Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kuku Kohli Died: वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कशी झाली होती अरूणा इराणींबरोबर भेट; Love Story जन्मभर दिली साथ

Kuku Kohli Died: कुकू कोहली आधीच विवाहित होते, त्यामुळे अरुणा ईराणी यांनी त्यांच्यासोबतचं लग्न गुपित ठेवलं. जाणून घ्या त्यांची प्रेमकहाणी.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 26, 2026 | 01:01 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Kuku Kohli Died:  फिल्ममेकर कुकू कोहली यांचे २५ ऑगस्ट रोजी वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासोबतच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आले आहे. कुकू कोहली यांनी अभिनेत्री अरुणा ईराणी यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते आणि लग्न अनेक वर्षे जगापासून लपवून ठेवले होते.

सुमारे दोन वर्षांपूर्वी ‘झूम’ला दिलेल्या एका मुलाखतीत अरुणा ईराणी यांनी कुकू कोहली यांच्यासोबतच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले होते. कुकू यांच्यासोबत जवळीक वाढली, त्यावेळी ते आधीच विवाहित होते. त्यामुळेच दोघांनी आपल्या नात्याबद्दल सार्वजनिकपणे न बोलण्याचा निर्णय घेतला होता.

Exclusive: मीराची सुट्टी अन् गौतमची एंट्री! ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’मध्ये ऑफिसच्या समीकरणांना लागणार नवं वळण

‘कोहराम’च्या सेटवर झाली पहिली भेट

अरुणा ईराणी यांनी सांगितले होते की, कुकू कोहली आणि त्यांची पहिली भेट ‘कोहराम’ चित्रपटाच्या निमित्ताने झाली. त्या काळात अरुणा अनेक चित्रपटांमध्ये काम करत होत्या आणि त्यांच्याकडे कामाचा मोठा व्याप होता. कुकू यांनी त्यांच्याकडे एका महिन्याच्या शूटिंगसाठी डेट्स मागितल्या होत्या. मात्र, व्यस्त वेळापत्रकामुळे काही दिवस काम केल्यानंतर अरुणा यांनी चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या या निर्णयामुळे कुकू नाराज झाले. सुरुवातीला दोघांमध्ये अनेकदा मतभेद होत असत. अरुणा यांनी सांगितले होते की, कधी त्यांच्याकडे काम नसायचे, तरीही कुकू त्यांना दिलेल्या डेट्सनुसार सेटवर बोलवायचे. कधी कधी त्या दिवसभर सेटवर बसून राहायच्या आणि शेवटी त्यांच्याकडून केवळ एक शॉट घेतला जायचा. त्यामुळे त्यांना कुकूंचा खूप राग यायचा.

भांडणातून मैत्री आणि मैत्रीतून प्रेम

सततच्या मतभेदांनंतर मात्र हळूहळू कुकू कोहली यांच्या वागण्यात बदल झाला. ते अरुणांच्या कामाच्या वेळापत्रकानुसार स्वतःचे नियोजन करू लागले. दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि ही मैत्री पुढे प्रेमात बदलली.

अरुणा यांनी सांगितले होते की, सुरुवातीला त्या कुकूंचा तिरस्कार करत होत्या आणि कुकू यांनाही त्यांच्या काही गोष्टींबद्दल नाराजी होती. मात्र, काळ जसजसा पुढे गेला, तसतसे दोघांमधील नाते अधिक घट्ट होत गेले आणि अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

कुकू आधीच विवाहित होते, म्हणून लग्न ठेवलं गुपित

कुकू कोहली आधीच विवाहित असल्याने अरुणा ईराणी यांनी हे नाते सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पहिल्या पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबाला या नात्याची माहिती होती, असेही अरुणा यांनी मुलाखतीत सांगितले होते.

अरुणा यांनी स्पष्ट केले होते की, कुकू यांच्या पहिल्या लग्नाबद्दल त्यांना माहिती नव्हती, अशी चर्चा चुकीची होती. त्यांच्या पहिल्या पत्नी मुलांसह शूटिंगच्या ठिकाणी येत असत आणि अरुणांना त्यांच्या कुटुंबाबद्दल सर्व माहिती होती. परिस्थिती सोपी नसतानाही अखेर दोघांनी लग्न केले.

धाडस असेल तरच एकट्याने पाहा! 8 एपिसोडची ही हॉरर सीरिज देईल अंगावर काटा आणणारा थरार

दोघांनीही मूल न होण्याचा घेतला निर्णय

कुकू कोहली आणि अरुणा ईराणी यांना अपत्य नव्हते. मूल न होण्याचा निर्णय दोघांनीही घेतला होता. अरुणा यांनी याबद्दल बोलताना हा निर्णय योग्य नव्हता, असेही म्हटले होते.

कुकू यांचे आधीच एक कुटुंब असल्यामुळे त्यांनी मूल न करण्याचा निर्णय घेतल्याचे अरुणांनी सांगितले होते. तसेच, आपल्याशी लग्न करण्यासाठी कुकू यांनी संपूर्ण जगाशी संघर्ष केला, असेही त्यांनी नमूद केले होते.

कुकू कोहली यांच्या निधनानंतर त्यांच्या चित्रपटांबरोबरच अरुणा ईराणी यांच्यासोबतची त्यांची ही खास आणि अनेक वर्षे गुप्त राहिलेली प्रेमकहाणी पुन्हा चर्चेत आली आहे.

Web Title: Kuku kohli died aruna irani love story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Bollywood News
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Kedar Shinde on Drishyam 3:  ‘दृश्यम’च्या यशामागे मराठी माणसाचा मोठा वाटा! केदार शिंदेंनी केलं ‘या’ मराठी दिग्दर्शकाचं कौतुक
3

Kedar Shinde on Drishyam 3: ‘दृश्यम’च्या यशामागे मराठी माणसाचा मोठा वाटा! केदार शिंदेंनी केलं ‘या’ मराठी दिग्दर्शकाचं कौतुक

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
4

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.