
फोटो सौजन्य सोशल मीडिया
युक्रेनने रशियाची आघाडीची तंत्रज्ञान कंपनी यांडेक्सच्या ( Yandex ) डेटा सेंटरवर ड्रोन हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे . या हल्ल्यांमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) विकसित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संगणकीय परिणाम होण्याची शक्यता आहे .
रशियातील यांडेक्सच्या डेटा सेंटरला गुरुवारी ८ ऑक्टोबर रोजी रियाझान प्रदेशातील सासोवो येथे ड्रोन हल्ल्याचा फटका बसला . या हल्ल्यानंतर केंद्रात आग लागली आणि त्याचे कामकाज पूर्णपणे थांबवावे लागले . त्यानंतर शुक्रवारी ९ ऑक्टोबर रोजी मोस्कोच्या नैऋत्येकडील कालुगा प्रदेशातील यांडेक्सच्या दुसऱ्या डेटा सेंटरवर ड्रोन हल्ला झाला . या हल्ल्यात केंद्रातील काही मॉड्यूल पूर्णपणे बंद पडल्याचे कंपनीने सांगितले . दुसऱ्या हल्ल्यात डेटा सेंटरचे नुकसान झाले असून काही सेवांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे .
सासोवा येथील डेटा सेंटरमध्ये यांडेक्सचे तीनपैकी दोन सुपरकम्प्युटर ठेवण्यात आले आहेत . या अत्याधुनिक संगणकाचा वापर कंपनीच्या AI मॉडेल्सच्या विकासासाठी आणि प्रशिक्षणाची केला जातो . त्यामुळे या केंद्रावरील हल्ला रशियाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी महत्वाचा ठरू शकतो .
हल्ल्यानंतर केंद्रातील उपकरणांचे किती नुकसान झाले आहे . याचा कंपनीकडून आढावा घेतला जात आहे . नुकसान झालेली यंत्रणा पुन्हा कार्यन्वित करता येईल कि नाही , हे अद्याप स्पष्ट झालेले नाही . या हल्ल्यामुळे यांडेक्सच्या काही डिजिटल सेवांवरील परिणाम झाला होता .
Donald Trump यांची नोबेलची इच्छा अधुरीच! भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेचा पुरस्कार जाहीर!
गेल्या काही आठवड्यात रशियाने युक्रेनमधील डेटा सेंटर आणि दूरसंचार पायाभूत सुविधांवर हल्ले केले आहेत . यामुळे युक्रेनमधील इंटरनेट सेवा आणि डिजिटल व्यवस्थेला फटका बसला आहे . युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाच्या हल्ल्यानां प्रतिउत्तर देण्याची भूमिका मांडली आहे .
दोन्ही देशांकडून आता ऊर्जा प्रकल्प ,तेल शुद्धीकरण कारखाने , बंदरे आणि डिजिटल केंद्रांना लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे . यांडेक्सच्या दोन केंद्रावरील हल्ल्यांमुळे या संघर्षात तंत्रज्ञान क्षेत्रात महत्व अधोरेखित झाले आहे . मात्र AI प्रणालींना प्रत्यक्ष किती नुकसान झाले आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम काय असेल , हे अद्याप स्पष्ट झालेले नाही .