Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Trailer: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; राम-रावण युद्धाची भव्य झलक पाहून चाहते भारावले

Ramayana Trailer: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा नवा ट्रेलर प्रदर्शित झाला असून रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहेत. विशेष म्हणजे, राम आणि रावण यांच्यातील युद्धाची भव्य झलकही यात पाहायला मिळते

  • By अमृता यादव
Updated On: Oct 16, 2026 | 10:04 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ramayana Trailer: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. १५ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत भारतीय महाकाव्याची कथा पोहोचवण्याच्या दृष्टीने इंग्रजीसह विविध भाषांमध्ये हा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून चित्रपटाची भव्यता जागतिक स्तरावर पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. या नव्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहेत. विशेष म्हणजे, राम आणि रावण यांच्यातील युद्धाची भव्य झलकही यात पाहायला मिळते.

रणबीर कपूरच्या श्रीराम अवताराची दमदार झलक

सुमारे २ मिनिटे ३६ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. याआधीच्या ट्रेलरच्या तुलनेत यामध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) आणि पात्रांच्या वेशभूषेत काही बदल पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता असून, नव्या ट्रेलरमुळे ही उत्सुकता आणखी वाढली आहे.

ट्रेलरची सुरुवात इतिहासाच्या उदयापूर्वीच्या जगाचे वर्णन करणाऱ्या प्रभावी व्हॉइसओव्हरने होते. त्यानंतर अंधारातून रावणाचा उदय आणि त्याच्या वाढत्या सामर्थ्याची झलक दाखवण्यात आली आहे. पुढील दृश्यात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसतो, तर यशचा रावणाच्या रूपातील प्रभावी अवतार लक्ष वेधून घेतो. धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष भव्य व्हीएफएक्सच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे.

Kon Yashwant Pansare Review: न्यायासाठी पुन्हा मैदानात उतरतो यशवंत पानसरे! भरत जाधवांची नवी वेबसिरीज किती प्रभावी? वाचा सविस्तर

साई पल्लवीच्या सीतेच्या भूमिकेचीही झलक

या ट्रेलरमध्ये अभिनेत्री साई पल्लवीने साकारलेल्या माता सीतेची झलक पाहायला मिळते. याशिवाय, प्रभू श्रीराम शिवधनुष्य उचलत असल्याचा महत्त्वाचा प्रसंगही दाखवण्यात आला आहे. रामायणातील या प्रसंगामुळे ट्रेलरला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

भव्य राजवाडे, राक्षसी सैन्य आणि जटायूचे दृश्य

‘रामायण’च्या नव्या ट्रेलरमध्ये अनेक युद्धप्रसंगांचा समावेश आहे. भव्य राजवाडे, राक्षसी सैन्य आणि आकाशात उडणारा जटायू यांची दृश्ये चित्रपटाच्या भव्यतेची झलक दाखवतात. भारतीय महाकाव्याची कथा मोठ्या पडद्यावर जिवंत करण्यासाठी व्हीएफएक्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आल्याचे दृश्यांवरून दिसते.

ट्रेलरच्या शेवटच्या भागात रावणाचे सामर्थ्य दाखवण्यात आले आहे. एका दृश्यात यशच्या रावणाच्या अंगावर प्रहार झाल्यानंतर तो स्वतःच्या हातांनी भाले बाहेर काढताना दिसतो. या दृश्यामुळे रावणाच्या शक्तीची कल्पना येते. रणबीर कपूरचा श्रीराम अवतार, साई पल्लवीची सीता आणि यशचा रावण यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचे महाकाव्य जागतिक प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न ‘रामायण’च्या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे चित्रपटाच्या पुढील अपडेट्सकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Hema Malini Birthday: वयाच्या १६व्या वर्षी मिळाली ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळख; हेमा मालिनींच्या आयुष्यातील 7 रंजक गोष्टी जाणून घ्या

Web Title: Ramayana trailer released ranbir kapoor ram ravan war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • bollywood movies
  • entertainment
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Mahesh Tinaikar Death: भारतीय रॉक संगीतविश्वाला मोठा धक्का; महेश तिनैकर यांचं वयाच्या ६३व्या वर्षी निधन
1

Mahesh Tinaikar Death: भारतीय रॉक संगीतविश्वाला मोठा धक्का; महेश तिनैकर यांचं वयाच्या ६३व्या वर्षी निधन

Hema Malini Birthday: वयाच्या १६व्या वर्षी मिळाली ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळख; हेमा मालिनींच्या आयुष्यातील 7 रंजक गोष्टी जाणून घ्या
2

Hema Malini Birthday: वयाच्या १६व्या वर्षी मिळाली ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळख; हेमा मालिनींच्या आयुष्यातील 7 रंजक गोष्टी जाणून घ्या

Kon Yashwant Pansare Review: न्यायासाठी पुन्हा मैदानात उतरतो यशवंत पानसरे! भरत जाधवांची नवी वेबसिरीज किती प्रभावी? वाचा सविस्तर
3

Kon Yashwant Pansare Review: न्यायासाठी पुन्हा मैदानात उतरतो यशवंत पानसरे! भरत जाधवांची नवी वेबसिरीज किती प्रभावी? वाचा सविस्तर

Exclusive: ‘मासिक पाळी हे महिलेचं दुबळेपण नाही’ आजची दुर्गा जान्हवी तांबटचे परखड मत
4

Exclusive: ‘मासिक पाळी हे महिलेचं दुबळेपण नाही’ आजची दुर्गा जान्हवी तांबटचे परखड मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.