Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kriti Sanon: ‘संस्कृती कपड्यांत नाही..’; रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून ट्रोल झाल्यानंतर कृती सेननचं सडेतोड उत्तर

Kriti Sanon: रक्षाबंधनाच्या जाहिरातीतील लूकवरून ट्रोल झाल्यानंतर कृती सेननने महिलांच्या कपड्यांवरून संस्कृती मोजणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने इन्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत रोखठोक उत्तर दिले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 25, 2026 | 03:38 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kriti Sanon:अभिनेत्री कृती सेनन सध्या तिच्या रक्षाबंधनाच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आहे. जाहिरातीतील तिच्या लूकवरून काही नेटकऱ्यांनी टीका करत संस्कृती आणि परंपरांचा दाखला दिला. या ट्रोलिंगला आता कृतीने सडेतोड उत्तर दिलं असून, महिलांच्या कपड्यांवरून त्यांच्या संस्कृतीचा आदर ठरवण्यावरच सवाल उपस्थित केला आहे.

कृतीने रक्षाबंधनाच्या जाहिरातीत आयव्हरी रंगाचा लेहेंगा, डीप-नेक ब्लाउज आणि केप परिधान केला होता. तिचा हा लूक अनेकांना आवडला, तर काही सोशल मीडिया युजर्सनी तो अयोग्य असल्याचं म्हटलं. काहींनी संस्कृती आणि परंपरांचा दाखला देत तिच्यावर टीका केली, तर काहींनी याला ‘वोक अजेंडा’ असंही म्हटलं.

‘संस्कृती कपड्यांमध्ये नसते’

या टीकेला उत्तर देताना कृतीने सोशल मीडियावर आपलं मत मांडलं. “सणांची खरी भावना तुमच्या कपड्यांमध्ये नसते, तर तुम्ही मनापासून जपलेल्या भावना आणि परंपरांमध्ये असते,” असं तिने म्हटलं.

रक्षाबंधन हे केवळ एका विशिष्ट पद्धतीचे कपडे घालण्यापुरतं मर्यादित नसून, हा सण प्रेम आणि संरक्षणाच्या नात्याचा असल्याचंही कृतीने स्पष्ट केलं.

‘माझे कुत्रेही आमच्या कुटुंबाचा भाग’

कृतीने सांगितलं की, ती आणि तिची बहीण एकमेकींना राखी बांधतात. एकमेकींच्या संरक्षणाचं वचन देण्यासोबतच उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्यांचं हे प्रेम त्यांच्या कुत्र्यांपर्यंतही पोहोचतं, कारण तेही त्यांच्या कुटुंबाचा भाग आहेत, असं तिने सांगितलं.

‘महिलांनी काय घालावं हे सांगणं कधी थांबवणार?’

कृतीने आपल्या पोस्टमधून महिलांच्या कपड्यांवरून संस्कृती ठरवण्याच्या मानसिकतेवर थेट प्रश्न उपस्थित केला.

“आपण महिलांना त्यांनी काय घालावे हे सांगणे कधी थांबवणार आहोत?” असा सवाल तिने केला. काळानुसार पारंपरिक फॅशनमध्येही बदल होत गेले आहेत. त्यामुळे एखाद्या महिलेचा संस्कृतीप्रती असलेला आदर केवळ तिच्या कपड्यांवरूनच का मोजला जातो, असा प्रश्न तिने उपस्थित केला.

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Haiwaan Trailer Release: ‘हैवान’च्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारने उडवला थरकाप; सैफ अली खानच्या भूमिकेने वाढवलं गूढ

तिने पुढे स्पष्टपणे सांगितलं की, संस्कृती आणि परंपरा महिलेच्या मनात असतात, तिच्या नेकलाइनमध्ये नाहीत.

कृतीच्या या भूमिकेमुळे चर्चेचा केंद्रबिंदू तिच्या कपड्यांवरून बाजूला होत महिलांच्या कपड्यांवरून त्यांच्या संस्कृती आणि चारित्र्याबद्दल मत बनवण्याच्या मानसिकतेकडे वळला आहे. लैंगिक समानतेसाठी UNFPA ची अॅम्बेसेडर असलेल्या कृतीने आपल्या वक्तव्यातून महिलांच्या निवडीचा आदर करण्याचा महत्त्वाचा संदेश दिला आहे.

गोविंदाच्या मुलाशी लग्न करणार जेमी लिव्हर? सोशल मीडिया चर्चांवर अभिनेत्रीने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली, “तो माझा..”

Web Title: Kriti sanon raksha bandhan ad culture statement trolls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Kriti Sanon

संबंधित बातम्या

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये नवं वळण! बालतुळजा आणि हरीची पहिली भेट; बहीण-भावाच्या नात्याची रंगणार दिव्य लीला
1

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये नवं वळण! बालतुळजा आणि हरीची पहिली भेट; बहीण-भावाच्या नात्याची रंगणार दिव्य लीला

Tujhya Aaila Teaser: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते!’ सुजय डहाके यांच्या ‘तुझ्या आयला’चा टीझर रिलीज;  ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
2

Tujhya Aaila Teaser: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते!’ सुजय डहाके यांच्या ‘तुझ्या आयला’चा टीझर रिलीज; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Haiwaan Trailer Release: ‘हैवान’च्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारने उडवला थरकाप; सैफ अली खानच्या भूमिकेने वाढवलं गूढ
3

Haiwaan Trailer Release: ‘हैवान’च्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारने उडवला थरकाप; सैफ अली खानच्या भूमिकेने वाढवलं गूढ

गोविंदाच्या मुलाशी लग्न करणार जेमी लिव्हर? सोशल मीडिया चर्चांवर अभिनेत्रीने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली, “तो माझा..”
4

गोविंदाच्या मुलाशी लग्न करणार जेमी लिव्हर? सोशल मीडिया चर्चांवर अभिनेत्रीने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाली, “तो माझा..”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.