Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan Trade News : व्यापार बंदी असतानाही पाकिस्तानने भारतातून ६१.७ दशलक्ष डॉलरच्या वस्तू केल्या खरेदी

India-Pakistan Trade News : भारत-पाकिस्तानमधील अधिकृत व्यापार बंद असतानाही पाकिस्तानने जुलै ते सप्टेंबर २०२६ दरम्यान भारतातून ६१.७ दशलक्ष डॉलर्सच्या वस्तूंची आयात केली. तिसऱ्या देशांमार्फत सुरू असलेल्या व्यापारामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 11, 2026 | 08:11 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • व्यापार बंदी असूनही भारतातून आयातीत मोठी वाढ
  • औषधे रसायनांना पाकिस्तानमध्ये मोठी मागणी
  • तिसऱ्या देशांमार्फत व्यापार; संबंध सुधारण्याची शक्यता ?
India-Pakistan Trade News : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय आणि राजनैतिक संबंध तणावपूर्ण असतानाही दोन्ही देशांमधील आर्थिक व्यवहार पूर्णपणे थांबलेले नाहीत . अधिकृतपणे व्यापार बंद असताना . दोन्ही देशांमधील कटुता वाढली आणि टोकाला असताना सुद्धा पाकिस्तानने २०२६ च्या जुलै ते सप्टेंबर या कालावधीत भारतातून ६१.७ दशलक्ष डॉलर्स किमतीच्या वस्तू आयात केल्या आहेत .

मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ही आयात जवळपास ६९ टक्क्यांनी वाढली आहे . या आकडेवारीमुळे दोन्ही देशांमधील व्यापाराचे वास्तव आणि पडद्यामागे सुरु असलेल्या आर्थिक व्यवहाराबाबत नव्याने चर्चा सुरु झाली आहे .

व्यापार बंदी असूनही भारतातून आयातीत मोठी वाढ

पाकिस्तानच्या स्टेट बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ,जुलै ते सप्टेंबर २०२६ या तीन महिन्यात पाकिस्तानने भारतातून ६१.७ दशलक्ष डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या आहेत . मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा ३६.६ दशलक्ष डॉलर्स होता म्हणजेच एका वर्षात आयातीमध्ये जवळपास ६९ टक्क्यांची वाढ झाली आहे . विशेष म्हणजे या काळात पाकिस्तानकडून भारतात कोणत्याही निर्यात झालेली नाही .

दोन्ही देशांमधील अधिकृत व्यापार स्थगित असताना आयातीमध्ये झालेली ही वाढ विशेष लक्ष वेधून घेत आहे . मात्र ही आकडेवारी बँकांमार्फत झालेल्या आयात पेमेंटची असून प्रत्येक मालाची वाहतूक नेमक्या कोणत्या मार्गाने झाली ,हे सर्प[स्पष्ट होत नाही .

Trump News : अमेरिकेत नवा वाद; ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो व्यवसायाचे पाकिस्तान कनेक्शन; चौकशीची मागणी सुरु

औषधे रसायनांना पाकिस्तानमध्ये मोठी मागणी

पाकिस्तानकडून भारतातून होणाऱ्या आयातीमधे औषधे आणि सेंद्रिय रसायनांचा मोठा वाटा आहे . पाकिस्तानच्या औषधनिर्मिती उद्योगाला भारतातून मिळणार कच्चा माल महत्वाचा ठरतो . भारतीय औषध उद्योग तुलनेने कमी किमतीत औषध आणि औषध निर्मितीसाठी आवश्यक घटक उपलब्ध करून देतो .

याशिवाय प्लास्टिक , पेट्रोलियम उत्पादने , रंग ,रबर ,चहा ,कॉफी , भाज्या आणि मसाले यासारख्या वस्तूंचाही व्यापार होत असल्याचे दिसते . इतर देशांमधून या वस्तूंची आयात केल्यास वाहतूक खर्च आणि उत्पादन खर्च वाढू शकतो . त्यामुळे राजकीय तणाव असूनही व्यावसायिक गरजांमुळे भारतीय उत्पादनाची मागणी कायम असल्याचे चित्र आहे .

China Economy News : चीनचा व्यापार अतिरिक्त १.०४ ट्रिलियन डॉलरवर; निर्यातीत मोठी झेप, मात्र देशांतर्गत अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने

तिसऱ्या देशांमार्फत व्यापार; संबंध सुधारण्याची शक्यता ?

भारत आणि पाकिस्तानमधील थेट व्यापार बंद असल्याने भारतीय वस्तू संयुक्त अरब अमिराती ( UAE ) मलेशिया , सिंगापूर यांसारख्या तिसऱ्या देशांमार्फत पाकिस्तानमध्ये पोहोचत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . काही वस्तू आधी तिसऱ्या देशांमध्ये पाठवून तेथून पाकिस्तानला निर्यात केल्या जातात . त्यामुळे मूळ उत्पादक देश आणि माल पाठवण्याचा मार्ग यामध्ये फरक निर्माण होऊ शकतो .

दरम्यान काही विश्लेषकांच्या मते दोन्ही देशांमधील काही अलीकडील सकारात्मक घडामोडी संबंध सुधारण्याचे संकेत देत आहेत . मात्र व्यापाराच्या आकडेवारीवरून राजनैतिक संबंध सुधारल्याचा थेट निष्कर्ष काढता येणार नाही . सुरक्षा आणि दहशदवाद यांचा संबंध आणि त्यावरचे प्रश्न हे कायम असल्याने अधिकृत व्यापार पुन्हा सुरु होण्यासाठी दोन्ही देशांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे .

 

 

Web Title: India pakistan trade imports 2026 cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • Marathi News
  • Pakistan News
  • Trade News

संबंधित बातम्या

China Economy News : चीनचा व्यापार अतिरिक्त १.०४ ट्रिलियन डॉलरवर; निर्यातीत मोठी झेप, मात्र देशांतर्गत अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने
1

China Economy News : चीनचा व्यापार अतिरिक्त १.०४ ट्रिलियन डॉलरवर; निर्यातीत मोठी झेप, मात्र देशांतर्गत अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने

Baramati News :दहा हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळल्या अजितदादांच्या आठवणी; बारामतीकरांचे डोळे पाणावले
2

Baramati News :दहा हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळल्या अजितदादांच्या आठवणी; बारामतीकरांचे डोळे पाणावले

Trump News : अमेरिकेत नवा वाद; ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो व्यवसायाचे पाकिस्तान कनेक्शन; चौकशीची मागणी सुरु
3

Trump News : अमेरिकेत नवा वाद; ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो व्यवसायाचे पाकिस्तान कनेक्शन; चौकशीची मागणी सुरु

Bunker Roy News : शिक्षणाची पदवी नाही, तरी बनवल्या शेकडो महिला अभियंता; बंकर रॉय यांनी बदलले ग्रामीण महिलांचे आयुष्य
4

Bunker Roy News : शिक्षणाची पदवी नाही, तरी बनवल्या शेकडो महिला अभियंता; बंकर रॉय यांनी बदलले ग्रामीण महिलांचे आयुष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.