Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jay Jay Swami Samarth: स्वामींच्या अनुपस्थितीत स्वामीस्थानात अवधूतची अनपेक्षित एंट्री! रणजीतला थेट आव्हान देणारा हा बालक कोण आहे?

Jay Jay Swami Samarth: कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ – जागर शक्तीचा, महिमा स्वामींचा’ या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. स्वामींच्या अनुपस्थितीत स्वामीस्थानात अवधूतची अनपेक्षित एंट्री होते. स्वामींसारखी वाणी, विलक्षण शक्ती आणि रणजीतला थेट आव्हान देणाऱ्या या बालकाचे रहस्य काय आहे?

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 21, 2026 | 05:47 PM
स्वामींच्या अनुपस्थितीत स्वामीस्थानात अवधूतची अनपेक्षित एंट्री!

स्वामींच्या अनुपस्थितीत स्वामीस्थानात अवधूतची अनपेक्षित एंट्री!

Follow Us
Follow Us:
  • स्वामींच्या अनुपस्थितीत स्वामीस्थानात अवधूतची अनपेक्षित एंट्री!
  • स्वामींसारखी वाणी, विलक्षण शक्ती आणि रणजीतला थेट आव्हान
  • हा बालक नेमका आहे तरी कोण?
 

Jay Jay Swami Samarth: स्वामी कुठे आहेत? आणि त्यांच्या जागी आलेला हा छोटा अवधूत कोणतं गूढ घेऊन आला आहे? स्वामींच्या लीला अगाध आहेत, त्यांच्या शिकवणीची ताकद अमर्याद आहे आणि त्यांच्या भक्तांच्या रक्षणासाठी ते कोणत्या रूपात प्रकट होतील, याचा अंदाज बांधणंही कठीण! मालिकेच्या आगामी भागांत प्रेक्षकांना असाच एक अनपेक्षित आणि रहस्यमय अनुभव येणार आहे.

स्वामीस्थानात स्वामींची अनुपस्थिती असताना अचानक प्रवेश होतो एका आठ-नऊ वर्षांच्या चुणचुणीत मुलाचा अवधूतचा! त्याचं वय लहान असलं, तरी त्याची भाषा, त्याचा आत्मविश्वास आणि त्याच्या बोलण्यातून व्यक्त होणारी विलक्षण समज प्रेक्षकांना थक्क करणार आहे. स्वामींसारखी वाणी, विलक्षण शक्ती आणि रणजीतला थेट आव्हान… हा बालक नेमका आहे तरी कोण? ‘जय जय स्वामी समर्थ- जागर शक्तीचा, महिमा स्वामींचा’ दररोज रात्री ८.१० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही कुठेही JioHotstar वर.

Police Company: ‘पोलीस कंपनी’चा रिलीज मुहूर्त ठरला! राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात हर्षवर्धनसह ‘ही’ मराठी अभिनेत्री झळकणार

साथीदारांशी अवधूतची गाठ

स्वामीस्थानात पाऊल ठेवताच रणजीत आणि त्याच्या साथीदारांशी अवधूतची गाठ पडते. रणजीतच्या डोक्यात विटी आदळल्यापासून सुरू होणारा हा सामना हळूहळू अधिकच रंजक आणि उत्कंठावर्धक बनतो. रणजीतच्या उर्मटपणाला न घाबरता, त्याच्याच भाषेत पण आपल्या निरागस आणि मिश्कील शैलीत उत्तर देणारा अवधूत त्याला चांगलाच जेरीस आणतो. लहान मुलाच्या रूपात असूनही त्याच्यात असलेली ताकद, त्याचं निर्भीड वागणं आणि स्वामींच्या शिकवणीचा अचूक अर्थ समजावून सांगण्याची त्याची हातोटी पाहून रणजीतसह त्याचे साथीदारही गोंधळून जातात.

स्वामींनी सांगितलेल्या शस्त्रांचा अर्थ केवळ ढाल, तलवार किंवा धनुष्यबाण एवढाच मर्यादित नसून, खऱ्या शस्त्रांची ताकद मनात आणि मनगटात असते, हे अवधूत आपल्या बालसुलभ पण मार्मिक शब्दांत पटवून देतो. रणजीतला त्याची ही निर्भीड उत्तरं सहन होत नाहीत. मात्र, अवधूतचा इशारा केवळ शब्दांपुरता राहत नाही. रणजीतला अचानक मृत्यूचं भय जाणवू लागतं आणि त्याची अवस्था पाहून त्याचे साथीदारही हादरून जातात. स्वामीस्थानात येऊन स्वामींनाच आव्हान देऊ पाहणाऱ्या रणजीतला आता स्वतःच्या विनाशाची चाहूल लागणार का?

विनाशाची चाहूल लागणार का?

दरम्यान, स्वामीस्थानात सुईत दोरा ओवण्याच्या साध्या कृतीतून संयम, सातत्य आणि तपश्चर्येचा अर्थ उलगडतो. ब्रह्मचारिणी देवीच्या दिव्य दर्शनातून चारही स्त्रियांना आपल्या अंतर्मनातील शक्तीची जाणीव होते. स्वामींनी दिलेली शिकवण हीच त्यांच्यासाठी एक प्रभावी शस्त्र ठरते. स्त्रियांना केवळ सहन करण्याची नव्हे, तर स्वतःमधील सामर्थ्य ओळखून अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा मिळते. पण रणजीतचा सूड शांत झालेला नाही. स्वामीस्थान जाळून टाकण्याचा कट रचणाऱ्या रणजीतसमोर अवधूत पुन्हा उभा ठाकतो. रणजीतने आखलेला मनसुबा, तो साध्य करू शकेल का ? स्वामींच्या अनुपस्थितीत त्यांच्या जागी जणू त्यांच्याच विचारांचा आणि सामर्थ्याचा प्रत्यय देणारा अवधूत नेमका कोण आहे? तो स्वामींचाच एखादा संकेत आहे, त्यांचा दूत आहे की या सगळ्यामागे आणखी काही दैवी रहस्य दडलं आहे? स्वामी कुठे आहेत?

या प्रश्नांची उत्तरं शोधताना प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे भक्ती, दैवी शक्ती, स्त्रीसामर्थ्य आणि अधर्माविरुद्धच्या संघर्षाचा एक नवा अध्याय. अवधूतच्या खट्याळपणामागे दडलेलं गूढ आणि स्वामींच्या प्रत्येक लीलेमागचा अर्थ जाणून घेण्यासाठी मालिकेचा आगामी भाग नक्की पाहा!

Divya Vinekar Death: मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी! ‘डार्लिंग्स’ फेम अभिनेत्रीचे ४० व्या वर्षी निधन

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत अवधूतची एंट्री कधी होते?

    Ans: स्वामींच्या अनुपस्थितीत स्वामीस्थानात अवधूतची अनपेक्षित एंट्री होत असल्याचे मालिकेच्या नव्या प्रोमोमधून समोर आले आहे.

  • Que: अवधूतच्या आगमनामुळे मालिकेत काय घडणार आहे?

    Ans: अवधूतची स्वामींसारखी वाणी आणि विलक्षण शक्ती, तसेच रणजीतला दिलेले थेट आव्हान यामुळे कथानकात नवे वळण येण्याची शक्यता आहे.

  • Que: ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका किती वाजता पाहता येईल?

    Ans: ‘जय जय स्वामी समर्थ – जागर शक्तीचा, महिमा स्वामींचा’ ही मालिका दररोज रात्री ८.१० वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होते.

Web Title: Jay jay swami samarth avadhut entry swami sthan ranjit colors marathi sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • colors marathi
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Gaurav More on Trolls: “चेहरा आणि मोबाईलचा कलर…” गौरव मोरेच्या वक्तव्याने वेधलं लक्ष; ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
1

Gaurav More on Trolls: “चेहरा आणि मोबाईलचा कलर…” गौरव मोरेच्या वक्तव्याने वेधलं लक्ष; ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

Exclusive: ‘मासिक पाळी हे महिलेचं दुबळेपण नाही’ आजची दुर्गा जान्हवी तांबटचे परखड मत
2

Exclusive: ‘मासिक पाळी हे महिलेचं दुबळेपण नाही’ आजची दुर्गा जान्हवी तांबटचे परखड मत

Jai Jai Swami Samarth: रणजीतरूपी महिषासुराचा संहार होणार? स्वामींच्या दिव्य लीलेतून उलगडणार 4 स्त्रियांचं रहस्य; मालिकेला नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: रणजीतरूपी महिषासुराचा संहार होणार? स्वामींच्या दिव्य लीलेतून उलगडणार 4 स्त्रियांचं रहस्य; मालिकेला नवं वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.