Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaywant Wadkar on Lalbaugcha Raja: ‘आम्ही कोळी लोक विसर्जन करायचो…’;जयवंत वाडकरांची नाराजी, म्हणाले,’बाप्पा श्राप देतायत..’

Jaywant Wadkar on Lalbaugcha Raja: गणेशमूर्ती कोसळण्याच्या घटनांवर जयवंत वाडकरांनी नाराजी व्यक्त केली. ‘गणपती बाप्पा आपल्याला श्राप देत आहेत असं वाटतंय’, असं ते म्हणाले.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 22, 2026 | 11:25 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Jaywant Wadkar on Lalbaugcha Raja:  गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या सणांपैकी एक आहे. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर भक्त मोठ्या श्रद्धेने बाप्पाची पूजा करतात आणि त्यानंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. मात्र, यंदा गणेश विसर्जनादरम्यान काही ठिकाणी गणेशमूर्ती कोसळल्याच्या घटना घडल्या. या घटनांवरून काही गणेश मंडळांवर टीकाही होत आहे. अशातच मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

‘लालबागच्या राजाचं विसर्जन आम्ही कोळी लोक एकत्र करायचो’

जयवंत वाडकर यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत गणेशमूर्ती कोसळण्याच्या घटनांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पूर्वीच्या विसर्जनाची आठवण सांगत सध्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.

ते म्हणाले, “लालबागच्या राजाचं विसर्जन आम्ही कोळी लोक एकत्र करायचो. आता Hydraulic Trolley आल्या आहेत. यावर्षी जवळपास ११ ते १२ माझ्या माहितीतल्या गणेशमूर्ती अपघातांमुळे कोसळल्या आहेत. गणपती बाप्पा आपल्याला श्राप देत आहेत असं वाटतंय. सगळ्यात आधी भुलेश्वरची गणेशमूर्ती कोसळली.”

‘या सगळ्यावर काहीतरी तोडगा काढा’

यंदा घडलेल्या या घटनांवर जयवंत वाडकर यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकारानंतर त्यांचा भाऊही संतापल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच सर्व गणेश मंडळं आणि शासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.

“यावर काहीतरी तोडगा काढा. यामध्ये मधला दुवा काढण्याची गरज आहे,” अशी विनंती त्यांनी केली.

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष

‘आता सगळीकडे राजे झाले आहेत’

गणेश मंडळांमध्ये वाढलेल्या स्पर्धेबाबतही जयवंत वाडकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “पूर्वी लालबागचा राजा हा केवळ एकमेव राजा होता आणि गणेश गल्लीचा. आता सगळीकडे राजे झाले आहेत. छोट्या छोट्या गल्ल्यांमध्येही ‘सोसायटीचा राजा’ असे फलक लावण्यात येतात.”

ही स्पर्धा थांबायला हवी, असंही त्यांनी म्हटलं. “ही स्पर्धा आता बंद झाली पाहिजे, असं वाटतं. ही स्पर्धा जेव्हा बंद होईल, तेव्हा सर्व सुरळीत होईल. गणेशोत्सव आनंद आणि लोकांना एकत्र करण्यासाठी आहे. सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे,” असं जयवंत वाडकर म्हणाले.

गणेशमूर्ती कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जयवंत वाडकर यांनी मांडलेल्या या मताची सध्या चर्चा होत आहे. विसर्जनाची पद्धत, मंडळांमधील वाढती स्पर्धा आणि गणेशोत्सवाचं मूळ स्वरूप याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Moushumi Chatterjee: “बॉयफ्रेंड असेल तर ठीके, पण त्याच्याशीच लग्न करावं असं नाही”; मुलीला लग्नाबाबत अभिनेत्रीचा खास सल्ला

Web Title: Jaywant wadkar on lalbaugcha raja reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor

संबंधित बातम्या

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च
1

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप
2

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप

Moushumi Chatterjee: “बॉयफ्रेंड असेल तर ठीके, पण त्याच्याशीच लग्न करावं असं नाही”; मुलीला लग्नाबाबत अभिनेत्रीचा खास सल्ला
3

Moushumi Chatterjee: “बॉयफ्रेंड असेल तर ठीके, पण त्याच्याशीच लग्न करावं असं नाही”; मुलीला लग्नाबाबत अभिनेत्रीचा खास सल्ला

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’च्या म्युझिक लॉन्चसाठी रॉयल ऑपेरा हाऊसचीच निवड; शर्वरीने सांगितलं खास कारण
4

Yeh Prem Mol Liya: ‘ये प्रेम मोल लिया’च्या म्युझिक लॉन्चसाठी रॉयल ऑपेरा हाऊसचीच निवड; शर्वरीने सांगितलं खास कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.