Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bandhu Marathi Movie: भजनाच्या तालावर रंगले ‘बंधू’; उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी घेतले गणरायाचे दर्शन

Bandhu Marathi Movie: ‘बंधू’ चित्रपटातील भावांची जोडी उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी तसेच दिग्दर्शक नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी पुण्यातील भाऊसाहेब रंगारी गणरायाच्या चरणी हजेरी लावत बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 18, 2026 | 09:00 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘बंधू’च्या टीमने घेतले गणरायाचे दर्शन
  • भजनाच्या तालावर रंगली उपेंद्र-जितेंद्रची जोडी
  • गणरायाची आरती करत घेतला बाप्पाचा आशीर्वाद
Bandhu Marathi Movie: गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात आगामी मराठी चित्रपट ‘बंधू’च्या टीमने पुण्यातील प्रसिद्ध भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. येत्या २० नोव्हेंबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी चित्रपटातील भावांची जोडी उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी तसेच दिग्दर्शक नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी गणरायाच्या चरणी हजेरी लावत बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी केली आरती

यावेळी पुनीत बालन यांच्या हस्ते ‘बंधू’च्या टीमचा सन्मान करण्यात आला. गणपती दर्शनासोबतच याठिकाणी सुरू असलेल्या भक्तिमय भजनाचा जितेंद्र जोशी यांनी मनमुराद आनंद घेतला. भजनाच्या तालावर जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लिमये यांची ‘बंधू’ची जोडीही अक्षरशः रंगून गेली.

यानंतर उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी एकत्रितपणे गणरायाची आरती केली. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी चित्रपटासाठी आशीर्वाद घेतला. याप्रसंगी चित्रपटाच्या विशेष पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. त्यामुळे ‘बंधू’च्या प्रदर्शनापूर्वीचा हा भक्तिमय क्षण टीमसाठी आणि उपस्थितांसाठी खास ठरला.

Anant Nag: ‘KGF’मधील या दिग्गज अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; शबाना आझमीपासून रश्मिकापर्यंत गाजवल्या भूमिका

दोन भावांच्या नात्याची भावस्पर्शी कहाणी

रजत बेदी प्रस्तुत जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने ‘बंधू’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केले आहे. दोन भावांमधील अतूट प्रेम, जिव्हाळा आणि नात्याची हळवी, भावस्पर्शी कहाणी ‘बंधू’मधून पाहायला मिळणार आहे.

‘बंधू’ हा मराठी चित्रपट २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांची भावांची जोडी रुपेरी पडद्यावर नेमकी काय जादू दाखवते, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

Ankita Walawalkar On Pregnancy: ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय…’; मातृत्वाबाबत अंकितानं केलं मन मोकळं

Web Title: Bandhu marathi movie upendra limaye jitendra joshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Pallavi Joshi: ‘पल्लवी जोशींना त्यांच्या कर्तृत्वाने ओळखा’; ‘पत्नी’ उल्लेखावर विवेक अग्निहोत्रींची नाराजी
1

Pallavi Joshi: ‘पल्लवी जोशींना त्यांच्या कर्तृत्वाने ओळखा’; ‘पत्नी’ उल्लेखावर विवेक अग्निहोत्रींची नाराजी

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लुक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून कोणते ६ कलाकार करणार डेब्यू?
2

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लुक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून कोणते ६ कलाकार करणार डेब्यू?

Ghamasaan: अरशद वारसींच्या ‘महाराज’ लूकमागचं गुपित काय? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा
3

Ghamasaan: अरशद वारसींच्या ‘महाराज’ लूकमागचं गुपित काय? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा

Friday OTT Release: घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ सिनेमे आणि सीरिज
4

Friday OTT Release: घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ सिनेमे आणि सीरिज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.