Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पडद्यापलीकडचं प्रेम! ‘तिघी’ने जिंकली प्रेक्षकांची मने; नागपूरमध्ये खास शो आयोजित करण्यासाठी आवाहन

नागपूरमधील सुखदा चौधरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढाकार घेत 'तिघी'चा खास शो आयोजित करण्यासाठी किमान शंभर प्रेक्षक एकत्र आणण्याचं आवाहन केलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 28, 2026 | 01:58 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांचा ‘तिघी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रेम मिळत आहे. हा चित्रपट तीन आई-मुलींच्या नात्यांभोवती फिरतो आणि त्यांच्या भावविश्व, संघर्ष, स्वत्व शोध आणि एकमेकांशी असलेला अदृश्य बंध दाखवतो. त्यात आयुष्यातील छोटे भावनिक क्षण खूप प्रभावीपणे सादर केले आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट खूप भावतो.नात्यांच्या गुंतागुंतीतून उलगडणारी आई- मुलींची भावनिक कथा आणि वास्तववादी मांडणी यामुळे ‘तिघी’ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. स्त्रीमनाचा सूक्ष्म वेध घेत, आयुष्यातील छोट्या-छोट्या भावनिक क्षणांना प्रभावीपणे मांडणारा हा चित्रपट अनेकांना आपलासा वाटत आहे.

दरम्यान, काही प्रेक्षकांचा हा चित्रपट पाहायचा राहून गेल्याने नागपूरमध्ये एक वेगळीच चळवळ सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे. नागपूरमधील सुखदा चौधरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढाकार घेत ‘तिघी’चा खास शो आयोजित करण्यासाठी किमान शंभर प्रेक्षक एकत्र आणण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक जण या उपक्रमात सहभागी होत आहेत. एका प्रेक्षकाने घेतलेला हा पुढाकार सध्या चर्चेचा विषय ठरत असून आशयप्रधान चित्रपटांसाठी प्रेक्षक स्वतः पुढे येत असल्याचं हे महत्त्वाचं उदाहरण मानलं जात आहे.

परीक्षेत Dhurandhar, आदित्य धरच्या चित्रपटातील पात्रे अकाउंट्सच्या पेपरात, विद्यार्थ्यांना विचारले पात्रांवर आधारित प्रश्न

दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणाल्या, ” आम्ही ‘तिघी’ हा चित्रपट प्रामाणिकपणे प्रेक्षकांसमोर आणला. परंतु आज प्रेक्षक स्वतः पुढे येऊन शो आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहेत, ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि भावनिक गोष्ट आहे. ‘तिघी’ महाराष्ट्रभर पोहोचतोय आणि प्रेक्षकांना तो पाहायची तीव्र इच्छा आहे, यावरूनच खूप काही स्पष्ट होतंय.”

सध्या ‘तिघी’ला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळत असून नागपूरमध्येही हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळावा, अशी मागणी प्रेक्षक करत आहेत. त्यामुळे आता ‘तिघी’ हा केवळ एक चित्रपट राहिलेला नाही… तर तो प्रेक्षकांच्या प्रेमातून घडत असलेला एक क्षण बनला आहे.

 यूट्यूबर ध्रुव राठीने पुन्हा एकदा ‘ Dhurandhar 2’ वर साधला निशाणा, निवडणूक आयोगालाही विचारला मोठा सवाल

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केले असून निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस निर्माते आहेत. या चित्रपटात भारती आचरेकर, नेहा पेंडसे -बायस आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Love beyond the screen tighi movie wins audience hearts call for a special show in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • Nagpur

संबंधित बातम्या

Nagpur Crime: फ्रॅक्चरनंतर रुग्णालयात भरती; मात्र लोको पायलटने उचललं टोकाचं पाऊल; रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ!
1

Nagpur Crime: फ्रॅक्चरनंतर रुग्णालयात भरती; मात्र लोको पायलटने उचललं टोकाचं पाऊल; रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ!

सुपस्टार क्रिकेटरच्या बहिणीची ग्लॅमर दुनियेत एन्ट्री, रिअ‍ॅलिटी शोमधून करणार करिअरची सुरुवात
2

सुपस्टार क्रिकेटरच्या बहिणीची ग्लॅमर दुनियेत एन्ट्री, रिअ‍ॅलिटी शोमधून करणार करिअरची सुरुवात

‘गल्ली नं. १३’चे पोस्टर लाँच; तरुणाई, प्रेम आणि समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा नवा मराठी चित्रपट
3

‘गल्ली नं. १३’चे पोस्टर लाँच; तरुणाई, प्रेम आणि समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा नवा मराठी चित्रपट

80 च्या दशकातील ट्रेनमध्ये शूट केलेला सुपरहिट TV शो, 15 एपिसोड्सने TRP चे सर्व रेकॉर्ड तोडले!
4

80 च्या दशकातील ट्रेनमध्ये शूट केलेला सुपरहिट TV शो, 15 एपिसोड्सने TRP चे सर्व रेकॉर्ड तोडले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.