapoor Ramayana: रणबीर कपूरचा ‘रामायणम्’ चित्रपट ‘या’ राज्यात टॅक्स फ्री; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पद्मश्री नामदेव ढसाळ हे केवळ कवी नव्हते, तर एक विद्रोही विचारवंत

निर्माते संजय पांडेय म्हणाले, “पद्मश्री नामदेव ढसाळ हे केवळ कवी नव्हते, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे एक मोठे विद्रोही विचारवंत होते. त्यांच्या शब्दांमध्ये आगीची धग होती आणि त्यांच्या विचारांनी अनेक पिढ्यांना दिशा दिली. अशा व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास चित्रपटातून मांडणे ही आमच्यासाठी अभिमानाची आणि तितकीच मोठी जबाबदारी आहे. ‘ढसाळ’चा टीझर धम्मा फेस्टिव्हलच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर करता आला, याचा विशेष आनंद झाला. नामदेव ढसाळ यांच्या विचारांशी नव्या पिढीचा संवाद घडावा, त्यांचा संघर्ष आणि त्यांचे योगदान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे, हीच या चित्रपटामागची भावना आहे. या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली, याचा आम्हाला आनंद आहे.”

दाक्षिणात्य संगीतकार इलैयाराजा यांचे संगीत

या चित्रपटाला ज्येष्ठ दाक्षिणात्य संगीतकार इलैयाराजा यांचे संगीत लाभले असून, इर्शाद कामील आणि गुरु ठाकूर यांनी गीतलेखन केले आहे. तर या चित्रपटातील गाण्यांना आदर्श शिंदे, दिव्य कुमार, रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, उर्मिला धनगर आणि विभावरी आपटे यांचा आवाज लाभला आहे. अभय सोडये, प्रताप गंगावणे, अश्वजीत कांबळे यांच्या संवादलेखनाने चित्रपटाला प्रभावी धार मिळाली आहे, तर ललित प्रभाकरचा नामदेव ढसाळांच्या रूपातील लूक रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी साकारला आहे. या चित्रपटाचे कला दिग्दर्शन एकनाथ कदम यांनी केले असून डीओपी मिलिंद जोग आहेत.

नामदेव ढसाळ यांच्या शब्दांची ताकद, त्यांच्या संघर्षाची धग आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बंडखोरपणा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक आहेत.

Jay Jay Swami Samarth: स्वामींच्या अनुपस्थितीत स्वामीस्थानात अवधूतची अनपेक्षित एंट्री! रणजीतला थेट आव्हान देणारा हा बालक कोण आहे?

Web Title: Dhasal movie teaser lalit prabhakar namdeo dhasal sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • Akhil Bharatiya Marathi Sahitya
  • Ananya Marathi movie
  • Entertainment marathi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.