Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IC 814: विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित सीरिज पाहिलीत का? ६ एपिसोडमध्ये उलगडणार थरारक सत्यकथा

IC 814 The Kandahar Hijack: १९९९ मधील विमान अपहरणाच्या सत्यघटनेवर आधारित ही सहा भागांची थरारक सीरिज Netflix वर उपलब्ध आहे. विजय वर्मासह दिग्गज कलाकारांच्या भूमिका.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 04, 2026 | 12:30 PM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

IC 814:  फ्लायदुबईच्या FZ1073 विमानातील कॉकपिटमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर वैमानिक स्मित मच्छर यांच्या धैर्याची सर्वत्र चर्चा होत आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केले. या घटनेत विमानातील १७४ प्रवासी सुखरूप बचावले. या घटनेला संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी दहशतवादी कृत्य ठरवले असून, याप्रकरणी तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विमान अपहरणाच्या एका सत्यघटनेवर आधारित मिनीसिरीज पुन्हा चर्चेत आली आहे. ‘IC 814: द कंदाहार हायजॅक’ असं या सीरिजचं नाव असून, ती Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

विमान अपहरणाच्या सत्यघटनेवर आधारित ‘IC 814’

‘IC 814: द कंदाहार हायजॅक’ ही १९९९ मध्ये घडलेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित मिनीसिरीज आहे. २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडूहून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या IC 814 विमानाचे पाच सशस्त्र अपहरणकर्त्यांनी अपहरण केले होते. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांसह संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अपहरणकर्त्यांनी विमानाचे मार्ग बदलत अखेर अफगाणिस्तानमधील कंदाहार येथे नेले. भारतीय तुरुंगात कैद असलेल्या दहशतवाद्यांची सुटका करण्याची मागणी अपहरणकर्त्यांनी केली होती. या घटनेदरम्यान प्रवाशांना आणि विमानातील कर्मचाऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. विमान अपहरणाची ही घटना तब्बल सात दिवस चालली होती.

Madhuri Dixit: फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा निकाल लागताच स्टेजवर धुमाकूळ! माधुरींच्या चाहत्याने केला भन्नाट डान्स

सहा भागांत उलगडणार थरारक कहाणी

‘IC 814: द कंदाहार हायजॅक’ ही सहा भागांची मिनीसिरीज असून, विमानातील प्रवाशांचा संघर्ष, वैमानिकांची परिस्थिती आणि भारत सरकारसमोरील राजनैतिक आव्हाने यांचे चित्रण यात करण्यात आले आहे. विमान अपहरणानंतर प्रवाशांची सुटका करण्यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांपासून ते कंदाहारमधील चर्चेपर्यंतच्या घडामोडी मालिकेत पाहायला मिळतात.

ही मालिका कॅप्टन देवी शरण आणि पत्रकार श्रींजय चौधरी यांनी लिहिलेल्या ‘फ्लाइट इनटू फिअर: द कॅप्टन्स स्टोरी’ या पुस्तकावर आधारित आहे. मालिकेत वैमानिकाचे नाव ‘शरण देव’ असे दाखवण्यात आले आहे.


विजय वर्मासह दिग्गज कलाकारांच्या भूमिका

या मिनीसिरीजचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे.सिरीजमध्ये विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, दिया मिर्झा, अरविंद स्वामी यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतात. कलाकारांच्या अभिनयासोबतच विमान अपहरणाच्या घटनेतील तणावपूर्ण प्रसंग आणि सुटकेसाठी सुरू असलेले प्रयत्न मालिकेचा थरार वाढवतात.

Salman Khan On Captain Smit Machhars: पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाला सलमानची दाद! म्हणाला, “कमाल केलंत पायलट साहेब…”

Netflix वर पाहता येणार मिनीसिरीज

‘IC 814: द कंदाहार हायजॅक’ ही मिनीसिरीज २०२४ मध्ये Netflix वर प्रदर्शित झाली होती. विमान अपहरण, सत्यघटनांवर आधारित कथा आणि राजनैतिक घडामोडींमध्ये रस असणाऱ्या प्रेक्षकांना ही मालिका पाहता येईल. सहा भागांमध्ये उलगडणारी ही कथा त्या काळातील एका मोठ्या विमान अपहरणाच्या संकटाची आठवण करून देते.

Web Title: Ic 814 the kandahar hijack netflix true story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • entertainment
  • Netflix
  • Plane Accident

संबंधित बातम्या

HM Cinema: दादरमधील ऐतिहासिक ‘हिंदमाता’चं झालं कायापालट; अंकुश चौधरीच्या हस्ते नव्या थिएटरचं दिमाखदार उद्घाटन
1

HM Cinema: दादरमधील ऐतिहासिक ‘हिंदमाता’चं झालं कायापालट; अंकुश चौधरीच्या हस्ते नव्या थिएटरचं दिमाखदार उद्घाटन

3 Monkeys: अर्जुन रामपालच्या नव्या थ्रिलरची घोषणा; ‘ईठा’सोबत होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर, कधी होणार रिलीज?
2

3 Monkeys: अर्जुन रामपालच्या नव्या थ्रिलरची घोषणा; ‘ईठा’सोबत होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर, कधी होणार रिलीज?

Yami Gautam-Adinath Kothare: पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार यामी-आदिनाथ; अभिनेत्रीने सांगितला कामाचा अनुभव
3

Yami Gautam-Adinath Kothare: पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार यामी-आदिनाथ; अभिनेत्रीने सांगितला कामाचा अनुभव

Rakhi-Mika Singh Kissing Controversy: ‘एकदा किस केलं म्हणजे..”,राखी सोबतच्या किसिंग वादावर मीका सिंहचं मोठं वक्तव्य, म्हणाला..
4

Rakhi-Mika Singh Kissing Controversy: ‘एकदा किस केलं म्हणजे..”,राखी सोबतच्या किसिंग वादावर मीका सिंहचं मोठं वक्तव्य, म्हणाला..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.