Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन

Love and God: लैला-मजनूच्या प्रेमकथेवर आधारित या चित्रपटाला पूर्ण होण्यासाठी तब्बल २३ वर्षे लागली. गुरु दत्त, के. आसिफ आणि संजीव कुमार यांच्या निधनानंतर अखेर १९८६ मध्ये सिनेमा रिलीज झाला.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 04, 2026 | 02:10 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Love and God:  आजच्या काळात एखादा चित्रपट काही महिन्यांत किंवा एक-दोन वर्षांत तयार होतो. मात्र, पूर्वी चित्रपट निर्मितीला बराच मोठा कालावधी लागत असे. योग्य वेळ, हवामान आणि कलाकारांच्या तारखा यांसाठी निर्मात्यांना अनेकदा प्रतीक्षा करावी लागायची. पण बॉलिवूडमध्ये एक असा चित्रपट आहे, ज्याला पूर्ण होऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल २३ वर्षांचा कालावधी लागला. या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान आणि रिलीजपूर्वी घडलेल्या घटनाही तितक्याच धक्कादायक आहेत. हा चित्रपट म्हणजे ‘लव्ह अँड गॉड’.

१९६३ मध्ये सुरू झालं चित्रपटाचं चित्रीकरण

‘लव्ह अँड गॉड’ हा लैला-मजनूच्या प्रसिद्ध प्रेमकथेवर आधारित चित्रपट होता. या सिनेमाच्या निर्मितीला १९६३ मध्ये सुरुवात झाली. चित्रपटात मजनूची भूमिका साकारण्यासाठी गुरुदत्त यांची निवड करण्यात आली होती.

मात्र, १९६४ मध्ये गुरुदत्त यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर चित्रपटाचं काम रखडलं आणि ‘लव्ह अँड गॉड’ची निर्मिती काही काळासाठी थांबवण्यात आली.

आसिफ यांनी पुन्हा सुरू केलं काम

यानंतर जवळपास सात वर्षांनी म्हणजेच १९७० मध्ये दिग्दर्शक आसिफ यांनी ‘लव्ह अँड गॉड’चं काम पुन्हा सुरू केलं. गुरुदत्त यांच्या जागी त्यांनी अभिनेता संजीव कुमार यांची निवड केली.

मात्र, चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झाल्यानंतर पुन्हा एक मोठा धक्का बसला. मार्च १९७१ मध्ये दिग्दर्शक आसिफ यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा चित्रपटाचं काम बंद पडलं.

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार

१५ वर्षांनी पुन्हा सुरू झाला प्रोजेक्ट

आसिफ यांच्या निधनानंतर त्यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट अपूर्ण राहिला. मात्र, जवळपास १५ वर्षांनंतर त्यांच्या पत्नी अख्तर आसिफ यांनी हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी निर्माते-दिग्दर्शक के.सी. बोकाडिया यांच्यासोबत काम केलं.

अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा चित्रपट पूर्ण झाला आणि १९८६ मध्ये ‘लव्ह अँड गॉड’ सिनेमागृहात प्रदर्शित झाला.

रिलीजच्या आधीच संजीव कुमार यांचं निधन

या चित्रपटाचा प्रवास इथेही संपला नाही. चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यातील मुख्य अभिनेता संजीव कुमार यांचंही निधन झालं. त्यामुळे ज्या कलाकारांसोबत या चित्रपटाची सुरुवात झाली होती, त्यापैकी अनेकांना हा सिनेमा पडद्यावर पाहताच आला नाही.

‘लव्ह अँड गॉड’च्या निर्मितीचा तब्बल २३ वर्षांचा प्रवास त्यामुळे बॉलिवूडच्या इतिहासातील अत्यंत वेगळ्या आणि भावूक चित्रपटप्रवासांपैकी एक मानला जातो. लैला-मजनूची प्रेमकथा पडद्यावर आणण्याच्या या प्रयत्नाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आणि अखेर अनेक वर्षांनी हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला.

‘संताप’ गाणे का ठरतंय Gen Z चा आवाज? विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी अन् एमिनेमची प्रेरणा! रॅपर Vishay Khxl तुफान चर्चा

Web Title: Love and god 23 years guru dutt sanjeev kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • bollywood movies
  • entertainment

संबंधित बातम्या

Reporting Live Trailer: वाळू माफियांचा पर्दाफाश करणार परिणीती चोप्रा; पत्रकाराच्या भूमिकेने वेधलं लक्ष
1

Reporting Live Trailer: वाळू माफियांचा पर्दाफाश करणार परिणीती चोप्रा; पत्रकाराच्या भूमिकेने वेधलं लक्ष

IC 814: विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित सीरिज पाहिलीत का? ६ एपिसोडमध्ये उलगडणार थरारक सत्यकथा
2

IC 814: विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित सीरिज पाहिलीत का? ६ एपिसोडमध्ये उलगडणार थरारक सत्यकथा

HM Cinema: दादरमधील ऐतिहासिक ‘हिंदमाता’चं झालं कायापालट; अंकुश चौधरीच्या हस्ते नव्या थिएटरचं दिमाखदार उद्घाटन
3

HM Cinema: दादरमधील ऐतिहासिक ‘हिंदमाता’चं झालं कायापालट; अंकुश चौधरीच्या हस्ते नव्या थिएटरचं दिमाखदार उद्घाटन

3 Monkeys: अर्जुन रामपालच्या नव्या थ्रिलरची घोषणा; ‘ईठा’सोबत होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर, कधी होणार रिलीज?
4

3 Monkeys: अर्जुन रामपालच्या नव्या थ्रिलरची घोषणा; ‘ईठा’सोबत होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर, कधी होणार रिलीज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.