Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govinda Affair: ‘मुलीच्या वयाची, थोडी तरी लाज बाळग…’ बायको सुनीता भडकली, गोविंदावर ओढले ताशेरे

Govinda Affair: गोविंदाला त्याची सह-अभिनेत्री कोमल राणीसोबत विमानतळावर पाहिल्यानंतर त्याची पत्नी सुनीता आहुजा प्रचंड संतापली. तिने अभिनेत्याच्या या वागण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 15, 2026 | 01:15 PM
गोविंदाच्या अफेअरवर भडकली पत्नी सुनीता (फोटो सौजन्य - Instagram)

गोविंदाच्या अफेअरवर भडकली पत्नी सुनीता (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार पुन्हा एकदा विमानतळावर स्पॉट 
  • पत्नी सुनीता आहुजा भडकली, म्हणाली जरा तरी लाज बाळग…
  • मुलीच्या वयाच्या महिलेशी अफेअर असल्याचा केला आरोप 
Govinda Affair: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही वर्षांपासून ही जोडी वेगळी राहत आहे. अनेकदा गोविंदावर त्याची पत्नी सुनिता आरोप लावताना दिसते. दरम्यान गोविंदाने कधीही याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र गोविंदा नुकताच त्याच्या आगामी ‘रूपा’ या चित्रपटातील सह-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकरसोबत मुंबई विमानतळावर दिसला होता. शुक्रवारी जेव्हा हे दोघे पुन्हा एकत्र दिसले, तेव्हा पापाराझींनी सुनीता आहुजाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सुनीता संतापली आणि तिने आपल्या पतीच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याच्यावर जोरदार टीका केली.

Govinda Affair: गोविंदांसोबत दिसली मिस्ट्री गर्ल; मुंबई विमानतळावर दोघेही एकत्र, पत्नी सुनीता आहुजांनी केले होते अफेअरचे आरोप

सुनीताचा गोविंदाला ‘शुगर डॅडी’ टोला

जेव्हा पापाराझींनी गोविंदा आणि कोमलच्या चित्रपटाच्या प्रमोशनबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा सुनीताने नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली की, साधारणपणे चित्रपट तयार झाल्यावर प्रमोशन सुरू होते, पण इथे तर चित्रपट तयार होण्याआधीच ते एकत्र फिरत आहेत. आपला संताप व्यक्त करत सुनीता म्हणाली की, गोविंदा आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरत आहे आणि त्याला याची लाज वाटली पाहिजे. इतकेच नाही तर, सुनीताने कोमलच्या दिसण्यावर टिप्पणी केली आणि गोविंदाला ‘शुगर डॅडी’ म्हणत टोला लगावला. ती म्हणाली की, तिचा ‘शुगर डॅडी’ इतका श्रीमंत असल्याने, त्या मुलीने किमान सभ्य कपडे तरी घालावेत. सुनीता पुढे म्हणाली की, गोविंदाचे डोके पूर्णपणे फिरले आहे.

ट्रोलर्स आणि चाहत्यांना सुनीताचे सडेतोड उत्तर

यापूर्वी, जेव्हा गोविंदा पहिल्यांदा कोमलसोबत दिसला होता, तेव्हा सुनीताने ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ ही म्हण उद्धृत करत म्हटले होते की, गोविंदाचे डोके फिरले आहे. ‘हिरो नं. १’ आता ‘चीटर नं. १’ झाला आहे, असे म्हणणाऱ्या चाहत्यांच्या प्रतिक्रियेबद्दल जेव्हा पापाराझींनी तिला विचारले, तेव्हा सुनीताने सडेतोड उत्तर दिले. गोविंदाच्या अफेअरच्या अफवांवरून तिला पूर्वी ट्रोल करणाऱ्या सर्व चाहत्यांना तिने धारेवर धरले. सुनीताने स्पष्ट केले की, या विषयावर कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तिला आता रस नाही.

Sunita Ahuja On Govinda: ‘बुद्धी भ्रष्ट झाली आहे…’ गोविंदा-कोमल राणीच्या व्हिडिओवर सुनीता आहुजा संतापल्या; मागितलं उत्तर

कोमल राणी आणि जुन्या वादाबद्दल गोविंदाचा बचाव

सुनीता आहुजा हिने देखील एका जुन्या मुलाखतीत ‘कोमल’ या नावाविषयी आपला तीव्र तिरस्कार व्यक्त केला होता. जेव्हा वाद वाढला, तेव्हा गोविंदाने एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आपल्या सह-कलाकाराचा बचाव केला. गोविंदा म्हणाला की, या वादात विनाकारण ओढले जाऊनही कोणाबद्दलही वाईट न बोलल्याबद्दल तो कोमलचा अत्यंत आभारी आहे. गोविंदाच्या मते, कोमल एक शांत आणि संयमी कलाकार आहे, जी अशा वादांमधून रातोरात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. 

तसंच एका मुलाखतीमध्ये सुनीता माझ्यावर कितीही रागवली आणि काहीही बोलवली तरी मी ते अत्यंत शांतपणेच घेतो कारण तिच्या शिव्याही मला ओव्याच वाटतात असंही गोविंदाने सांगितलं आहे. मात्र सुनीता दिवसेंदिवस त्याच्याविरोधात बोलत असल्याने आता चाहत्यांनाही चिंता वाटू लागली आहे. 

Web Title: Govinda affair again spotted with rumored girlfriend komal rani wife sunita lashes out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Govinda
  • sunita ahuja

संबंधित बातम्या

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?
1

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
2

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
3

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
4

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.