Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gullak x CEEW: ‘गुल्लक’ आणि CEEW ची भागीदारी; छतावरील सौरऊर्जेबाबत जनजागृतीसाठी नवा उपक्रम

Gullak x CEEW: TVFच्या 'गुल्लक' मालिकेसोबत CEEWची भागीदारी. मिश्रा कुटुंबाच्या माध्यमातून छतावरील सौरऊर्जेचे फायदे आणि स्वच्छ ऊर्जेबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 04, 2026 | 02:57 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Gullak x CEEW:  कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर (CEEW) आणि TVFच्या लोकप्रिय ‘गुल्लक’ मालिकेने एकत्र येत छतावरील सौरऊर्जेबाबत (रूफटॉप सोलर) जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केला आहे. या सहकार्याचा उद्देश भारतीय कुटुंबांना सौरऊर्जेचे फायदे सोप्या, मनोरंजक आणि विश्वासार्ह पद्धतीने समजावून सांगणे हा आहे.

CEEW ही हवामान आणि ऊर्जा क्षेत्रात काम करणारी आघाडीची संशोधन संस्था आहे. TVF सोबतच्या या भागीदारीतून संस्थेने लोकप्रिय मालिकेतील मिश्रा कुटुंबाच्या माध्यमातून रूफटॉप सोलरविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

मनोरंजनातून स्वच्छ ऊर्जेचा संदेश

आजच्या काळात पारंपरिक जाहिरातींपेक्षा कथा आणि मनोरंजनाच्या माध्यमातून दिलेले संदेश लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतात. याच संकल्पनेतून ‘गुल्लक’ मालिकेतील परिचित पात्रांचा वापर करून छतावरील सौरऊर्जेबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जमील खान, गीतांजली कुलकर्णी, हर्ष मायर आणि सुनीता राजवार यांनी साकारलेल्या मिश्रा कुटुंबाच्या कथेतून सौरऊर्जा ही घरासाठी दीर्घकालीन फायदेशीर गुंतवणूक असल्याचा संदेश देण्यात आला आहे.

Bigg Boss 20 : ‘तथास-TWO!’ ‘बिग बॉस 20’ची अधिकृत घोषणा; प्रीमियर डेट जाहीर, सलमान खानच्या ‘करण-अर्जुन’शी खास कनेक्शन

CEEW चे मत

CEEWच्या वरिष्ठ कार्यक्रम संवाद तज्ज्ञ रीथिरा कुमार म्हणाल्या, “हवामान बदल आणि नवीकरणीय ऊर्जेसारखे विषय लोकांच्या दैनंदिन चर्चेचा भाग व्हावेत, यासाठी आम्ही वेगवेगळे आणि मनोरंजक मार्ग शोधत आहोत. ‘गुल्लक’मधील मिश्रा कुटुंब भारतीय कुटुंबांचे वास्तव दाखवते. त्यामुळे रूफटॉप सोलरसारखा महत्त्वाचा विषय मांडण्यासाठी ही मालिका योग्य ठरली.”

TVF ने काय सांगितले?

TVFचे अध्यक्ष विजय कोशी म्हणाले, “प्रेक्षक जेव्हा एखाद्या कथेशी आणि पात्रांशी भावनिकरित्या जोडले जातात, तेव्हा त्याचा परिणाम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही. ‘गुल्लक’च्या माध्यमातून छतावरील सौरऊर्जेसारखा महत्त्वाचा विषय लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची ही मोठी संधी आहे.”

सामाजिक जनजागृतीसाठी नवा प्रयत्न

‘गुल्लक x CEEW’ हा उपक्रम स्वच्छ ऊर्जेचा संदेश भारतीय कुटुंबांपर्यंत अधिक जवळचा आणि समजण्यास सोपा करण्याचा प्रयत्न आहे. मनोरंजन आणि सामाजिक संदेश यांचा प्रभावी संगम घडवत अशा प्रकारचे उपक्रम भविष्यात पर्यावरण, ऊर्जा आणि इतर महत्त्वाच्या सामाजिक विषयांबाबत जनजागृतीसाठी नवा मार्ग ठरू शकतात.

2026-27 Upcoming Movies: 2026-27 मध्ये बॉक्स ऑफिसवर राज्य करणार या अभिनेत्री; आलिया, तमन्ना, श्रद्धामध्ये कोणाची जादू चालणार?

Web Title: Gullak x ceew rooftop solar awareness initiative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • solar energy

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.