Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Imran Khan: इमरान खानला हायकोर्टाचा दिलासा, भारत सोडण्याच्या नोटीसवर तात्पुरती ब्रेक,न्यायालयात नेमकं काय घडलं?

Imran Khan : अभिनेता इमरान खानला भारत सोडण्यासंदर्भात देण्यात आलेल्या नोटिशीच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. न्यायालयाने नोटिशीच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार नाही.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 27, 2026 | 06:23 PM
Imran Khan (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Imran Khan (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • इमरान खानला मुंबई हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा
  • भारत सोडण्याच्या नोटिशीला स्थगिती
  • पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला

अभिनेता इमरान खान सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. मुंबई हायकोर्टाने त्याला दिलासा देत भारत सोडण्यासंदर्भात मिळालेल्या नोटीसला तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे या प्रकरणात पुढील सुनावणी होईपर्यंत त्याच्यावर कारवाई केली जाणार नाही. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर हा निर्णय घेण्यात आला. पुढील सुनावणी येत्या 2 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता होणार आहे.

इमरान खानला केंद्र सरकारकडून भारत सोडण्याची नोटीस देण्यात आली होती. या नोटिशीमुळे त्याच्या आयुष्यात अडचणी वाढल्या होत्या. त्याने न्यायालयाला आव्हान दिले. आपल्याला कोणतेही बरोबर कारण नसताना ही नोटीस पाठवल्याचे याचिकेत म्हटले आहे. दरम्यान आता न्यायालय काय निर्णय घेईल यावर लक्ष आहे.  Imran Khan :

नेमकं काय घडलं?

10 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात एक आंदोलन झाले होते. या आंदोलनात इमरान खान सहभागी झाले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी इमरानवर  परदेशी नागरिकांसाठी असलेल्या कायदा मोडल्याचे गंभीर आरोप केला. दरम्यान त्याच्यावरुन त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडून जाण्यात सांगण्यात आले होते.

मात्र, इमरान खानला ही नोटीस मान्य नव्हती. कोणतीही नीट कारण न देता भारत सोडण्यास कसे सोडायचा असे दावा त्याने केला. ही कारवाई अन्यायकारक असून आपल्याला विनाकारण या प्रकरणात ओढले जात असल्याचेही त्याने न्यायालयात सांगितले.

Dhurandhar: खाडी देशांत रिलीज नाही, ‘A’ प्रमाणपत्राची मर्यादा; तरीही रणवीर सिंहच्या चित्रपटाची चर्चा, जाणून घ्या ७ कारणं

यानंतर त्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसेच केंद्र सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली. तसेच, पुढील सुनावणीपर्यंत इमरान खानवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नसल्याचते सांगितले आहे. त्यानंतर न्यायालयाने नोटिशीच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली.

याचिकेत संविधानातील तरतुदींचा उल्लेख

इमरान खानने आपल्या याचिकेत भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 आणि 21 यांचा आधार घेतला आहे. भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांनाही कायद्यानुसार समान वागणूक आणि जीवनाचे संरक्षण मिळायला हवे, असे त्याचे म्हणणे आहे.

इमरान खान हा अमेरिकेचा नागरिक आहे. त्याच्याकडे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया म्हणजेच OCI कार्डदेखील आहे. या पार्श्वभूमीवर त्याने आपल्याला दिलेल्या नोटिशीच्या कायदेशीर बाबींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या न्यायालयाने त्याला तात्पुरता दिलासा दिला असला, तरी या प्रकरणाचा अंतिम निकाल लागलेला नाही. पुढील सुनावणीत कोणते मुद्दे समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

चित्रपटांमधून मिळाली लोकप्रियता

इमरान खानने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. 1988 मध्ये तो पहिल्यांदा चित्रपटात दिसला. पुढे 2008 मध्ये ‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर प्रवेश केला. या चित्रपटामुळे त्याला तरुणांमध्ये चांगली लोकप्रियता मिळाली.

Pushkar Shrotri: ‘कोण यशवंत पानसरे?’मधील वकिलाची भूमिका ठरली खास; अभिनेत्याने सांगितला व्यक्तिरेखेच्या तयारीचा अनुभव

यानंतर त्याने ‘किडनॅप’, ‘ब्रेक के बाद’, ‘एक मैं और एक तू’, ‘मटरू की बिजली का मंडोला’, ‘बॉम्बे टॉकीज’ आणि ‘गोरी तेरे प्यार में’ यांसारख्या चित्रपटांत काम केले. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कट्टी बट्टी’नंतर तो चित्रपटांपासून दूर राहिला. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही त्याच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता होती. दहा वर्षांच्या अंतरानंतर 2026 मध्ये ‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ या चित्रपटातून त्याने पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले.

आता इमरान खानच्या बाबतीत सुरू असलेल्या कायदेशीर प्रकरणाची चर्चा होत आहे. हायकोर्टाच्या निर्णयामुळे त्याला काही काळासाठी दिलासा मिळाला आहे. मात्र, भारत सोडण्याच्या नोटिशीबाबत अंतिम निर्णय होण्यासाठी पुढील सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे 2 नोव्हेंबरला न्यायालयात काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इमरान खानला मुंबई हायकोर्टाने काय दिलासा दिला?

    Ans: भारत सोडण्यासंदर्भात मिळालेल्या नोटिशीच्या अंमलबजावणीला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली.

  • Que: इमरान खानच्या प्रकरणाची पुढील सुनावणी कधी आहे?

    Ans: पुढील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.

  • Que: इमरान खान कोणत्या देशाचा नागरिक आहे?

    Ans: इमरान खान हा अमेरिकेचा नागरिक असून त्याच्याकडे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्डदेखील आहे.

Web Title: Imran khan bombay high court stays india exit notice rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Imran khan
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ethiopia News : इथिओपियात चर्चवर सशस्त्र हल्ले; ४० हून अधिक जणांचा मृत्यू
1

Ethiopia News : इथिओपियात चर्चवर सशस्त्र हल्ले; ४० हून अधिक जणांचा मृत्यू

Top Casting Directors: हॉलिवूड ते बॉलिवूड! मोठ्या चित्रपटांची स्टारकास्ट घडवणारे ‘मास्टरमाइंड’ कोण?
2

Top Casting Directors: हॉलिवूड ते बॉलिवूड! मोठ्या चित्रपटांची स्टारकास्ट घडवणारे ‘मास्टरमाइंड’ कोण?

Dharau Marathi Film: गौरक्षणाचा विषय, मराठी सिनेमाची भरारी! ‘धाराऊ’ची पुणे-विदर्भात हाऊसफुल्ल कामगिरी
3

Dharau Marathi Film: गौरक्षणाचा विषय, मराठी सिनेमाची भरारी! ‘धाराऊ’ची पुणे-विदर्भात हाऊसफुल्ल कामगिरी

Aata Hou De Dhingana: स्टार प्रवाहचा मोठा निर्णय, ‘आता होऊ दे धिंगाणा’ मधला फेमस गेम बंद
4

Aata Hou De Dhingana: स्टार प्रवाहचा मोठा निर्णय, ‘आता होऊ दे धिंगाणा’ मधला फेमस गेम बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.