फोटो सौजन्य - Social Media
सागरचे घराबाहेर जाणे त्याच्या चाहत्यांसाठी फार मोठा धक्का आहे. परंतु, महाराष्ट्राचा कौल हेच सांगत होता. सागरचा बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वातील प्रवास आज थांबला आहे. घराबाहेर होताना घरातील अनेक सदस्य भावुक दिसून आले. सागर कारंडे खेळाच्या उत्तरार्धात टोळीच्या सोबत दिसून येत होते. त्यामुळे सागरला निरोप देताना टोळीतील सदस्य फार भावुक झाले. अनुश्रीच्या डोळ्यांचा पाझर फुटला तर विशालने अश्रू ढाळले. परंतु, मन जरी दाटलेले असले तरी सागरच्या चेहऱ्यावर निघताना समाधानाचे हसू होते आणि घरातल्या सदस्यांसाठी कृतज्ञता आणि आभार होते.
रितेशचे ते प्रश्न? आणि गेम पालटला!
Eviction पूर्वी मंचावर विशाल कोटियन आणि सागर कारंडे उभे होते. त्यावेळी रितेशने घरातील सदस्यांचा कौल कुणाकडे? हे पाहण्यासाठी त्यांना प्रश्न केला की, “काय वाटतं? कोण असेल Safe” तेव्हा घरातील बहुतेक सदस्यांना वाटले की यंदा विशाल कोटियन घराबाहेर जाईल. गेल्या आठवड्यात राकेशसोबत झालेल्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचा कौल विशालच्या बाजूने नसेल असे घरातील बहुतेक सदस्यांना वाटत होते पण जेव्हा Eviction ची वेळ आली तेव्हा सागर कारंडे घराबाहेर पडले. यावेळी महाराष्ट्राचा कौल विशालकडेच होता. घरातील सदस्यांना एक आश्चर्याचा धक्का बसला.






