Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krishnavataram Global Release: श्री श्री रविशंकर आणि क्रिएटिव्हलँडची हातमिळवणी; ‘कृष्णावतारम’ ट्रायलॉजी जगभरात पोहोचणार

Krishnavataram Global Release: जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर श्री श्री रविशंकर यांच्या WFAC आणि क्रिएटिव्हलँड स्टुडिओजने ‘कृष्णावतारम’ ट्रायलॉजीसाठी हातमिळवणी केली. ट्रायलॉजी आता जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 07, 2026 | 02:00 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Krishnavataram Global Release:  कृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर भारतीय संस्कृती आणि अध्यात्माच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखालील वर्ल्ड फोरम फॉर आर्ट अँड कल्चर (WFAC), आर्ट ऑफ लिव्हिंग (AOL) आणि डॉ. साजन राज कुरुप यांच्या क्रिएटिव्हलँड स्टुडिओज यांनी ‘कृष्णावतारम’ ट्रायलॉजीसाठी हातमिळवणी केली आहे. या सहकार्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित ही सिनेमॅटिक कथा आता जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

‘कृष्णावतारम: पार्ट 1 – हृदयम’ हा या ट्रायलॉजीचा पहिला भाग आहे. या चित्रपटातून भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील विविध पैलू, त्यांच्या लीला आणि दिव्य प्रवासाचे सिनेमॅटिक सादरीकरण करण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक गज्जर यांनी केले असून निर्मिती साजन राज कुरुप आणि क्रिएटिव्हलँड स्टुडिओजने केली आहे.

सिनेमा ते सांस्कृतिक विश्व; ‘कृष्णावतारम’चा मोठा विस्तार

‘कृष्णावतारम’ केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित न ठेवता त्याभोवती एक व्यापक सांस्कृतिक विश्व उभारण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. यामध्ये सिनेमा, सीरिज, संगीत, लाइव्ह एक्सपिरियन्सेस, गेम्स, शिक्षण आणि इमर्सिव्ह सांस्कृतिक अनुभवांचा समावेश असणार आहे.

ट्रायलॉजीतील पहिला भाग ‘कृष्णावतारम: पार्ट 1 – हृदयम’ ७ मे २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये या चित्रपटाचा जागतिक थिएट्रिकल रिलीज करण्यात आला.

Ashwini Bhave: परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर! कॅलिफोर्नियात अश्विनी भावेंनी घेतलं ढोल वादनाचं प्रशिक्षण

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे मार्गदर्शन

या सहकार्याला गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभणार आहे. चित्रपटाच्या संकल्पनेने प्रभावित झाल्यानंतर त्यांनी क्रिएटिव्हलँडसाठी मार्गदर्शक शक्ती म्हणून पुढे येण्याची भूमिका स्वीकारली आहे. WFAC आणि क्रिएटिव्हलँड यांच्यात सामंजस्य करार अर्थात MOU करण्यात आला असून, ट्रायलॉजीचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी गुरुदेवांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी भगवान श्रीकृष्णांच्या स्वरूपाबद्दल भाष्य करताना त्यांच्या दिव्य आकर्षणाचा आणि ‘लीला’ या संकल्पनेचा उल्लेख केला. त्यांच्या मते, जीवन आणि संपूर्ण विश्व ही एक लीला असल्याची जाणीव झाली की अंतर्मनात कृष्णाचा जन्म होतो.

भारतीय संस्कृती जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न

या सहकार्यामुळे ‘कृष्णावतारम’ला भारतीय प्रेक्षकांसोबतच जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. भारतीय प्रवासी आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना लक्षात घेऊन चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इंग्रजी भाषांमध्ये पोहोचवण्याची तयारी करण्यात आली आहे.

प्रोड्यूसर डॉ. साजन राज कुरुप यांनी या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला. भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि वारसा जगभर पोहोचवणे, तसेच ‘कृष्णावतारम’ला सिनेमा, कला आणि सांस्कृतिक वारशाचा जागतिक उत्सव बनवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Bipasha Basu Comeback: तब्बल ६ वर्षांनी बिपाशा बसुचं कमबॅक; हंसल मेहतांच्या ‘या’ सीरिजमधून OTTवर करणार पुनरागमन

‘वन वर्ल्ड फॅमिली’च्या विचारातून WFACची स्थापना

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ‘वन वर्ल्ड फॅमिली’ अर्थात ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारातून प्रेरणा घेत WFACची स्थापना करण्यात आली आहे. जगभरातील कलाकार, परफॉर्मर्स आणि कला रसिकांना एकत्र आणणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

‘कृष्णावतारम’च्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील अध्यात्म, कला आणि वारसा आधुनिक सिनेमॅटिक माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ ट्रायलॉजी न राहता एका व्यापक सांस्कृतिक चळवळीचे रूप घेणार का, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Krishnavataram global release sri sri ravi shankar creativeland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Colors Marathi: मंगळागौरीच्या उत्सवात जेसिकाची एन्ट्री; छवी-अनिकेतच्या नात्यात येणार नवं वादळ?
1

Colors Marathi: मंगळागौरीच्या उत्सवात जेसिकाची एन्ट्री; छवी-अनिकेतच्या नात्यात येणार नवं वादळ?

Devghar On Rent: अध्यात्माच्या दारात दडलंय कोणतं गूढ? ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक टिझर रिलीज
2

Devghar On Rent: अध्यात्माच्या दारात दडलंय कोणतं गूढ? ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक टिझर रिलीज

Ashwini Bhave: परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर! कॅलिफोर्नियात अश्विनी भावेंनी घेतलं ढोल वादनाचं प्रशिक्षण
3

Ashwini Bhave: परदेशातही मराठी संस्कृतीचा जागर! कॅलिफोर्नियात अश्विनी भावेंनी घेतलं ढोल वादनाचं प्रशिक्षण

Bipasha Basu Comeback: तब्बल ६ वर्षांनी बिपाशा बसुचं कमबॅक; हंसल मेहतांच्या ‘या’ सीरिजमधून OTTवर करणार पुनरागमन
4

Bipasha Basu Comeback: तब्बल ६ वर्षांनी बिपाशा बसुचं कमबॅक; हंसल मेहतांच्या ‘या’ सीरिजमधून OTTवर करणार पुनरागमन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.