Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

Abhay Jodhpurkar: ‘घरत गणपती’मधील ‘नवसाची गौरी माझी’ गाण्याचे गायक अभय जोधपूरकर यांना बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर श्रेणीत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 23, 2026 | 08:37 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • साची गौरी माझी’ गाण्याच्या गायकाला राष्ट्रीय पुरस्कार
  • ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’लाही राष्ट्रीय पुरस्कार
  • ‘घरत गणपती’च्या गाण्याची राष्ट्रीय पातळीवर दखल;
Abhay Jodhpurkar: मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा मंगळवारी (२२ सप्टेंबर) गुजरातमध्ये पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. या सोहळ्यात ‘घरत गणपती’ चित्रपटातील लोकप्रिय ‘नवसाची गौरी माझी’ या गाण्याचे गायक अभय जोधपूरकर यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

अभय जोधपूरकरला मिळाला रजत कमळ

अभय जोधपूरकर याला बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर या श्रेणीत रजत कमळ हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

काही महिन्यांपूर्वीच ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आता पुरस्कार सोहळ्यात अभय जोधपूरकर यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला आहे. त्यांच्या या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’लाही राष्ट्रीय पुरस्कार

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीला आणखी एक मोठा सन्मान मिळाला आहे. ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

त्यामुळे अभय जोधपूरकर यांचा पुरस्कार आणि ‘मुक्काम पोस्ट बोबिंलवाडी’चा सन्मान यामुळे मराठी सिनेसृष्टीसाठी हा सोहळा खास ठरला.

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

‘नवसाची गौरी माझी’ गाण्याची आजही क्रेझ

‘घरत गणपती’ हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील ‘नवसाची गौरी माझी’ हे गाणं रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. विशेष म्हणजे आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.

गौरी-गणपतीच्या दिवसांमध्ये हे गाणं अनेक ठिकाणी आवर्जून ऐकायला मिळतं. सोशल मीडियावरही या गाण्यावर रील्स बनवण्याचा ट्रेंड पाहायला मिळतो. आता याच लोकप्रिय गाण्याच्या गायकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

‘घरत गणपती’मध्ये दिसली स्टारकास्ट

‘घरत गणपती’ या चित्रपटात निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, शुभांगी लाटकर, राजसी भावे, शुभांगी गोखले, संजय मोने, रुपेश बने आणि समीर खांडेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘नवसाची गौरी माझी’ या गाण्याला मिळालेला राष्ट्रीय सन्मान हा अभय जोधपूरकर यांच्या संगीतप्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Web Title: Abhay jodhpurkar national award navsachi gauri mazi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • National Film Award

संबंधित बातम्या

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी
1

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
2

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
3

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
4

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.