Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khatron Ke Khiladi 15 Winner: अविनाश मिश्राने मारली बाजी! धाडसी स्टंटच्या जोरावर ऋत्विक,ओरीला मागं टाकत पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी

Khatron Ke Khiladi 15 Winner: खतरों के खिलाडी 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये अविनाश मिश्रा विजेता ठरला. ऋत्विक धनजानी आणि ओरीला मागे टाकत त्याने विजेतेपदासोबतच त्याला ट्रॉफी, २० लाख रुपयांची बक्षिसाची रक्कम, नवी कोरी कार आणि युरोप ट्रिप असं बक्षीस मिळालं.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 05, 2026 | 08:24 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Khatron Ke Khiladi 15 Winner:  टीव्हीवरील लोकप्रिय आणि थरारक स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 15’चा ग्रँड फिनाले रविवारी 4 ऑक्टोबरला पार पडला. संपूर्ण सीझनमध्ये एकापेक्षा एक धोकादायक स्टंट करत स्पर्धकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अखेर अभिनेता अविनाश मिश्रा याने आपल्या धाडसी कामगिरीच्या जोरावर या सीझनच्या विजेतेपदावर नाव कोरलं.

ग्रँड फिनालेमध्ये अविनाशने तगडे स्पर्धक ऋत्विक धनजानी आणि सोशल मीडिया स्टार ओरी यांना मागे टाकत विजेतेपदाची चमकदार ट्रॉफी पटकावली. त्याच्या विजयानंतर चाहत्यांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अविनाश मिश्राने पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी

रोहित शेट्टीच्या सूत्रसंचालनाखाली पार पडलेल्या ‘खतरों के खिलाडी 15’च्या ग्रँड फिनालेमध्ये अविनाश मिश्रा याला विजेता घोषित करण्यात आलं. विजेतेपदासोबतच त्याला ट्रॉफी, २० लाख रुपयांची बक्षिसाची रक्कम, नवी कोरी कार आणि युरोप ट्रिप असं बक्षीस मिळालं.

दरम्यान, ऋत्विक धनजानी हा पहिला रनरअप, तर ओरी दुसरा रनरअप ठरला.

केपटाऊनमध्ये रंगला थरारक सीझन

‘खतरों के खिलाडी 15’चं चित्रीकरण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये करण्यात आलं होतं. यंदाच्या सीझनमध्ये ‘चॅम्पियन्स विरुद्ध चॅलेंजर्स’ असं खास स्वरूप पाहायला मिळालं. जुन्या दिग्गज स्पर्धकांसमोर नव्या खेळाडूंनी आव्हान उभं केलं होतं.

उंचावरून केले जाणारे स्टंट, पाण्यातील थरारक टास्क आणि अवजड यंत्रांशी संबंधित आव्हानांचा या सीझनमध्ये समावेश होता. अविनाशने संपूर्ण सीझनमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत एकही टास्क सोडला नाही. पाण्याखाली पार पडलेल्या एका महत्त्वाच्या स्टंटमध्ये त्याने करण वाहीला मागे टाकत सीझनचा पहिला फायनलिस्ट होण्याचा मान मिळवला होता.

यानंतरही त्याने आपली दमदार कामगिरी कायम ठेवली आणि अखेर ‘खतरों के खिलाडी 15’च्या विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावे केली.

#AvinashMishra Winning Moment. #KhatronKeKhiladi15 https://t.co/IifzIB4IDz — Khabri 👂 (@real_khabri_1) October 4, 2026

विजयानंतर अविनाश मिश्रा झाला भावुक

विजेता म्हणून नाव जाहीर होताच अविनाश मिश्रा भावुक झाला. या शोमध्ये स्वतःला सिद्ध करण्याच्या उद्देशाने सहभागी झालो होतो, मात्र संपूर्ण प्रवासात स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलो, अशी भावना त्याने व्यक्त केली.

अविनाशसाठी ही ट्रॉफी केवळ एक पुरस्कार नसून स्वतःवरील विश्वासाचं प्रतीक आहे. गेल्या दहा वर्षांत त्याला विविध भूमिकांसाठी नामांकन मिळालं आणि अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये तो सहभागी झाला. मात्र, पहिल्यांदाच एखादा पुरस्कार जिंकता आल्याने ‘खतरों के खिलाडी 15’चं विजेतेपद त्याच्यासाठी विशेष असल्याचं त्याने सांगितलं.

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली

ट्रॉफी जिंकल्यानंतर ईशा सिंहला मारली मिठी

विजेतेपदाची घोषणा होताच अविनाशच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ट्रॉफी हातात घेतल्यानंतर तो प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्याच्या जवळच्या मैत्रीण आणि अभिनेत्री ईशा सिंहकडे धावत गेला.

अविनाशने ईशाला घट्ट मिठी मारली आणि दोघांनीही या खास क्षणाचा आनंद साजरा केला. यावेळी ईशाच्या डोळ्यांतही आनंदाश्रू पाहायला मिळाले.

‘खतरों के खिलाडी 15’च्या प्रवासात अविनाशने केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे, तर एक सक्षम आणि धाडसी स्पर्धक म्हणूनही स्वतःला सिद्ध केलं. जिद्द, आत्मविश्वास आणि दमदार स्टंटच्या जोरावर त्याने इतर स्पर्धकांवर मात करत अखेर सीझनच्या विजेतेपदाचा मान मिळवला.

Asian Academy Creative Awards: ‘सुभेदार’चा डबल धमाका! अनिल कपूर ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता; चित्रपटालाही मोठा पुरस्कार

Web Title: Khatron ke khiladi 15 winner avinash mishra ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • entertainment
  • Reality Show
  • Rohit Shetty

संबंधित बातम्या

Yami Gautam-Aditya Dhar: यामी गौतम-आदित्य धरचा मोठा निर्णय? मुंबई सोडून हिमाचलमध्ये २५ एकरांवरील जुन्या घरात थाटणार संसार
1

Yami Gautam-Aditya Dhar: यामी गौतम-आदित्य धरचा मोठा निर्णय? मुंबई सोडून हिमाचलमध्ये २५ एकरांवरील जुन्या घरात थाटणार संसार

Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन
2

Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन

Reporting Live Trailer: वाळू माफियांचा पर्दाफाश करणार परिणीती चोप्रा; पत्रकाराच्या भूमिकेने वेधलं लक्ष
3

Reporting Live Trailer: वाळू माफियांचा पर्दाफाश करणार परिणीती चोप्रा; पत्रकाराच्या भूमिकेने वेधलं लक्ष

IC 814: विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित सीरिज पाहिलीत का? ६ एपिसोडमध्ये उलगडणार थरारक सत्यकथा
4

IC 814: विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित सीरिज पाहिलीत का? ६ एपिसोडमध्ये उलगडणार थरारक सत्यकथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.