Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2 तास 15 मिनिटांत मेंदूचा खेळ खल्लास! ‘दृश्यम’पेक्षा अधिक सस्पेन्स, ‘महाराजा’पेक्षा दुप्पट थ्रिल; हा चित्रपट पाहून उडेल तुमची झोप

थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल तर ‘इलेव्हन’ हा चित्रपट चुकवू नका. सीरियल किलर, धक्कादायक ट्विस्ट आणि अंगावर काटा आणणारा क्लायमॅक्स यामुळे हा चित्रपट ‘दृश्यम’ आणि ‘महाराजा’लाही टक्कर देत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 07, 2026 | 12:19 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

सध्या प्रेक्षकांमध्ये थ्रिलर आणि सस्पेन्स चित्रपटांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कथानकात रहस्य, अनपेक्षित ट्विस्ट आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा थरार असेल, तरच प्रेक्षक त्या चित्रपटाला पसंती देतात. अशाच एका चित्रपटाने सध्या ओटीटी विश्वात धुमाकूळ घातला असून, त्याच्या सस्पेन्समुळे तो ‘दृश्यम’ आणि ‘महाराजा’सारख्या गाजलेल्या थ्रिलर चित्रपटांशी तुलना केला जात आहे.

या चित्रपटाचे नाव आहे ‘इलेव्हन’ (Eleven). २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या थ्रिलरने चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. सध्या हा चित्रपट जिओहॉटस्टारवर ट्रेंड करत असून, थरारपटांच्या चाहत्यांमध्ये त्याची मोठी चर्चा रंगली आहे.

चित्रपटाची कथा एका भयानक सीरियल किलरभोवती फिरते. हा खुनी आपल्या बळींना गोळ्या घालून त्यांची हत्या करतो आणि त्यानंतर ओळख पटू नये म्हणून मृतदेहांवर पेट्रोल ओतून त्यांना जाळून टाकतो. शहरात एकामागून एक सहा खून झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसीपी रणजित कुमार यांना बोलावले जाते. मात्र एका भीषण कार अपघातात ते कोमात जातात.

Shilpa Shinde: ‘माझ्यासोबत जे घडलं त्याचं काय?’ सेक्शुअल हॅरेसमेंट प्रकरणावर शिल्पा शिंदेची प्रतिक्रिया; हिना खानवरही साधला निशाणा

यानंतर या प्रकरणाची जबाबदारी एसीपी अरविंदन यांच्यावर सोपवली जाते. अत्यंत हुशारीने आणि बारकाईने तपास करत अरविंदन त्या सीरियल किलरचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. तपास जसजसा पुढे सरकतो, तसतसे कथानकात अनेक धक्कादायक वळणे येतात. प्रत्येक ट्विस्ट प्रेक्षकांना चकित करून सोडतो.

चित्रपटाचा क्लायमॅक्स हा त्याचा सर्वात मोठा प्लस पॉइंट मानला जातो. शेवटचा खुलासा इतका धक्कादायक आहे की प्रेक्षक अक्षरशः अवाक् होतात. त्यामुळेच अनेक प्रेक्षक या चित्रपटाची तुलना ‘दृश्यम’ आणि ‘महाराजा’सारख्या लोकप्रिय थ्रिलर चित्रपटांशी करत आहेत.

Vikram Gokhale Last Movie: दिवंगत विक्रम गोखले यांची अखेरची पडद्यावरील झलक; ‘बेवारस – सत्य एका वळणावरचं’चा टीजर लाँच

नवीन चंद्रने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत रेया, अभिरामी, दिलेपन आणि किरीटी दमाराजू यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. IMDb वर या चित्रपटाला ७.४ रेटिंग मिळाले असून, थरारपट आवडणाऱ्यांसाठी ‘इलेव्हन’ हा नक्कीच एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Web Title: Eleven movie review suspense thriller better than drishyam maharaja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • best horror movies
  • Entertainemnt News
  • horror story

संबंधित बातम्या

Mrunmayee Deshpande: स्पर्धकांच्या आत्मविश्वासासाठी मृण्मयी काय करते? ‘सारेगमप’च्या सूत्रसंचालनामागचा सांगितला खास दृष्टिकोन
1

Mrunmayee Deshpande: स्पर्धकांच्या आत्मविश्वासासाठी मृण्मयी काय करते? ‘सारेगमप’च्या सूत्रसंचालनामागचा सांगितला खास दृष्टिकोन

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज
2

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ४०व्या वर्षी होणार आई! लग्नाच्या २ वर्षांनी घरात हलणार पाळणा; पोस्ट करत दिली गुडन्यूज

Drishyam 3: अजय देवगणने घेतलं तब्बल येवढं कोटी मानधन? ‘दृश्यम ३’मधील कलाकारांची फी ऐकून बसेल धक्का!
3

Drishyam 3: अजय देवगणने घेतलं तब्बल येवढं कोटी मानधन? ‘दृश्यम ३’मधील कलाकारांची फी ऐकून बसेल धक्का!

kiara advani: ‘टॉक्सिक’नंतर कियारा अडवाणीला मिळणार आणखी मोठी संधी? करीना कपूरच्या १० वर्षे जुन्या सिनेमाच्या सीक्वलमध्ये झळकणार?
4

kiara advani: ‘टॉक्सिक’नंतर कियारा अडवाणीला मिळणार आणखी मोठी संधी? करीना कपूरच्या १० वर्षे जुन्या सिनेमाच्या सीक्वलमध्ये झळकणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.