
फोटो सौजन्य सोशल मीडिया
शिक्षण हा प्रत्येक मुलांच्या / विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. चांगले शिक्षण, नोकरी उद्योगाची योग्य संधी आणि उज्ज्वल भविष्याचं स्वप्न प्रत्येक विद्यार्थी पाहतो. मात्र, आजच्या वास्तवात शिक्षणाच्या वाढत्या खर्चापासून विद्यार्थ्यांसमोर विविध अडचणी आहेत, अनेक प्रश्न चर्चेत आहेत. झी मराठीने ‘कमळी’ मालिकेच्या निमित्ताने हाच मुद्दा प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
‘पाऊल पुढे पडलंय… जमलंय!’ या नव्या विचारधारेतून पुढे जाणाऱ्या, आपल्या हक्कांसाठी आणि स्वप्नांसाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या नव्या पिढीची गोष्ट झी मराठीच्या कथांमधून पाहायला मिळत आहे. याच विचाराला साजेसं उदाहरण म्हणजे कमळीचं विद्यार्थी आंदोलन. गेल्या दोन आठवड्यापासून कमळी शिक्षणाच्या बाजाराविरोधात विद्यार्थी आंदोलन करत असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ती ठामपणे उभी आहे.
कमळीचं हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलं आहे. येत्या ८ सप्टेंबर ला या आंदोलनाची अंतिम लढत पाहायला मिळणार असून, कमळी आणि रितेश सरपोतदार आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून कमळीने विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. मात्र, आता हेच प्रश्न ती थेट रितेश सरपोतदारांसमोर मांडणार आहे.
तिच्या प्रश्नांना रितेश सरपोतदार काय उत्तर देणार? रितेश सरपोतदारांचा खरा चेहरा विद्यार्थ्यांसमोर कसा येणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या विद्यार्थी आंदोलनामुळे मालिकेच्या कथानकाला वेगळी दिशा मिळाली आहे. केवळ मालिकेतील संघर्ष म्हणून न पाहता, आजच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी जोडलेला हा विषय प्रेक्षकांना आपल्या आजूबाजूच्या वास्तवाची आठवण करून देतो.
शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर तरुणाईने प्रश्न विचारणं, आपलं मत मांडणं आणि बदलासाठी पुढे येणं, हीच नव्या पिढीची ताकद या कथेतून अधोरेखित होते. कमळीच्या रूपातून युवा शक्तीचा आत्मविश्वास दाखवतं, स्वतःच्या भविष्याचा विचार करताना समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवरही आवाज उठवणारी कमळीआजच्या तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करते.
आता या आंदोलनाला अंतिम टप्पा ८ सप्टेंबरला गाठला जाणार आहे. कमळीविरुद्ध रितेश सरपोतदार हा थेट सामना मालिकेला नेमका कोणत्या वळणावर पोहोचणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका ‘कमळी’ दररोज रात्री ९ वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.