Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट! Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड

Netflix Top 10 Movies Today: प्रेमकथा, कॉमेडी, थ्रिलर, कोर्टरूम ड्रामा, माहितीपट आणि भावनिक कथा अशा विविध प्रकारच्या सिनेमांचा यात समावेश असल्याने प्रेक्षकांना त्यांच्या आवडीनुसार पर्याय निवडता येतील.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 23, 2026 | 06:19 PM
Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट!

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट!

Follow Us
Follow Us:

वीकेंडला घरी निवांत बसून एखादा चांगला सिनेमा पाहायचा म्हटलं की सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे, नेमकं काय पाहायचं? Netflix वर रोज नवनवीन चित्रपट आणि मालिका येत असल्यामुळे पर्यायांची कमतरता नाही. पण पर्याय जास्त झाले की गोंधळही वाढतो. कोणत्या चित्रपटामध्ये थिर्लेर, रोमॅटींक असले. जो पाहिल्यावर विंकेड परफेक्ट वाटेल. असे चित्रपट पुढीलप्रमाणे,

1. प्यार प्रेमा कल्याणम

या यादीतील पहिल्या क्रमांकावर असलेला ‘प्यार प्रेमा कल्याणम’ नातेसंबंधातील मजेशीर गोंधळ दाखवतो. पावी ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर लग्नानंतरही आपल्या माहेरचं घर सोडायला तयार नसते. त्यामुळे तिचा नवरा इलानही तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतो. दोन कुटुंबं एकाच घरात आली की काय काय घडू शकतं, याची गंमतीदार झलक या कथेत पाहायला मिळते.

2. कॉकटेल 2

शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि कृती सॅनॉन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘कॉकटेल 2’ प्रेमाच्या गुंतागुंतीवर आधारित आहे. कुणाल आणि दिया यांच्या नात्यात एका सहलीनंतर बदल होऊ लागतो. दियाची मैत्रीण अॅली या नात्यात आल्यावर परिस्थिती आणखी बिघडते. प्रेम, गैरसमज आणि नात्यांची परीक्षा यामुळे कथा पुढे सरकते. Netflix Top 10 Movies Today:

3. एल चापोचा सामना

गुन्हेगारी जगतातील कुख्यात नाव असलेल्या एल चापोवर आधारित हा माहितीपट आहे. मेक्सिकोतील सिनालोआ कार्टेलच्या या प्रमुखाचा उदय कसा झाला आणि पुढे त्याचं साम्राज्य कसं कोसळलं, याचा मागोवा यात घेतला आहे. खऱ्या घटनांवर आधारित कथा आवडणाऱ्यांसाठी हा वेगळा अनुभव ठरू शकतो.

4. शेवटचे घर

एका कुटुंबाच्या घराभोवती अचानक विचित्र परिस्थिती निर्माण होते. जेसन, त्याची पत्नी आणि त्यांची दोन मुलं घरातून बाहेर पडू शकत नाहीत. खिडक्या स्वतःहून बंद होतात आणि बाहेरील जगाशी संपर्क तुटतो. त्यानंतर त्यांना समजतं की अशी परिस्थिती फक्त त्यांच्या घरापुरती मर्यादित नाही.

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा

5. Main Vapas Aaunga

इम्तियाज अली यांच्या दिग्दर्शनातील ही भावनिक कथा भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांना जोडते. निर्वैर आपल्या आजोबांच्या धूसर होत चाललेल्या आठवणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या आठवणींमधून त्याला 1947 च्या काळातील एका अपूर्ण प्रेमकथेची माहिती मिळते. जुन्या नात्यांचा आणि कुटुंबाच्या आठवणींचा हा प्रवास भावनिक ठरतो.

6. गट्टा कुस्ती 2

या चित्रपटात पती-पत्नीच्या नात्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. वीरा घर सांभाळत असताना त्याची पत्नी कीर्ती कुस्तीच्या मैदानात आपली ओळख निर्माण करत असते. मुलीच्या संगोपनावरून दोघांमध्ये मतभेद वाढतात. त्यात एक जुना प्रतिस्पर्धीही अडचणी निर्माण करतो. नातं वाचवण्यासाठी वीरा पुन्हा पत्नीच्या पाठीशी उभा राहतो.

7. विश्वास

‘ट्रस्ट’ ही एका माजी बालकलाकाराची थरारक कथा आहे. तिची खासगी माहिती इंटरनेटवर लीक झाल्यानंतर तिचं आयुष्य अचानक चर्चेच्या भोवऱ्यात सापडतं. प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्यासाठी ती एका निर्जन ठिकाणी जाते. मात्र तिथे गेल्यानंतरही परिस्थिती तिची पाठ सोडत नाही.

8. इधयम मुरली

लग्नाच्या उंबरठ्यावर उभा असलेला इधया अचानक अस्वस्थ होतो. आपल्या मनातील जुन्या आठवणी त्याला पुन्हा त्रास देऊ लागतात. शाळा आणि कॉलेजच्या दिवसांत मनात राहिलेलं एकतर्फी प्रेम त्याच्या डोळ्यांसमोर येतं. त्यामुळे हा चित्रपट प्रेमासोबतच जुन्या आठवणींची हळवी बाजू दाखवतो.

Mirzapur Movie New Characters Reveal : ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये रवी किशन यांची एन्ट्री! ‘या’ नव्या पात्रांचे दमदार पोस्टर्स आऊट

9. इक्का

सनी देओलचा ‘इक्का’ हा कोर्टरूम थ्रिलर आहे. अर्जुन मेहरा हा तत्त्वांशी तडजोड न करणारा वकील आहे. मात्र एका श्रीमंत राजकीय कुटुंबातील तरुणावर खुनाचा आरोप झाल्यानंतर त्याच्यासमोर कठीण प्रकरण येतं. सत्य, पैसा आणि न्याय यांच्यातील संघर्ष ही या चित्रपटाची मुख्य बाजू आहे.

10. पेड्डी

राम चरणची प्रमुख भूमिका असलेला ‘पेड्डी’ एका सामान्य कामगाराच्या मोठ्या स्वप्नाची कथा सांगतो. छोट्या गावातून आलेला पेड्डी क्रिकेटमधील आपली क्षमता ओळखतो आणि पुढे मोठ्या स्तरावर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. वैयक्तिक दुःख, व्यवस्थेची उदासीनता आणि गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द या सगळ्यामुळे त्याचा प्रवास खास बनतो.

Netflix वरील ही यादी पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट होते की,सध्या एकाच प्रकारचे सिनेमे नको आहेत. कुणाला प्रेमकथा आवडते, तर कुणाला थरार; काही जणांना खऱ्या घटनांवर आधारित माहितीपट पाहायला आवडतो. त्यामुळे या दहापैकी तुमच्या मूडला कोणता सिनेमा जुळतो, हे ठरवा आणि मग वॉचलिस्ट तयार करा.

Web Title: Making waves on netflix today 10 trending titles ranging from cocktail 2 to paddy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • This week

संबंधित बातम्या

World News : अमेरिकेच्या आखाती किनारपट्टीवर ‘इसायस’ चक्रीवादळाचे संकट; लाखो नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

World News : अमेरिकेच्या आखाती किनारपट्टीवर ‘इसायस’ चक्रीवादळाचे संकट; लाखो नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Saudi Arabia News : रियाध विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला; वैमानिकासह तिघांचा मृत्यू, विमानसेवा विस्कळीत
2

Saudi Arabia News : रियाध विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला; वैमानिकासह तिघांचा मृत्यू, विमानसेवा विस्कळीत

Russia Ukraine War :युक्रेनचा रशियाच्या AI डेटा सेंटरवर ड्रोन हल्ला
3

Russia Ukraine War :युक्रेनचा रशियाच्या AI डेटा सेंटरवर ड्रोन हल्ला

Sangli : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हक्कासाठी सांगलीत एल्गार!; शासनाचा जीआर रखडल्याने संतापाची लाट!
4

Sangli : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हक्कासाठी सांगलीत एल्गार!; शासनाचा जीआर रखडल्याने संतापाची लाट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.