Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Katrina Kaif Body Shaming: ‘शरीर पब्लिक प्रॉपर्टी नाही’, कतरिनाच्या बॉडीवर कमेंट करणाऱ्यांना सोमी अलीचं सडेतोड उत्तर; म्हणाली…

Katrina Kaif Body Shaming: कतरिना कैफच्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना सोमी अलींनी सुनावलं. ‘महिलेचं शरीर काही पब्लिक प्रॉपर्टी नाही’, म्हणत ट्रोलर्सना उत्तर दिलं

  • By अमृता यादव
Updated On: Sep 18, 2026 | 12:00 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Katrina Kaif Body Shaming: अंबानी कुटुंबाच्या गणेश चतुर्थीच्या सेलिब्रेशनला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेत्री कतरिना कैफदेखील पती विक्की कौशलसोबत या सोहळ्यात सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील कतरिनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, काही नेटकऱ्यांनी तिच्या लूकवर आणि वजनावरून कमेंट्स करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता कतरिनाच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री  सोमी अली ने संताप व्यक्त केला आहे.

कतरिनाच्या समर्थनार्थ सोमी अलींची पोस्ट

कतरिनाला तिच्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना सोमी अली यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कतरिना आणि विक्की कौशलचा अंबानींच्या कार्यक्रमातील फोटो शेअर करत एक लांबलचक पोस्ट लिहिली.

सोमी अलीने लिहिलं, ‘कुठल्याही महिलेचं शरीर ही सार्वजनिक मालमत्ता नाही. आई होण्याचा अर्थ असा अजिबात नाही की लोकांनी तिच्या शरीरावर टिप्पणी करावी.’

‘आई झाल्यानंतर शरीरात बदल होतात’

सोमी अली ने पुढे महिलांच्या शरीरावर कमेंट करणाऱ्यांना सुनावलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका महिलेने या जगात नव्या जीवाला जन्म दिला आहे, त्यामुळे ती थट्टेची नाही तर सन्मानाची हकदार आहे.

स्क्रीनच्या मागे लपून महिलांच्या शरीराची खिल्ली उडवणाऱ्यांना त्यांच्या शरीराशी काहीही देणंघेणं नसल्याचंही सोमी यांनी म्हटलं. महिलेचं काम, तिचं कौशल्य आणि तिची माणुसकी याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.


‘बाळाच्या जन्मानंतर शरीरासाठी माफी मागण्याची गरज नाही’

सोमी अली ने आपल्या पोस्टमध्ये मातृत्वानंतर होणाऱ्या शारीरिक बदलांवरही भाष्य केलं. बाळाच्या जन्मानंतर महिलेचं शरीर जसं असेल, त्यासाठी तिने माफी मागण्याची गरज नाही. हे शरीर तिच्या ताकदीचं, बदलाचं आणि मातृत्वाचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं.

‘सुंदरतेचा कोणताही एक आकार किंवा ठरावीक कालावधी नसतो. एखाद्या महिलेची किंमत तिचं शरीर इतरांच्या अपेक्षांनुसार किती आहे, यावर ठरत नाही,’ असा संदेश सोमी अली यांनी दिला.

Pallavi Joshi: ‘पल्लवी जोशींना त्यांच्या कर्तृत्वाने ओळखा’; ‘पत्नी’ उल्लेखावर विवेक अग्निहोत्रींची नाराजी

कतरिनाच्या चाहत्यांनीही ट्रोलर्सना सुनावलं

कतरिनाच्या ट्रोलिंगनंतर तिचे चाहतेही अभिनेत्रीच्या समर्थनार्थ पुढे आले. काही युजर्सनी कतरिनाच्या वाढत्या वयाचा आणि मातृत्वानंतर शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांचा उल्लेख करत ट्रोलर्सना उत्तर दिलं.

एका युजरने म्हटलं की, ती ४० वर्षांची आहे, २० वर्षांची नाही. वय आणि मातृत्वामुळे महिलेच्या शरीरात बदल होतात. तर आणखी एका चाहत्याने कतरिना आजही तितकीच सुंदर असल्याचं म्हणत, तिने इतरांच्या सौंदर्याच्या मापदंडांमध्ये बसण्याची गरज नसल्याचं म्हटलं.

कतरिना-विक्कीच्या कुटुंबात नवा पाहुणा

दरम्यान, कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी आपल्या मुलाचं स्वागत केलं होतं. आई झाल्यानंतर कतरिना पहिल्यांदाच अशा सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्याने तिचे फोटो चर्चेत आले. मात्र, तिच्या लूकवर टीका करण्याऐवजी मातृत्वाचा सन्मान करावा, असा संदेश सोमी अली यांच्या पोस्टमधून देण्यात आला आहे.

Gaurav More Meets Abhijeet Sawant: ‘या क्षणाची २१ वर्षं वाट पाहिली’; गौरव मोरेची अभिजीत सावंतसोबत पहिली भेट

Web Title: Katrina kaif body shaming somy ali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Katrina Kaif
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

Vikrant Massey: हिमाचल-उत्तराखंडमध्ये विक्रांत मैसी उभारणार ‘मुसाफिर कॅफे’, कलाकारांसाठी ‘या’ खास सुविधा
1

Vikrant Massey: हिमाचल-उत्तराखंडमध्ये विक्रांत मैसी उभारणार ‘मुसाफिर कॅफे’, कलाकारांसाठी ‘या’ खास सुविधा

Ranveer Singh: ‘प्रलय’च्या शूटिंगमधून वेळ काढत रणवीर सिंह लालबागच्या राजाच्या चरणी; बाप्पाचे घेतले आशीर्वाद
2

Ranveer Singh: ‘प्रलय’च्या शूटिंगमधून वेळ काढत रणवीर सिंह लालबागच्या राजाच्या चरणी; बाप्पाचे घेतले आशीर्वाद

Gaurav More Meets Abhijeet Sawant: ‘या क्षणाची २१ वर्षं वाट पाहिली’; गौरव मोरेची अभिजीत सावंतसोबत पहिली भेट
3

Gaurav More Meets Abhijeet Sawant: ‘या क्षणाची २१ वर्षं वाट पाहिली’; गौरव मोरेची अभिजीत सावंतसोबत पहिली भेट

Bandhu Marathi Movie: भजनाच्या तालावर रंगले ‘बंधू’; उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी घेतले गणरायाचे दर्शन
4

Bandhu Marathi Movie: भजनाच्या तालावर रंगले ‘बंधू’; उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी घेतले गणरायाचे दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.