(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
ममता कुलकर्णी २५ सप्टेंबर रोजी जयपूरमध्ये आयोजित विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. राजस्थान फिल्म फेस्टिव्हलशी संबंधित या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी काही सल्लेही दिले. याच कार्यक्रमात ममता यांनी त्यांच्या ९०च्या दशकातील लोकप्रिय गाण्यांवर डान्स केला.
‘भंगडा पाले’वर धरला ठेका
ममता कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या ‘करण अर्जुन’ चित्रपटातील ‘भंगडा पाले’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. याशिवाय ‘घातक’ आणि ‘सबसे बड़ा खिलाड़ी’ यांसारख्या चित्रपटांमधील गाण्यांवरही त्यांनी स्टेजवर परफॉर्म केल्याचं समोर आलं आहे. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या डान्समध्ये सहभाग घेतला.
विशेष म्हणजे, काही काळापूर्वीपर्यंत ममता कुलकर्णी भगव्या वस्त्रांमध्ये दिसत होत्या. आता मात्र जयपूरच्या कार्यक्रमात त्या जंपसूटमधील मॉडर्न लूकमध्ये दिसल्या. त्यांच्या या बदललेल्या अंदाजाची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
ममता कुलकर्णींचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी त्यांच्या संन्यासाच्या निर्णयाचा उल्लेख करत प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी त्यांच्या डान्सचं कौतुक केलं. अनेक चाहत्यांना ममतांना पुन्हा त्यांच्या जुन्या गाण्यांवर डान्स करताना पाहून ९०च्या दशकातील त्यांची आठवण झाली.
याआधी जन्माष्टमीच्या एका कार्यक्रमात त्यांच्या ‘करण अर्जुन’मधील गाण्यावर डान्स करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी “ती ममता मरण पावली आहे” असं म्हणत डान्स करण्यास नकार दिल्याचं वृत्त आलं होतं. त्यामुळे आता जयपूरमधील त्यांच्या डान्स व्हिडीओने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे.






