Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक नृत्यात माहीर, एक कॉमेडी वीर! भाऊ आणि गौतमीची जोडी ठरणार का हिट? दादा कोंडकेंच्या ‘या’ सुप्रसिद्ध गाण्याचा रिमेक

महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आणि विनोदवीर भाऊ कदम लवकरच दादा कोंडके यांच्या अजरामर 'हिल हिल पोरी हिला' या गाण्याच्या नव्या आवृत्तीत एकत्र झळकणार आहेत. या गाण्याचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 04, 2026 | 03:43 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • लवकरच मराठी सिनेप्रेक्षकांना या गाण्याला ऐकण्याची आणि दोघांची केमिस्ट्री पाहण्याची संधी मिळणार आहे.
  • मराठी तरुण मात्र या गाण्याची विशेष वाट पाहत आहेत.
  • गाण्यासाठी गौतमीचे चाहते विशेष आतुर दिसत आहेत.
मराठी सिनेसृष्टीचा हिरा आणि अष्टपैलू कलावंत दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांनी त्यांच्या सिनेमांच्या माध्यमातून जितकी लोकप्रियता मिळवली, तितकेच अजरामर ठरले त्यांचे गाणे! ‘येणार साजन माझा’, ‘गंगू तारुण्य तुझं बेफाम’ तसेच ‘ढगाला लागली कल’ अशा अनेक गाण्यांवर आजही तरुणाई थिरकते. अशामध्ये दादांचं आणखीन एक गाजलेलं गाणं म्हणजे ‘हिल हिल पोरी हिला’!

कलेक्टर होण्याचं स्वप्न, संघर्षाची साथ, ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये ट्विंकल यादवची दमदार एन्ट्री, अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आणि विनोदवीर भाऊ कदम एकत्र झळकणार असल्याने आधीच मराठी सिनेवेडे आतुर झाले आहेत. अशामध्ये दोघे दादा कोंडकेंच्या गाण्यासाठी एकत्र आले आहेत, हे ऐकून चाहत्यांना चैनच पडेना. होय! गौतमी पाटील आणि भाऊ कदम, दादा कोंडके यांचे अजरामर गीत ‘हिल हिल पोरी हिला’ या गाण्याच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत आणि लवकरच मराठी सिनेप्रेक्षकांना या गाण्याला ऐकण्याची आणि दोघांची केमिस्ट्री पाहण्याची संधी मिळणार आहे.

या गाण्याचे प्रोमो, दोन्ही कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये आपण पाहू शकतो की भाऊ कदम यांनी दादा कोंडके यांच्या सारखे वेष परिधान केले आहे. भाऊ कदम यांना रिक्षाचालक दाखवण्यात आले आहे. तर गौतमी पाटील गावातली सोज्वळ पोर दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गौतमीने परिधान केलेली लाल रंगाची नववारी, तरुणांना विशेष आकर्षित करत आहे, त्यामुळे मराठी तरुण मात्र या गाण्याची विशेष वाट पाहत आहेत.

डॉ. प्रभात यांचे पुनरागमन! ‘ग्राम चिकित्सालय’ सीझन २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; प्राइम व्हिडिओची घोषणा

क्रिएटिव्ह टीम आणि बरंच काही…!

या गाण्याचे दिग्दर्शन पराग सावंत याने केले आहे. गाण्यामध्ये महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील आणि विनोदवीर भाऊ कदम हे स्टारकास्ट झळकणार आहेत. त्याचबरोबर, दादा कोंडके यांचे अजरामर गीत ‘हिल हिल पोरी हिला’ हे गाणं नव्या ढंगात मॉडर्न स्वरूपाने सादर करण्यात आले आहे. गाण्याचे गायन दोन सुप्रसिद्ध मराठी गायक रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांनी केले आहे. गाण्याचे बोल स्मिता कुलकर्णीने तसेच स्वतः गाण्याला संगीतबद्ध करणाऱ्या प्रसाद शिरसाठने केले आहे. गाण्यासाठी गौतमीचे चाहते विशेष आतुर दिसत आहेत. गाणे सारेगम मराठी या Label खाली प्रसिद्ध करण्यात येणार.

Web Title: Gautami patil and bhau kadam new latest marathi song hil hil pori hila

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • dada kondke
  • Gautami patil
  • viral Song

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.