Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’ ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Himanshi Khurana News: पंजाबी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १३’ फेम हिमांशी खुराणा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच पारस चाब्राच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या हिमांशीने तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल खुलासा केला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 15, 2026 | 05:45 PM
Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हिमांशी खुराणाने पॉडकास्टमध्ये वैयक्तिक आयुष्याबाबत केला खुलासा
  • आसिम रियाझसोबतच्या जुन्या नात्याची पुन्हा चर्चा सुरू
  • हिमांशीच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत
 

पंजाबी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १३’मधून घराघरात पोहोचलेली हिमांशी खुराणा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अभिनेत्री नुकतीच पारस चाब्राच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. या संवादात तिने आयुष्यातील एक अतिशय कठीण काळ उघडपणे सांगितला. तिच्या बोलण्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्येही त्याची चर्चा सुरू झाली.

हिमांशी आणि आसिम रियाझ यांची ओळख ‘बिग बॉस १३’च्या घरात झाली होती. शोदरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि पुढे त्यांनी एकमेकांना डेट केलं. काही वर्षे त्यांचं नातं चर्चेत राहिलं. मात्र नंतर दोघांनीही सोशल मीडियावर आपल्या विभक्त होण्याची माहिती दिली. आता हिमांशीने केलेल्या नव्या खुलाशामुळे त्यांच्या जुन्या नात्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

धर्म बदलण्याबाबत हिमांशीने काय सांगितलं?

पॉडकास्टमध्ये पारस चाब्राने धर्मांतराशी संबंधित चर्चेबद्दल तिला प्रश्न विचारला. त्यावर हिमांशीने आपल्या आयुष्यातील एक कठीण अनुभव सांगितला. तिच्या म्हणण्यानुसार, एका टप्प्यावर ती दुसरा धर्म स्वीकारण्याच्या अगदी जवळ पोहोचली होती. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी तिला काही गोष्टी मनापासून पूर्ण करायच्या होत्या. Himanshi Khurana News

चारधाम यात्रेची होती इच्छा

हिमांशीने सांगितलं की, धर्म बदलण्यापूर्वी तिला चारधाम यात्रा करायची होती. त्यावेळी तिच्या मनात एक विचार होता की, हा प्रवास कदाचित पुन्हा करता येणार नाही. त्यामुळे आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी तिला ही यात्रा पूर्ण करायची होती. तिच्या या वक्तव्यामुळे त्या काळात तिच्या मनात किती मोठी भावनिक उलथापालथ सुरू होती, याची कल्पना येते.

प्रेमात स्वतःच्या मतांवरही तडजोड?

या अनुभवाबद्दल बोलताना हिमांशीने सांगितलं की, ती त्या नात्यात भावनिकदृष्ट्या खूप गुंतली होती. प्रेमामुळे काही निर्णय स्वीकारण्याची तिची तयारी झाली होती. मात्र, नंतर तिला परिस्थिती वेगळ्या पद्धतीने समजू लागली. स्वतःच्या विचारांवर आणि सवयींवर दबाव जाणवू लागल्याचं तिने सांगितलं.

Gauhar on Husband Zaid: ‘माझा पती असं करतो अन्…’ इश्कजादे’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा

श्रद्धा आणि विचारांवरून वाढला ताण

हिमांशीच्या म्हणण्यानुसार, तिच्या जोडीदाराच्या धार्मिक श्रद्धा आणि काही पारंपरिक पद्धतींबाबत वेगळी मतं होती. काही गोष्टी स्वीकारण्याबाबत तिच्यावर सातत्याने दबाव जाणवत होता, असं तिने सांगितलं. या सगळ्याचा तिच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला आणि परिस्थिती तिच्यासाठी खूप त्रासदायक बनली.

Himanshi khurana opened up about her conversion to Islam 🚨 In recent podcast with Paras, she said she was on the verge of converting to Islam bcz of pressure from her ex bf Asim riaz 😡 Asim riaz told her , “ye Pooja paath ab nhi chalega”. One genuine question, Why are Muslim… pic.twitter.com/3I2hfmplnz — Harsh shekhawat (@wordofshekhawat) August 14, 2026

एका टप्प्यावर धर्म बदलण्याच्या निर्णयाच्या अगदी जवळ गेल्यानंतर हिमांशीने तो निर्णय थांबवला. आपल्यावर दबाव निर्माण होत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिने मागे हटण्याचा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं. हा निर्णय तिच्यासाठी सोपा नव्हता, कारण त्यावेळी ती भावनिकदृष्ट्या त्या नात्यात खूप गुंतलेली होती.

Awarapan 2: पहिल्याच दिवशी इम्रान हाश्मीच्या चित्रपटाने केली 4 पट कमाई, सनी देओलचा ‘बंटवारा 1947’ पडला मागे

पॉडकास्टनंतर सोशल मीडियावर चर्चा

हिमांशीच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही जण तिच्या अनुभवाबद्दल बोलत आहेत, तर काहीजण तिच्या जुन्या नात्याचा संदर्भ देत आहेत. मात्र, हिमांशीने या पॉडकास्टमध्ये कोणाचंही नाव घेत थेट आरोप केलेले नाहीत, त्यामुळे तिच्या वक्तव्याकडे तिच्या वैयक्तिक अनुभवाच्या रूपात पाहणं महत्त्वाचं आहे.

Web Title: Himanshi khurana reveals reason behind breakup with asim riaz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Bollywood News Update
  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप
1

 Yemen Crisis : हुथींनी इराणी हवाई संरक्षण शस्त्रांचे क्रूझ क्षेपणास्त्रांत रूपांतर केल्याचा आरोप

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार
2

Breaking News :ऐतिहासिक क्षण ;२३ वर्षानंतर अमेरिकेची इराक मधून पूर्ण माघार

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा
3

Israel-Gaza : ‘आणखी मदत नाही’; अमेरिकन डेमोक्रॅटिक उमेदवारांचा इस्रायलविरोधात कठोर पवित्रा

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
4

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.