Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elnaaz Norouzi: हॉलिवूडमध्ये एलनाझ नोरौझीची दमदार एंट्री; ‘द फिक्स’मधील पहिल्याच मुख्य भूमिकेचं अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक

Elnaaz Norouzi: ‘द फिक्स’ चित्रपटातील झाराच्या भूमिकेसाठी एलनाझ नोरौझीचं अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक होत आहे. हॉलिवूडमधील तिच्या पहिल्या मुख्य भूमिकेची चर्चा.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 23, 2026 | 03:00 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Elnaaz Norouzi:  ‘सेक्रेड गेम्स’मधून जागतिक स्तरावर ओळख मिळवलेली अभिनेत्री एलनाझ नोरौझी सध्या तिच्या हॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत आहे. ‘द फिक्स’ या हॉलिवूड चित्रपटात एलनाझ पहिल्यांदाच महिला मुख्य भूमिकेत दिसत आहे. झॅकरी लेव्ही आणि लियाम नीसन यांच्या प्रमुख भूमिका असलेला आणि गाय मोशे यांनी दिग्दर्शित केलेला हा अॅक्शन थ्रिलर सध्या अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

विशेष म्हणजे, एलनाझच्या अभिनयाचं अमेरिकन चित्रपट समीक्षकांकडून कौतुक होत आहे. त्यामुळे तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.

‘द फिक्स’मध्ये एलनाझ साकारणार झाराची भूमिका

‘द फिक्स’मध्ये एलनाझने झारा ही व्यक्तिरेखा साकारली आहे. कथा पुढे गेल्यानंतर झाराची एन्ट्री होते. मात्र, ती लवकरच टकरच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग बनते आणि कथानक पुढे नेण्यात तिची भूमिका महत्त्वाची ठरते.

चित्रपटाच्या कथेत टकरला एका मोहिमेमुळे तेहरानला जावं लागतं. यावेळी झाराला त्याची पत्नी असल्याचं भासवण्यासाठी नियुक्त केलं जातं. इराणी-अमेरिकन महिलेची ही भूमिका एलनाझसाठी विशेष आहे, कारण तिचा जन्म इराणमध्ये झाला आहे.

अमेरिकन समीक्षकांनी केलं एलनाझच्या अभिनयाचं कौतुक

‘द हॉलीवूड रिपोर्टर’मधील आपल्या परीक्षणात ज्येष्ठ चित्रपट समीक्षक फ्रँक शेक यांनी एलनाझच्या अभिनयाचा विशेष उल्लेख केला आहे. त्यांनी तिच्या अभिनयाचं कौतुक करत तो “खूप चांगला” असल्याचं म्हटलं आहे.

याशिवाय काही परीक्षणांमध्ये एलनाझ आणि झॅकरी लेव्ही यांच्यातील केमिस्ट्रीचंही कौतुक करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या पुरुषप्रधान जगात झाराची स्वतंत्र भूमिका आणि तिची उपस्थितीही काही समीक्षकांनी लक्षात घेतली आहे.

महत्त्वाचं म्हणजे, एलनाझचं कौतुक केवळ एका हॉलिवूड चित्रपटाचा भाग झाल्याबद्दल होत नाही, तर तिच्या अभिनयाचीही समीक्षक दखल घेत आहेत.

इराण ते भारत आणि आता हॉलिवूडपर्यंतचा प्रवास

एलनाझ नोरौझीचा प्रवासही तितकाच वेगळा आहे. तिचा जन्म तेहरानमध्ये झाला आणि तिचं बालपण जर्मनीत गेलं. त्यानंतर तिने भारतात अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली. ‘सेक्रेड गेम्स’मुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने भारतासोबतच आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्येही काम केलं.

आता ‘द फिक्स’मधील झाराची भूमिका तिच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. विशेष म्हणजे, इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर घडणाऱ्या हॉलिवूड थ्रिलरमध्ये इराणी-अमेरिकन महिलेची भूमिका साकारण्यामुळे या भूमिकेशी तिचं वैयक्तिक नातंही जोडलं जातं.

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज

ऑक्टोबरमध्ये भारतात होणार रिलीज

‘द फिक्स’ सध्या अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस हा चित्रपट भारतातही चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

त्यामुळे भारतीय प्रेक्षकांना एलनाझ नोरौझीची हॉलिवूडमधील पहिली महिला मुख्य भूमिका मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. अमेरिकन समीक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर आता भारतात या चित्रपटाला आणि एलनाझच्या भूमिकेला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज

Web Title: Elnaaz norouzi the fix hollywood movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hollywood

संबंधित बातम्या

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज
1

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज
2

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज

Sayonee Serial: आठ वर्षांनंतर रश्मी देसाईचं टीव्हीवर पुनरागमन, जान्हवी सोनी-गौतम सिंह विगची अनोखी प्रेमकहाणी
3

Sayonee Serial: आठ वर्षांनंतर रश्मी देसाईचं टीव्हीवर पुनरागमन, जान्हवी सोनी-गौतम सिंह विगची अनोखी प्रेमकहाणी

Govinda: कोमल राणीसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचला गोविंदा; नेटकऱ्यांना खटकली ‘ही’ गोष्ट
4

Govinda: कोमल राणीसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचला गोविंदा; नेटकऱ्यांना खटकली ‘ही’ गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.