Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saif Ali Khan: सैफ अली खान पुन्हा गँगस्टरच्या निशाण्यावर? ‘तुझ्या बायकोने जी चूक केली…’ रोहित गोदारा गँगकडून जीवे मारण्याची धमकी

Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. झीशान अख्तर आणि रोहित गोदारा गँगचा उल्लेख असलेली कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 19, 2026 | 03:02 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Saif Ali Khan:बॉलिवूड कलाकारांना धमक्या मिळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. टायगर श्रॉफ आणि अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित प्रकरणांनंतर आता अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर सध्या एक ऑडिओ क्लिप वेगाने व्हायरल होत असून, यामध्ये रोहित गोदारा गँगचा सदस्य असल्याचा दावा करणारी व्यक्ती सैफ अली खानला धमकावताना ऐकू येत आहे. या कथित धमकीमुळे बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील फरार आरोपी झीशान अख्तर याच्या नावाने सैफ अली खानला धमकी देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये संबंधित व्यक्ती स्वतःची ओळख ‘मी झीशान अख्तर, रोहित गोदारा गँगकडून बोलत आहे’ अशी करून देतो.

‘तुझ्या पत्नीने एक चूक केली आहे’; ऑडिओमध्ये नेमकं काय म्हटलंय?

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये व्यक्ती थेट सैफ अली खानला उद्देशून बोलताना ऐकू येते. तो म्हणतो, ‘तुझी पत्नी करीना कपूर हिने एक चूक केली आहे आणि त्याचे परिणाम तुला भोगावे लागू शकतात.’ यानंतर तो सैफवर यापूर्वी झालेल्या चाकू हल्ल्याचा उल्लेख करतो.

‘तुझ्यावर आधी चाकूने हल्ला झाला होता, पण तू वाचलास. देवाने तुला वाचवले. मात्र, आम्ही तुला गोळ्या घालू. त्यावेळी तुझी अवस्था बाबा सिद्दीकी यांच्यासारखी होऊ शकते. त्यामुळे आपली वागणूक सुधार,’ अशा शब्दांत धमकी दिल्याचा दावा या ऑडिओ क्लिपमधून केला जात आहे.

Sunita Ahuja New Stylish Look: सुनीता आहुजाचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; छोट्या केसांसह स्टायलिश अंदाज पाहून सून कश्मिराही फिदा!

करीना कपूरच्या वादाचा उल्लेख; धमकीमुळे चिंता

या कथित धमकीमागे करीना कपूरच्या अलीकडील वादाचा संदर्भ असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. सैफ अली खानवर यापूर्वी झालेल्या चाकू हल्ल्याचाही उल्लेख करत त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते. दरम्यान, सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. या धमकीमागील व्यक्ती कोण आहे आणि ऑडिओ क्लिपची सत्यता काय, याबाबत पोलिसांचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये नेमकं काय घडलं? स्पर्धकाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; बक्षिसाच्या रकमेवरही प्रश्न

Web Title: Saif ali khan death threat zeeshan akhtar rohit godara gang audio clip viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • entertainment
  • Saif Ali Khan
  • Threaten Call

संबंधित बातम्या

Tiger Shroff Comeback: गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचं धमाकेदार कमबॅक; ‘तेनु लेके जाना’चा टीझर रिलीज
1

Tiger Shroff Comeback: गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचं धमाकेदार कमबॅक; ‘तेनु लेके जाना’चा टीझर रिलीज

Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये नेमकं काय घडलं? स्पर्धकाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; बक्षिसाच्या रकमेवरही प्रश्न
2

Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये नेमकं काय घडलं? स्पर्धकाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; बक्षिसाच्या रकमेवरही प्रश्न

Sunita Ahuja New Stylish Look: सुनीता आहुजाचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; छोट्या केसांसह स्टायलिश अंदाज पाहून सून कश्मिराही फिदा!
3

Sunita Ahuja New Stylish Look: सुनीता आहुजाचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; छोट्या केसांसह स्टायलिश अंदाज पाहून सून कश्मिराही फिदा!

Aai Tuljabhavani Serial: महादेवांचं गुपित तुळजाईला समजलं; आता मायावी पानामुळे रंगणार अनोखा लपंडाव!
4

Aai Tuljabhavani Serial: महादेवांचं गुपित तुळजाईला समजलं; आता मायावी पानामुळे रंगणार अनोखा लपंडाव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.