Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिल पोरी हिला’ ची भारताला भुरळ; गौतमी पाटील-भाऊ कदम यांच्या गाण्याने यूट्यूब ट्रेंडिंगमध्ये पटकावला 24 वा क्रमांक

Gautami Patil-Bhau Kadam :'दादा कोंडके यांच्या अजरामर 'हिल हिल पोरी हिला' गाण्याच्या रिमेकला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांची जोडी असलेले हे गाणे यूट्यूब म्युझिक इंडियाच्या ट्रेंडिंग चार्टमध्ये 24 व्या क्रमांकावर पोहोचले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 08, 2026 | 04:14 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांची बहुचर्चित जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. या दोघांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘हिल पोरी हिला’ या गाण्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली आहे.

दादा कोंडके यांच्या अजरामर गाण्याचा नव्या ढंगात सादर केलेला हा ट्विस्ट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. पारंपरिक ठेका, आधुनिक सादरीकरण आणि गौतमी पाटील-भाऊ कदम यांची हटके केमिस्ट्री यामुळे हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे, भारताच्या यूट्यूब ट्रेंडिंग यादीत ‘हिल पोरी हिला’ हे गाणे 24 व्या क्रमांकावर झळकत आहे. मराठी गाण्याला राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या यशामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘हिल हिल पोरी हिला’ हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरले होते. तब्बल 52 वर्षांनंतर या अजरामर गाण्याला आधुनिक संगीत, नव्या धाटणीचे सादरीकरण आणि आकर्षक चित्रीकरणाची जोड देत त्याचे रिमेक व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

या नव्या गाण्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आणि लोकप्रिय अभिनेता भाऊ कदम यांची पहिल्यांदाच एकत्र दिसलेली जोडी. दोघांची भन्नाट केमिस्ट्री आणि उत्स्फूर्त सादरीकरण प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे.

Jahnavi Killekar : “जास्त शहाणपणा करू नकोस, अक्कल नाही का?” छोट्या पुढारीच्या कमेंटवर जान्हवीचा संताप, नेमकं प्रकरण काय?

या गाण्याचे चित्रीकरण कोकणातील निसर्गरम्य परिसरात करण्यात आले आहे. हिरवागार निसर्ग, समुद्रकिनारे आणि मनमोहक लोकेशन्समुळे म्युझिक व्हिडीओला एक वेगळेच आकर्षण प्राप्त झाले आहे. कोकणच्या सौंदर्याची झलक या गाण्यातून प्रभावीपणे पाहायला मिळते.

Jennifer Winget : १२ वर्षांनंतर पुन्हा वाजणार सनई-चौघडे! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; कोण आहे होणारा पती?

गाण्यात गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांनी विविध आकर्षक लूक साकारले आहेत. गौतमी पारंपरिक लाल नऊवारी साडीत मोहक दिसत असून, काही दृश्यांमध्ये दोघेही रेट्रो, वेस्टर्न आणि काळ्या वेशभूषेतील हटके अंदाजात झळकतात. त्यांच्या वेगवेगळ्या लूकसह जोशपूर्ण नृत्यानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Web Title: Hil pori hila captivates india gautami patil bhau kadams song secures no 24 spot on youtube trending

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Gautami patil
  • viral Song

संबंधित बातम्या

Kissing Controversy : किसिंग सीनवरून ‘lock upp 2’मध्ये नवा वाद; श्रेया कालराने राम कपूरवर केले गंभीर आरोप
1

Kissing Controversy : किसिंग सीनवरून ‘lock upp 2’मध्ये नवा वाद; श्रेया कालराने राम कपूरवर केले गंभीर आरोप

Salman Khan: व्हायरल व्हिडिओनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया, रात्री उशिरा शेअर केली पोस्ट; चाहत्यांना विचारला ‘हा’ प्रश्न
2

Salman Khan: व्हायरल व्हिडिओनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया, रात्री उशिरा शेअर केली पोस्ट; चाहत्यांना विचारला ‘हा’ प्रश्न

Sanai Choughade Serial: सहा तास पावसात शूटिंग, सतत वर्कआउट! जयच्या अॅक्शन सीनसाठी राज हंचनाळेची जबरदस्त मेहनत; सांगितला अनुभव
3

Sanai Choughade Serial: सहा तास पावसात शूटिंग, सतत वर्कआउट! जयच्या अॅक्शन सीनसाठी राज हंचनाळेची जबरदस्त मेहनत; सांगितला अनुभव

Zee 5 ची मोठी घोषणा! मराठीसह ७ भाषांमध्ये मनोरंजनाचा मेगा धमाका; जाहीर केली नवी कंटेंट लाइनअप
4

Zee 5 ची मोठी घोषणा! मराठीसह ७ भाषांमध्ये मनोरंजनाचा मेगा धमाका; जाहीर केली नवी कंटेंट लाइनअप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.