Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haiwaan: सैफ अली खान की अक्षय कुमार, कोण ठरला सर्वाधिक मानधन घेणारा? ‘हैवान’ची फी ऐकून व्हाल थक्क!

Haiwaan: अक्षय कुमार, सैफ अली खान आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या ‘हैवान’ चित्रपटातील मानधनाची चर्चा आहे. जाणून घ्या कोणाला किती फी मिळाल्याचं वृत्त आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 11, 2026 | 02:24 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Haiwaan: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचा बहुचर्चित ‘हैवान’ चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं, याची चर्चा सुरू झाली आहे.

‘हैवान’साठी अक्षय कुमारने घेतले 54 कोटी?

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अक्षय कुमारने ‘हैवान’साठी तब्बल 54 कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे, अक्षयने या चित्रपटाचं शूटिंग अवघ्या 12 दिवसांत पूर्ण केल्याचं वृत्त आहे.

अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची जोडी यापूर्वीही अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. ‘भूत बंगला’, ‘फिर हेरा फेरी’ यांसह काही प्रोजेक्ट्समध्ये दोघांनी एकत्र काम केलं आहे.

Tharala Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; शेअर केली गुडन्यूज

सैफ अली खानला किती मिळाले?

दुसरीकडे, सैफ अली खानने ‘हैवान’साठी 8 कोटी रुपये मानधन घेतल्याचं वृत्त आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या तुलनेत सैफचं मानधन बरंच कमी असल्याचं दिसतं.

सैफ अली खान या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून अक्षय कुमारसोबत त्याची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे.

Aali Mothi Shahani Movie: ‘आली मोठी शहाणी’मधील ‘गणेश वंदना’ रिलीज; अभय जोधपूरकरांच्या आवाजाने जिंकले मन

प्रियदर्शन यांचं मानधनही सैफपेक्षा जास्त?

विशेष म्हणजे, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचं मानधन सैफ अली खानपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. वृत्तांनुसार, प्रियदर्शन यांनी ‘हैवान’साठी 14 कोटी रुपये घेतले आहेत.

मात्र, अक्षय कुमार, सैफ अली खान आणि प्रियदर्शन यांच्या मानधनाबाबत समोर आलेले हे आकडे केवळ वृत्तांवर आधारित आहेत. निर्माते किंवा संबंधित कलाकारांकडून या मानधनाच्या आकडेवारीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

‘हैवान’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईकडे लक्ष

अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या अभिनयाने सजलेला ‘हैवान’ 11 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत असून आता पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पहिल्या दिवसाची कमाई कशी होते, यावर चित्रपटाच्या पुढील बॉक्स ऑफिस प्रवासाचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे ‘हैवान’ पहिल्या दिवशी किती कमाई करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Haiwaan akshay kumar saif ali khan fees priyadarshan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Entertainemnt News
  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

Tharala Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; शेअर केली गुडन्यूज
1

Tharala Tar Mag Serial: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; शेअर केली गुडन्यूज

Aali Mothi Shahani Movie: ‘आली मोठी शहाणी’मधील ‘गणेश वंदना’ रिलीज; अभय जोधपूरकरांच्या आवाजाने जिंकले मन
2

Aali Mothi Shahani Movie: ‘आली मोठी शहाणी’मधील ‘गणेश वंदना’ रिलीज; अभय जोधपूरकरांच्या आवाजाने जिंकले मन

R Madhavan: शूटिंगमधून वेळ काढत आर. माधवन पोहोचला यूएस ओपनमध्ये; दिग्गजांसोबत घेतला खास अनुभव
3

R Madhavan: शूटिंगमधून वेळ काढत आर. माधवन पोहोचला यूएस ओपनमध्ये; दिग्गजांसोबत घेतला खास अनुभव

Bipasha Basu: प्रोटीन पावडरमध्ये चक्क सापडल्या अळ्या; बिपाशाने तुकाराम मुंढेंकडे मागितली मदत, म्हणाली- ‘आपणच एकमेव..’
4

Bipasha Basu: प्रोटीन पावडरमध्ये चक्क सापडल्या अळ्या; बिपाशाने तुकाराम मुंढेंकडे मागितली मदत, म्हणाली- ‘आपणच एकमेव..’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.