Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krishna Chya Leki : ‘ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता सराफ..’, रोहित परशुरामने सांगितली ऑडिशनची खास आठवण

'कृष्णाईच्या लेकी' मालिकेत 'शंकर'ची भूमिका साकारणारा Rohit Parshuram याने ऑडिशनचा प्रवास आणि Nivedita Saraf यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मनोगत व्यक्त केले.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 18, 2026 | 01:54 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

झी मराठीवरील नव्या ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत अभिनेता रोहित परशुराम ‘शंकर’ ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ‘अर्जुन’ या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या रोहितने या नव्या प्रवासाबद्दल आणि मालिकेच्या ऑडिशनमागील आठवणींबद्दल नुकताच खुलासा केला.

रोहित सांगतो, “मी एकदा ‘कमळी’ मालिकेच्या सेटवर आदित्यला भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी दिग्दर्शक अनिकेत साने झी मराठीसाठी नवी मालिका घेऊन येत असल्याचं समजलं. मालिकेच्या ऑडिशन्स सुरू असल्याचं कळताच मी त्यांना भेटलो आणि ऑडिशन दिली. त्यानंतर अनेक टप्प्यांमध्ये ऑडिशन्स आणि सीन वर्क झाले. अखेर माझी निवड झाली आणि झी मराठीच्या कुटुंबात पुन्हा एकदा सहभागी होण्याची संधी मिळाली.”

‘शंकर’ या भूमिकेसाठी तो विशेष मेहनत घेत आहे. कोल्हापुरी भाषेचा लहेजा आत्मसात करण्यापासून ते शारीरिक तयारीपर्यंत अनेक गोष्टींवर तो काम करत आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि स्क्रिप्टचा सखोल अभ्यास यावर त्याचा सध्या भर आहे.

मात्र या मालिकेशी जोडली गेलेली सर्वात खास भावना म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री Nivedita Saraf यांच्यासोबत काम करण्याची संधी. याबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “मला जेव्हा कळलं की निवेदिता ताई या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत, तेव्हा मी मनापासून ही मालिका मिळावी म्हणून प्रार्थना केली. त्यांच्या प्रोजेक्टचा भाग होणं हेच माझ्यासाठी मोठं यश होतं.”

Preity Zinta AI Deepfake Case : एआय-डीपफेक व्हिडिओमुळे प्रीती झिंटा संतप्त, गुगल-मेटावर खटला दाखल करण्यास न्यायालयाची परवानगी

तो पुढे म्हणाला, “आज त्यांच्या सोबत काम करताना माझा आतापर्यंतचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो. त्यांनी गाठलेलं स्थान, त्यांचा अनुभव आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांच्याकडून खूप काही शिकायला मिळणार आहे. त्यांच्या प्रत्येक सीनमधून काहीतरी नवीन शिकण्याची संधी मला मिळेल.”

‘कृष्णाईच्या लेकी’मधील रोहितचा नवा अवतार आणि त्याची भूमिका प्रेक्षकांना कितपत भावते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

60 व्या वर्षी फेसबुकवर सापडलं प्रेम; सुहासिनी मुळे यांनी अवघ्या 75 दिवसांत उरकला लग्नसोहळा, अभिनेत्रीची अनोखी लव्हस्टोरी चर्चेत

झी टीव्हीवरीवरील हिंदी मालिका गंगामाई की बेटियाँ या हिंदी मालिकेचा मराठी रिमेक करण्यात येत आहे. ‘गंगामाई की बेटियाँ ‘ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये शेझान खान, शुभांगी लाटकर आणि इंदिरा कृष्णन यांचा समावेश आहे. या मालिकेने नुकतेच 200 भाग पूर्ण करण्याचा टप्पा गाठला असून तिला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही हिंदी मालिका सध्या टीआरपीमध्ये देखील चर्चेत आहे. या मालिकेच्य़ा मराठीत करण्यात येणाऱ्या रिमेकला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल हे लवकरच कळेल.

Web Title: Krishna chya leki the day i found out nivedita saraf was part of the show rohit parshuram recalls a special audition memory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • Nivedita Saraf

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.