Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कानावर पडताच पाय थिरकतील! ‘भूतम भयम’च्या ‘गोमु सासरला जाते’ ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम’मधील ‘गोमु सासरला जाते’ हे गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. आनंद शिंदे यांचा दमदार आवाज, समीर सप्तीस्कर यांचे संगीत आणि हळदी समारंभाचा जल्लोष यामुळे गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 24, 2026 | 09:07 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम’ प्रदर्शित होण्याआधीच त्यातील ‘गोमु सासरला जाते’ हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. हळदी समारंभाचा जल्लोष, उत्साहाने भरलेली नृत्यरचना आणि जोशपूर्ण संगीत यामुळे हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड होत असून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

लग्नसोहळ्यातील धमाल, मित्रमंडळींची मस्ती आणि एका सुंदर तरुणीभोवती रंगणारी गंमतीशीर चुरस अशा विविध रंगांनी सजलेले हे गाणे प्रेक्षकांना खिळवून ठेवते. पारंपरिक लग्नसोहळ्याचा माहोल आणि आधुनिक सादरीकरण यांचा सुरेख संगम या गाण्यात पाहायला मिळतो.

गायक आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजाने गाण्याला विशेष ऊर्जा मिळाली आहे. समीर सप्तीस्कर यांचे संगीत आणि अभिषेक खणकर यांचे खुसखुशीत बोल यामुळे गाण्याची रंगत अधिकच वाढली आहे. तर पवन आणि बॉब यांच्या नृत्यदिग्दर्शनामुळे प्रत्येक फ्रेममध्ये उत्साह आणि जल्लोष अनुभवायला मिळतो.

Dipika Kakar : कॅन्सरशी लढा देणाऱ्या अभिनेत्रीची, पतीसाठी खास पोस्ट! म्हणाली ‘माझ्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये…’

संगीत दिग्दर्शक समीर सप्तीस्कर यांनी सांगितले की, हळदी समारंभातील आनंद आणि बेधुंद नृत्य डोळ्यांसमोर ठेवून हे गाणे तयार करण्यात आले. पारंपरिक ढंगाला आधुनिक संगीताची जोड दिल्याने सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हे गाणे आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पूलशेजारी आराम ते गल्ली क्रिकेट! युवराज, अभिषेक आणि नमनची गोवा ट्रिप ठरली चर्चेचा विषय

लेखक-दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर यांच्या मते, प्रेक्षकांना काही मिनिटांचा निव्वळ आनंद देण्याच्या उद्देशाने हे गाणे तयार करण्यात आले आहे. लग्न, हळद किंवा कोणत्याही सेलिब्रेशनमध्ये हे गाणे वाजताच लोकांनी मनमोकळेपणाने नाचावे आणि त्या क्षणाचा आनंद घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रेक्षकांच्या लाडक्या ‘ऑरेंज ज्यूस गँग’मधील करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, मनमीत पेम आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम’ हा चित्रपट येत्या २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Gomu sasarla jate song from bhootam bhayam released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Entertainment marathi

संबंधित बातम्या

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी
1

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
2

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
3

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
4

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.