Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य

Disha Salian Case मध्ये CBI FIRनंतर सूरज पंचोलीने मौन सोडलं आहे. दिशा सालियान आणि आदित्य ठाकरेंशी संबंध नसल्याचा दावा करत तपासात सहकार्याची तयारी दर्शवली.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 15, 2026 | 11:08 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीची प्रतिक्रिया
  • आदित्य ठाकरेंबाबत सूरज पंचोली काय म्हणाला?
  • दिशा सालियानच्या वडिलांकडून गंभीर आरोप
Disha Salian Case: दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाला सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा वेगळं वळण मिळालं आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी काही व्यक्तींविरोधात गंभीर आरोप करत त्यांच्याकडे कथित पुरावे असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात सूरज पंचोली, आदित्य ठाकरे, डीनो मोरिया, सचिन वाझे, परमबीर सिंह आणि रिया चक्रवर्ती यांच्या नावांची चर्चा होत आहे. दरम्यान, अभिनेता सूरज पंचोलीने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर करत स्वतःवरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

‘दिशा सालियानला कधीच भेटलो नाही’

सूरज पंचोलीने आपल्या पोस्टमध्ये दिशा सालियानसोबत कोणत्याही प्रकारचा संबंध असल्याचा स्पष्टपणे इन्कार केला आहे. माध्यमांमधील अनेक रिपोर्ट्स आणि वक्तव्यांमध्ये आपलं नाव दिशा यांच्या मृत्यूशी संबंधित वादात जोडलं जात असल्याचं त्याने म्हटलं.

सूरजने दावा केला की, तो आपल्या आयुष्यात दिशा सालियानला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कधीही भेटलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाशी आपला संबंध जोडला जाणं चुकीचं आणि त्रासदायक असल्याचं त्याने म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंबाबत सूरज पंचोली काय म्हणाला?

सूरज पंचोलीने आपल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरेंचाही उल्लेख केला. त्याने म्हटलं की, आपण आजपर्यंत आदित्य ठाकरेंनाही कधी भेटलेलो नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय आपलं नाव अशा वादात ओढलं जाणं अन्यायकारक असल्याचं त्याने म्हटलं.

अशा प्रकरणात आपलं नाव जोडण्यापूर्वी संबंधित तथ्यांची पडताळणी करण्यात यावी, अशी विनंतीही सूरजने केली आहे.

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या

‘इतकी वर्षं शांत होतो, पण…’

आपण इतका काळ या प्रकरणावर बोललो नाही, कारण प्रत्येक बातमी किंवा रिपोर्टवर प्रतिक्रिया देण्याची इच्छा नव्हती, असं सूरजने सांगितलं. मात्र, एखादी गोष्ट वारंवार समोर येत राहिली तर एका टप्प्यावर व्यक्त होणं गरजेचं ठरतं, असं त्याने म्हटलं.

सूरजच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात सीबीआय आणि पोलिसांकडून त्याची चौकशी यापूर्वीच झाली आहे आणि साधारण चार-पाच वर्षांपूर्वी त्याचा जबाब नोंदवण्यात आला होता. भविष्यात कोणत्याही तपास यंत्रणेला पुन्हा त्याची चौकशी करायची असल्यास पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

‘माझ्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही’

आपल्याकडे लपवण्यासारखं काहीही नसल्याचं सूरज पंचोलीने म्हटलं आहे. कोणत्याही तपास यंत्रणेला अतिरिक्त माहिती हवी असल्यास आपण चौकशीसाठी उपलब्ध असल्याचं त्याने सांगितलं.

तसंच, दिशा सालियान यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थितीची निष्पक्ष आणि सखोल सीबीआय चौकशी व्हावी, याला आपला पाठिंबा असल्याचंही त्याने म्हटलं.

सूरजने पुढे सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या अपप्रचाराबाबतही भाष्य केलं. केवळ एखादी हेडलाईन म्हणजे पुरावा नाही, टीव्हीवरील चर्चा म्हणजे तथ्य नाही आणि सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्ट खरी मानू नये, असं त्याने म्हटलं.

Genelia Deshmukh Ganeshotsav: सासू-सुनेचं गोड बॉण्डिंग, खास फोटोशूट; जिनिलीयाने दाखवली देशमुखांच्या गणेशोत्सवाची खास झलक

दिशा सालियानच्या वडिलांकडून गंभीर आरोप

दरम्यान, दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, दिशा यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्याकडे कथितरित्या काही महत्त्वाचे पुरावे होते. या आरोपांमध्ये ड्रग्स आणि बाल तस्करीशी संबंधित कथित माहितीचा उल्लेख करण्यात आला आहे.

वकिलांनी दिशा यांच्या मोबाईलबाबतही दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ९ ते १७ जून २०२० या कालावधीत दिशा यांचा फोन काही व्यक्तींच्या ताब्यात होता. या काळात फोनमधील डेटा तपासण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मात्र, या सर्व आरोपांची चौकशी आणि सत्यता तपासणे हे तपास यंत्रणांच्या अखत्यारीतील विषय आहेत. दरम्यान, सूरज पंचोलीने आपल्या पोस्टच्या शेवटी कायद्यावर आणि तपास यंत्रणांवर विश्वास असल्याचं सांगत “सत्य अखेर समोर येईल” असा विश्वास व्यक्त केला आहे.

Web Title: Disha salian case suraj pancholi statement aditya thackeray cbi fir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Disha Salian case
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत
1

Samantha Ruth Prabhu: हळदीच्या रंगात न्हाऊन निघाली समंथा; थाटात पार पडलं पारंपरिक डोहाळे जेवण, राज निदिमोरूसोबतचा खास क्षण चर्चेत

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या
2

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या

Aditya Thackeray News: दिशा सालियान प्रकरणावरून चर्चेत आलेले आदित्य ठाकरे किती शिकलेत? जाणून घ्या शिक्षण अन् एकूण संपत्ती
3

Aditya Thackeray News: दिशा सालियान प्रकरणावरून चर्चेत आलेले आदित्य ठाकरे किती शिकलेत? जाणून घ्या शिक्षण अन् एकूण संपत्ती

Disha Salian Case : ‘आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता कुठे जायचे?’; दिशा सालियन प्रकरणावर रामदास कदमांचा गंभीर आरोप
4

Disha Salian Case : ‘आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता कुठे जायचे?’; दिशा सालियन प्रकरणावर रामदास कदमांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.