
फोटो सौजन्य - Social Media
दरम्यान, काही परप्रांतीय रिक्षाचालकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. काही रिक्षाचालकांनी चक्क या निर्णयाला मागे घेण्याची मागणी केली आहे. ऑटो रिक्षा चालक – मालक संयुक्त कृती समिती, महाराष्ट्रने जाहीर केले आहे की, २८ एप्रिलपर्यंत राज्य परिवहन विभागाने हा आदेश मागे घेतला नाही, तर ४ मेपासून बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपो, निवासी तसेच व्यापारी भागात दररोज निदर्शने करण्यात येतील. परप्रांतीय रिक्षाचालकांच्या या मुजोरीमुळे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता हेमंत ढोमे चांगलाच चिताळलेला आहे, त्याने या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे हेमंत ढोमेची पोस्ट?
परप्रांतीय राक्षचालकांच्या या मुजोरीने चिताळलेल्या हेमंतने पोस्ट करत लिहले आहे की, “१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय? एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा! महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!”. एकंदरीत, हेमंत सांगू इच्छितो की पंधरा लाखांच्या मराठीद्वेषी रिक्षाचालकांना महाराष्ट्रात काम करायचं आहे, इथलं खाऊन पोट भरायचं आहे पण इथली भाषा जपणे त्यांना जड जातेय, तर अशा मराठीद्वेषींनी मराठीभूमीवर कामे न करता आपापल्या भाषेच्या राज्यात जाऊन काम करावे आणि तिथेच खावे. हेमंत म्हणतो की जर इथे काम करायचं आहे तर इथली भाषा मराठी शिका आणि बोलण्याचा प्रयत्न करा मगच शिकाल.
अनेक मराठीप्रेमींच्या मते शासनाचा हा निर्णय काळाची गरज बनत चालली आहे. मोठ्या शहरांमध्ये मराठी भाषिकच परिसरात मराठी बोलायला विसरतो आणि संभाषणात हिंदी किंवा इंग्रजीचा आधार घेतो. मोठ्या शहरांमध्ये अनेक मराठी मुली–मुलांना प्रेम करण्यासाठी आता परप्रांतीय खांदा घ्यावा लागत आहे. मोठ्या शहरांमध्ये मराठी अस्मितेचे असे हाल होत चालले आहेत अशामध्ये महाराष्ट्रात मराठी सक्ती विरोधात अनेक रिक्षाचालक उभे असल्याने मराठीप्रेमींनी या विरोधात प्रतिक्रिया देण्यास आणि उभे राहण्यास सुरुवात केली आहे.