Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gaurav Khanna: सगळ्यांची स्वप्नं पूर्ण करताना स्वतःचं स्वप्न विसरला; गौरव खन्नाच्या नव्या मालिकेचा भावूक प्रोमो

Gaurav Khanna: आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त गौरव खन्नाने पुरुषांच्या मनातील भावना मांडल्या. ‘दिल की बेवफाइयाँ’ मालिकेत गौरव खन्ना आणि श्रद्धा आर्या पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 20, 2026 | 09:30 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Gaurav Khanna:घरात कोणतीही अडचण आली की अनेक पुरुषांकडून एकच उत्तर ऐकायला मिळतं, ते म्हणजे, “मी सांभाळून घेईन.” कुटुंबाच्या आनंदासाठी सतत धडपडणाऱ्या अशाच पुरुषांच्या मनातील भावना अभिनेता गौरव खन्नाने मांडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त गौरवने एका खास व्हिडीओच्या माध्यमातून पुरुषांना स्वतःच्या स्वप्नांबद्दल विचार करण्यास भाग पाडणारा भावूक संदेश दिला आहे.

स्टार प्लसच्या आगामी ‘दिल की बेवफाइयाँ’ या मालिकेच्या खास व्हिडीओमध्ये गौरव खन्ना त्याच्या ‘मानव’ या पात्राच्या माध्यमातून संवाद साधताना दिसत आहे. चाळीशी पार केलेल्या मानवला घरातील प्रत्येक सदस्याच्या आवडीनिवडी आणि इच्छा माहीत आहेत. मात्र, स्वतःच्या बकेट लिस्टचा विषय निघतो, तेव्हा त्याला शेवटचं स्वतःच्या मनासारखं काय केलं होतं, हेही आठवावं लागतं.

कुटुंबाच्या स्वप्नांसाठी स्वतःच्या इच्छा ठेवल्या बाजूला

मानव एकाच दिवसात अनेक भूमिका पार पाडत असतो. मुलगा म्हणून आई-वडिलांची औषधे आणण्यापासून ते पती म्हणून पत्नीच्या करिअरला साथ देण्यापर्यंत, तर मुलांच्या अ‍ॅडमिशनपासून कुटुंबाच्या सुट्ट्यांचे नियोजन करण्यापर्यंत प्रत्येक जबाबदारी तो पार पाडतो. आपल्या माणसांसाठी हे सर्व करताना त्याला आनंदही मिळतो. त्याच्या म्हणण्यानुसार, “त्यांचे स्वप्न पूर्ण करणे, हेच आपले स्वप्न बनून जाते.”

मात्र, या सगळ्या धावपळीत स्वतःच्या इच्छांचं काय झालं, याचा विचार करण्यासाठी त्याच्याकडे वेळच उरत नाही. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानव नेहमीच खंबीरपणे उभा राहिला. पण जेव्हा स्वतःच्या इच्छांची वेळ आली, तेव्हा त्याने त्या पुढच्या वेळेसाठी पुढे ढकलल्या. आता आयुष्याच्या या टप्प्यावर त्याला स्वतःची बकेट लिस्ट अजूनही अपूर्ण असल्याची जाणीव होते.

Entertainment News: ‘तू अनोळखी तरी सोबती’मधील पुरुष कलाकारांचं कौतुक करत योगिता चव्हाणने व्यक्त केलं पुरुष दिनानिमित्त खास मत!

२० वर्षांच्या संसारानंतर मानव आणि जानकीच्या नात्यात नवं वळण?

एकता कपूरच्या ‘दिल की बेवफाइयाँ’ या आगामी कौटुंबिक मालिकेत मानवच्या आयुष्यातील हाच भावनिक संघर्ष पाहायला मिळणार आहे. या मालिकेत गौरव खन्ना आणि श्रद्धा आर्या पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. दोघेही लग्नाला २० वर्षे पूर्ण झालेल्या जोडप्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

जानकीला दैनंदिन आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो. दोघांनी मिळून उभारलेलं आयुष्य तिच्यासाठी पुरेसं आहे. मानवाचंही आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. मात्र, त्याच्या मनात स्वतःच्या अपूर्ण इच्छांची एक खंत कायम आहे. लग्नाच्या २० वर्षांनंतर मानवच्या मनातील ही खंत त्यांच्या नात्यावर काय परिणाम करणार, हे मालिकेत पाहायला मिळेल.

Colors Marathi New Serial : प्रेमाची ओढ अन् देशसेवेचं स्वप्न! कलर्स मराठीवर येतेय नवी मालिका ‘लागलिया ओढ जिवा’

कधी आणि कुठे पाहता येणार मालिका?

‘दिल की बेवफाइयाँ’ ही मालिका येत्या २४ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवार ते रविवार रात्री ९ वाजता स्टार प्लस आणि जिओहॉटस्टारवर ही मालिका पाहता येईल. गौरव खन्ना आणि श्रद्धा आर्या यांची नवी जोडी तसेच एका मध्यमवयीन जोडप्याच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत

Web Title: Gaurav khanna dil ki bewafaiyaan shraddha arya new star plus serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • entertainment
  • Gaurav Khanna

संबंधित बातम्या

Priyanka Chopra: प्रियंका लेकीला देतेय भारतीय संस्कारांची शिकवण; मालतीचा गायत्री मंत्र म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल!
1

Priyanka Chopra: प्रियंका लेकीला देतेय भारतीय संस्कारांची शिकवण; मालतीचा गायत्री मंत्र म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल!

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’ची लोकप्रियता ठरतेय फायद्याची! काझी तौकीरच्या नावाने कॅफेत खास फूड प्लॅटर लॉन्च
2

Bigg Boss 20: ‘बिग बॉस २०’ची लोकप्रियता ठरतेय फायद्याची! काझी तौकीरच्या नावाने कॅफेत खास फूड प्लॅटर लॉन्च

Saif Ali Khan: सैफ अली खान पुन्हा गँगस्टरच्या निशाण्यावर? ‘तुझ्या बायकोने जी चूक केली…’ रोहित गोदारा गँगकडून जीवे मारण्याची धमकी
3

Saif Ali Khan: सैफ अली खान पुन्हा गँगस्टरच्या निशाण्यावर? ‘तुझ्या बायकोने जी चूक केली…’ रोहित गोदारा गँगकडून जीवे मारण्याची धमकी

Tiger Shroff Comeback: गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचं धमाकेदार कमबॅक; ‘तेनु लेके जाना’चा टीझर रिलीज
4

Tiger Shroff Comeback: गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचं धमाकेदार कमबॅक; ‘तेनु लेके जाना’चा टीझर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.