Grand Inauguration Of Senco Gold And Diamonds In Borivali By Wamiqa Gabbi
वामिका गब्बीच्या हस्ते बोरीवलीत ‘सेनको गोल्ड अँड डायमंड्स’चा शानदार शुभारंभ
लोकप्रिय अभिनेत्री वामिका गब्बी हिच्या हस्ते या भव्य शोरूमचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या दालनामुळे महाराष्ट्रातील सेनकोच्या आउटलेट्सची एकूण संख्या आता नऊ झाली आहे.
प्रसिद्ध दागिन्यांचा ब्रँड सेनको गोल्ड अँड डायमंड्स ने मुंबईतील आपल्या विस्ताराचा नवा टप्पा गाठला आहे. बोरीवली येथील स्काय सिटी मॉल मध्ये ब्रँडच्या ६व्या स्टोअरचे उद्घाटन रविवारी अत्यंत उत्साहात पार पडले. लोकप्रिय अभिनेत्री वामिका गब्बी हिच्या हस्ते या भव्य शोरूमचे लोकार्पण करण्यात आले. या नव्या दालनामुळे महाराष्ट्रातील सेनकोच्या आउटलेट्सची एकूण संख्या आता नऊ झाली आहे.
सुमारे २४७५ चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले हे आधुनिक दालन दागिने खरेदीदारांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. येथे सोने, हिरे आणि प्लॅटिनममधील सूक्ष्म हस्तकलेचे दागिने उपलब्ध आहेत. पारंपरिक नक्षीकामापासून ते आधुनिक, आकर्षक रचनांपर्यंतचे विविध पर्याय ग्राहकांसमोर आहेत.
या दालनात ‘एव्हरलाइट’ मालिकेतील नवीन संग्रह विशेष आकर्षण ठरत आहेत. ‘आर्ट डेको’ संग्रहात भूमितीय आकार आणि आधुनिक वास्तुकलेचा प्रभाव असलेले दागिने आजच्या पिढीसाठी खास आहेत. तर ‘रेट्रो’ संग्रहात जुन्या काळातील सौंदर्य आणि आधुनिक साधेपणाचा संगम केलेले हलके, ग्लॅमरस दागिने सादर केले आहेत. हे दागिने दैनंदिन वापरासाठी तसेच खास प्रसंगांसाठी योग्य आहेत.
उद्घाटनावेळी वामिका गब्बी म्हणाली की, सेनकोचे दागिने वारसा जपतानाच आजच्या आधुनिक जीवनशैलीला साजेसे आहेत. मुंबईसारख्या वैविध्यपूर्ण शहरासाठी येथे प्रत्येक आवडीचे आणि वयोगटाचे दागिने उपलब्ध आहेत, याचा मला आनंद वाटतो.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुवंकर सेन यांनी सांगितले की, मुंबई हे परंपरा आणि आधुनिक आकांक्षांचे शहर आहे. बोरीवलीतील या दुसऱ्या स्टोअरमुळे आम्हाला ग्राहकांशी अधिक प्रभावीपणे जोडले जाता येईल.
तर, कंपनीच्या विपणन व रचना विभाग प्रमुख जोइता सेन यांनी सांगितले की, दागिने हे केवळ खरेदीचे साधन नसून ते भावना, आठवणी आणि आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांशी जोडलेले असतात. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार विविध पर्याय निवडता यावेत, या उद्देशाने हे दालन उभारण्यात आले आहे.
जाहिरात
जाहिरात
Web Title: Grand inauguration of senco gold and diamonds in borivali by wamiqa gabbi