
Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
केतकी फक्त एक गायिका नसून एक पूर्ण संगीतकार आहे. तिने लहानपणापासून गाण्यास सुरुवात केली, तिची खासियत सांगायची झाली तर, ती सर्व प्रकारती गाणी गाते. विठ्ठलाचा अभंग म्हणताना आपल्याला भक्तीत लीन होऊन जाते. कधी ती मराठी लावणी किंवा भावगीत गाते, थेट बॉलिवूडचं गाणं गाऊन तरुणांना नाचवते. एवढंच नाही तर तिने परदेशी गायकांसोबत पण काम केलं आहे.
तिचा आवाज वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये अगदी सहज मिसळून जातो. मात्र तिच्या गाण्यात आपल्या भारतीय संस्कृतीची माती असते, हेच लोकांना जास्त भावातं.
आजकाल सगळं डिजिटल झालं आहे. गाणं हिट झालं की नाही हे व्ह्यूजवरून कळतं. केतकीने गेल्या तीन महिन्यात जे काही गाणी, रील, व्हिडीओ टाकले, त्यावर लोकांनी अक्षरशः प्रेमाचा वर्षाव केला आहे. YouTube वर तिची गाणी मिलियनमध्ये जात असून Instagram वर रीलला लाखो लाईक्स येत आहेत. लोक तिच्या गाण्यावर स्वतःचे व्हिडीओ बनवतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की लोकांना तिचा आवाज खूप आवडतो. तिची गाणी तरुण पिढीपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळेच ऐकतात. ती प्रत्येक गाण्यात काहीतरी नवीन घेऊन येते. कधीतरी नवीन प्रयोग करते. हेच तिच्या यशाचं कारण आहे.
केतकीला उगाच युथ आयकॉन म्हणत नाहीत ती दिसायला सुंदर आहे, तिचा स्वभाव खूप छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं ती आपल्या मातीशी जोडलेली आहे. एवढं यश मिळून पण तिच्यात अजिबात घमेंड नाही. ती सोशल मीडियावर चाहत्यांशी बोलते, त्यांच्या कमेंटला उत्तर देते. त्यामुळे चाहत्यांना ती आपल्या घरातलीच एक मुलगी वाटते. हा 5 कोटी व्ह्यूजचा टप्पा तिच्या करियरमधला एक मोठा टप्पा आहे. पण ही तर फक्त सुरुवात आहे. ती अजून खूप पुढे जाणार आहे. आपल्या आवाजाने ती अजून करोडो लोकांची मनं जिंकणार आहे.केतकीच्या या यशाबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन. तुझी अशीच प्रगती होत राहो.