Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saurabh Gokhale : अभिनेत्याने केली सरकारची पाठराखण? “मी हिंदुविरोधी गोष्टींना…” सौरभ गोखलेचे ‘ते’ विधान आले चर्चेत

दिल्लीतील CJPच्या 'चलो संसद' आंदोलनाला अनेक मराठी कलाकारांनी पाठिंबा दिला असताना अभिनेता सौरभ गोखलेने मात्र यावर वेगळी भूमिका मांडली आहे. त्याच्या मते, पेपरफुटीसारख्या प्रकरणांमध्ये केवळ सरकारलाच दोष देणे योग्य नसून संबंधित आरोपींवर कारवाईही करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 21, 2026 | 08:12 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

दिल्लीत देशभरातील लाखो कॉक्रोच जमले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीच्या रस्त्यांवर आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन पुकारले आहे. या दरम्यान, जमलेल्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठी-काठींचा हल्ला केल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे संपूर्ण देशभरातून दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा निषेध करण्यात आला. मराठी मनोरंजनसृष्टीतूनही अनेक कलावंतांनी या संपूर्ण प्रकरणावर त्यांचे मत मांडले. त्यातील बहुतांश कलाकारांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला. परंतु, सुप्रसिद्ध अभिनेता सौरभ गोखले याने या संपूर्ण प्रकरणावर वेगळे मत दिल्याचे समोर आले आहे.

Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये मोठा ट्विस्ट! शांभवीविरोधात छवी-अनिकेतची युती; मालिकेत रंगणार निर्णायक संघर्ष

एका मुलाखतीत बोलताना कोणतीही घटना घडली की त्यासाठी केवळ सरकारलाच जबाबदार धरणे योग्य नसल्याचे त्याने सांगितले. पेपरफुटी प्रकरणातील संबंधित आरोपींवर कारवाई झाली असून प्रशासनाने आवश्यक पावले उचलल्याचेही त्याने नमूद केले. मुलाखतीत सांगताना सौरभ आधी या आंदोलनाची सकारात्मक बाजू समजावून सांगतो. तो म्हणतो की, “विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी, ही मागणी निश्चितच योग्य आहे. आंदोलनामागील उद्देश समजून घेण्याची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक बदल घडले पाहिजेत.”

परंतु सौरभने या आंदोलनात घडलेल्या आणि त्याला न पटणाऱ्या बाजूंवरही भाष्य केले आहे. आंदोलनादरम्यान काही घोषणांमुळे आणि धार्मिक मुद्दे समोर आल्याने मूळ विषय भरकटल्याची भावना त्याने व्यक्त केली. हिंदू धर्म आणि प्रभू श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये झाल्याचा दावा करत, अशा प्रकारच्या गोष्टींना आपण कधीही पाठिंबा देणार नसल्याचे त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले.

त्याच्या म्हणण्यानुसार, शैक्षणिक प्रश्नांवर आंदोलन करणे योग्य असले तरी त्यामध्ये इतर वादग्रस्त विषय मिसळले गेले, तर आंदोलनाचा मूळ हेतू कमकुवत होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या घडामोडींमुळे त्या आंदोलनाशी जोडले जाणे किंवा त्याला पाठिंबा देण्याची इच्छा कमी होते, असेही त्याने स्पष्ट केले.

आधी ‘अल्याड पल्याड’ मग ‘घबाडकुंड’; विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा!

सौरभ गोखलेच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्याच्या मताचे समर्थन केले असून, तर काहींनी त्याच्याशी असहमती दर्शवली आहे. त्यामुळे त्याची भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. सौरभच्या या मतामुळे त्याच्या चाहत्यांनी विविध मतांचा वर्षाव केला आहे. बहुतांश चाहत्यांनी असहमती दाखवली असून काही चाहत्यांनी त्याच्या विचारांची प्रशंसा केली आहे. परंतु, सौरभसहित अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा धरून ठेवला आहे आणि आपले मत मांडले आहे.

Web Title: Did saurabh gokhale support the government on the issue of the students cjp protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 08:12 PM

Topics:  

  • CJP
  • CJP Protest
  • Marathi celebrities

संबंधित बातम्या

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप
1

कॉकरोच जनता पार्टीत मोठी फूट; विरोधात उभी राहणार ‘CJP डेमोक्रॅटिक’, केजरीवालांवर केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.