जामनगर : बॉलिवूडचे दिग्गज व लोकप्रिय दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. जामनगर न्यायालयाने संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. चेक बाऊंस केल्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन वर्षांच्या शिक्षेसह चेकच्या दुप्पट रक्कम जमा करण्याचे आदेश राजकुमार संतोषी यांना दिले आहेत. राजकुमार संतोषी यांनी ‘घायल’ आणि ‘घातक’ सारख्या अनेक यशस्वी सिनेमांचे दिग्दर्शन केले. संतोषी यांनी जामनगर येथील व्यवसायिक अशोकलाल यांच्याकडून 1 कोटी रुपये घेतले होते. मात्र ते परतच केले नाहीत. यानंतर अशोकलाल राजकुमार संतोषी यांच्याविरोधात न्यायालयात गेले होते. याच प्रकरणात आता न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे.
ही घटना 2015 साली घडलेली आहे. 2019 मध्ये राजकुमार संतोषी याप्रकरणात न्यायालयात हजर झाले होते. अशोकलाल यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, राजकुमार संतोषी आणि अशोकलाल हे चांगले मित्र आहेत. 2015 मध्ये संतोषी यांनी अशोकलाल यांच्याकडून 1 कोटी रुपये उधार घेतले होते. ही रक्कम परत करताना राजकुमार संतोषी यांनी अशोकलाल 10 लाखांचे 10 चेक दिले. जे 2016 मध्ये बाऊंस झाले. यानंतर अशोकलाल यांनी संतोषी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही. त्यानंतर अशोकलाल यांनी जामनगर न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी न्यायालयात 17 वेळा सुनावणी पार पडली मात्र राजकुमार संतोषी न्यायालयात हजर राहिले नाहत. 18 व्या सुनावणीवेळी राजकुमार संतोषी न्यायालयात हजर झाले. बाऊंस झालेल्या प्रत्येक चेकसाठी संतोषी यांना 15 हजार द्यावे लागतील, असा आदेश न्यायालयाने दिला. त्याचबरोबर दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचे चित्रपट
बॉलीवुडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले. ‘घायल’, ‘घातक’, अंदाज अपना अपना, गांधी गोडसे – एक युद्ध यांसारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्याचबरोबर ‘खाकी’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘दामिनी’ अशा अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे. याशिवाय ‘पुकार’, ‘लज्जा’, ‘दिल है तुम्हारा’ आणि ‘अंदाज या सिनेमांचे त्यांनी लेखन केले आहे.






