‘लडाकू’ चित्रपट 18 जून 2027 रोजी होणार रिलीज ( सौजन्य - सोशल मीडिया )
‘लडाकू’ या चित्रपटाची निर्मिती बिर्ला स्टुडिओज, कबीर खान एंटरटेनमेंट आणि डोपामाइन स्टुडिओज यांनी केली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या माध्यमातून कार्तिक आर्यन निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करत आहे. महत्त्वाकांक्षा, संघर्ष, जिद्द आणि आशा यांची सांगड घालणारी ही एक असामान्य सत्यकथा आहे.
‘चंदू चॅम्पियन’ या सर्वत्र कौतुक झालेल्या चित्रपटानंतर कार्तिक आर्यन आणि कबीर खान ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. त्यांच्या या नव्या चित्रपटामुळे ‘लडाकू’ हा २०२७ मधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरणार आहे.
‘बजरंगी भाईजान’ आणि ‘८३’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनाला भावणाऱ्या कथा मांडणारे कबीर खान पुन्हा एकदा ‘लडाकू’च्या माध्यमातून एक भावनिक, हृदयस्पर्शी आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल असा मनोरंजक चित्रपट घेऊन येत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवणाऱ्या नायकाची प्रेरणादायी कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
Ans: हा चित्रपट आगामी १८ जून २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Ans: चित्रपटाची निर्मिती बिर्ला स्टुडिओज, कबीर खान एंटरटेनमेंट आणि डोपामाइन स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात असून, याद्वारे कार्तिक आर्यन निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.
Ans: यापूर्वी या यशस्वी जोडीने सर्वत्र कौतुक झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.






