
Gondhal Marathi Movie Team Meets Maharashtra CM Devendra Fadnavis (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि IFTDA चे अध्यक्ष अशोक पंडित यांनी पुढाकार घेत BJP मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घडवून आणली. टीम मुख्यमंत्र्यांना भेटायला गेली तेव्हा त्यांनी एकच विषय मांडला. ऑस्करला जाणं सोप्पी गोष्ट नाही, सिनेमाच्या प्रचारासाठी मोठमोठ्या लोकांपर्यंत सिनेमा पोहोचवण्यासाठी सरकारने आर्थिक मदत, पाठिंबा अशी मागणी चित्रपटाच्या टीमने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. कारण हा प्रश्न एका चित्रपटापुरता नसून संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रश्न आहे,
बरेच लोक विचारत आहेत की हा ‘गोंधळ’ आहे तरी काय? तर हा सिनेमा संतोष दवाखर यांनी लिहिला तसेच त्याला दिग्दर्शित केला असून स्वतःच प्रोड्यूस पण केला आहे. त्यांच्यासोबत दीक्षा दवाखर यांनी निर्मितीमध्ये साथ दिली आहे.
Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवर अनुराग कश्यपांनी व्यक्त …
कथा एकदम आपल्या मातीतली आहे. महाराष्ट्रातला गोंधळ हा प्रकार सगळ्यांना माहीत आहे. त्याच भोवती ही गोष्ट फिरते. सिनेमाची निवड भारताची अधिकृत ऑस्कर एंट्री म्हणून झाली तेव्हापासून सगळीकडे त्याचीच चर्चा आहे.आता पुढचा टप्पा म्हणजे अमेरिकेत या सिनेमाला कसं पोहोचवायचं, तिथल्या ज्युरीपर्यंत कसं न्यायचं, याचं प्लॅनिंग चालू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीला छोटी टीम नव्हती, तर इंडस्ट्रीतली मोठी माणसं होती. FWICE चे सरचिटणीस अशोक दुबे, IFTDA चे निशांत उज्वल होते, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी होत्या. त्याचबरोबर सिनेमातले कलाकार पण होते. किशोर कदम, इशिता देशमुख आणि योगेश सोहनी हे पण या शिष्टमंडळात होते. मुख्यमंत्र्यांनी वेळ काढून सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. त्याबद्दल टीमने त्यांचे आभार पण मानले.
Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड – Navarashtra
मराठीसाठी अभिमानाचा क्षणखरं सांगायचं तर ‘गोंधळ’चा ऑस्करपर्यंत जाणं हे फक्त एका टीमचं यश नाही. हा पूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचा सन्मान आहे. आजपर्यंत कित्येक चांगले मराठी सिनेमा आले, पण ऑस्करच्या दारापर्यंत फार कमी सिनेमे पोहोचले.आता महाराष्ट्राच्या मातीतला हा ‘गोंधळ’ सातासमुद्रापार जाणार आहे. ऑस्करच्या स्टेजवर मराठी भाषेचा, मराठी कलाकारांचा आवाज घुमणार आहे. हीच आपल्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे.