Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hunkar The Roar: १७ वर्षांच्या मुलीच्या एका आरोपाने हादरली शक्तिशाली व्यवस्था; ‘हुंकार: द रोअर’चा थरारक टीझर!

Hunkar The Roar: JioHotstarने ‘हुंकार: द रोअर’ या थरारक सिरीजची घोषणा केली आहे. १७ वर्षांच्या मुलीच्या आरोपानंतर सुरू होणाऱ्या तपासाची कथा २५ सप्टेंबरपासून पाहता येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 02, 2026 | 09:05 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Hunkar The Roar: एखादा आरोप जेव्हा शक्तिशाली व्यवस्थेला हादरवून सोडतो आणि संपूर्ण यंत्रणेला सत्याचा सामना करण्यास भाग पाडतो, तेव्हा नेमकं काय घडतं? याच प्रश्नाचा वेध घेणारी उत्कंठावर्धक मालिका ‘हुंकार: द रोअर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओहॉटस्टारने या नव्या मालिकेची घोषणा केली असून, २५ सप्टेंबर २०२६ रोजी मालिकेचा प्रीमियर होणार आहे.

१७ वर्षांच्या मुलीच्या आरोपाने सुरू होणार मोठा तपास

‘हुंकार: द रोअर’ची कथा १७ वर्षांच्या मीनू रावतभोवती फिरते. आदरणीय पंथप्रमुख सुनील चकोसी उर्फ ‘बापजी’ यांच्यावर मीनूने केलेल्या आरोपानंतर एका हाय-स्टेक्स तपासाला सुरुवात होते. हा तपास जसजसा पुढे जातो, तसतसे त्याचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटू लागतात.

सत्ता, प्रभाव आणि जनमानसातील प्रतिमा पणाला लागलेल्या या कथेत सत्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर लढा दिला जातो.

पोलीस, कायदा आणि माध्यमांची तीन वेगळी लढाई

करण डी कपाडिया, नित्या मेहरा आणि हिराज मारफतिया यांनी मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. मालिकेच्या टीझरमध्ये एसीपी जसलीन सिंग सोनी, संघर्ष करणारा वकील भालेराव आणि खंबीर पत्रकार अमिताभ यांच्या व्यक्तिरेखांची झलक पाहायला मिळते.

हे तिघेही एकाच सत्याच्या शोधात असले, तरी त्यांची लढाई वेगवेगळ्या आघाड्यांवर सुरू असल्याचे दिसते. एकीकडे पोलीस तपास, दुसरीकडे न्यायालयीन संघर्ष आणि तिसरीकडे माध्यमांमधून होणारी चौकशी आणि ट्रायल, अशा तीन वेगवेगळ्या बाजू मालिकेत पाहायला मिळणार आहेत.

Box Office: ‘Hanuman Ansh’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! यशच्या ‘Toxic’ला दिली टक्कर, कमावला तब्बल 2600% नफा

दमदार कलाकारांची फौज

‘हुंकार: द रोअर’मध्ये फातिमा शेख, अर्जुन माथूर, मोहम्मद जीशान अयुब, अनीत पड्डा, रघुवीर यादव आणि राम कपूर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे कथेसोबतच कलाकारांच्या अभिनयाचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

 

सत्ता, प्रभाव आणि सत्याचा संघर्ष

‘हुंकार: द रोअर’मध्ये पोलीस तपास, कायदेशीर नाट्य आणि मीडिया ट्रायल यांचा थरारक मेळ पाहायला मिळणार आहे. एका आरोपानंतर सुरू झालेला तपास पुढे संपूर्ण व्यवस्थेलाच प्रश्न विचारण्यास भाग पाडतो. त्यामुळे मालिकेच्या कथेत नेमकी कोणती रहस्ये दडलेली आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बिर्ला स्टुडिओ आणि अप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित, पर्पल पेबल पिक्चर्सच्या सहकार्याने आणि मान्गाता फिल्म्सच्या प्रॉडक्शन अंतर्गत ही मालिका तयार करण्यात आली आहे. करण डी कपाडिया आणि नित्या मेहरा यांनी मालिकेची निर्मिती केली आहे.

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख

 

Web Title: Hunkar the roar jiohotstar web series release date cast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • JioHotstar
  • Web Series

संबंधित बातम्या

Kon Yashwant Pansare Review: न्यायासाठी पुन्हा मैदानात उतरतो यशवंत पानसरे! भरत जाधवांची नवी वेबसिरीज किती प्रभावी? वाचा सविस्तर
1

Kon Yashwant Pansare Review: न्यायासाठी पुन्हा मैदानात उतरतो यशवंत पानसरे! भरत जाधवांची नवी वेबसिरीज किती प्रभावी? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.