Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गल्ली नं. १३’चे पोस्टर लाँच; तरुणाई, प्रेम आणि समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा नवा मराठी चित्रपट

‘गल्ली नं. १३’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये नवी कथा उलघडणार असून, हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 27, 2026 | 03:52 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘गल्ली नं. १३’चे पोस्टर लाँच
  • समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा नवा चित्रपट
  • ‘गल्ली नं. १३’चे स्टारकास्ट
 

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच आशयप्रधान आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या कथांची परंपरा राहिली आहे. याच परंपरेला पुढे नेत आता ‘गल्ली नं. १३’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचे शीर्षक जितके वेगळे आणि कुतूहल निर्माण करणारे आहे, तितकाच त्याचा आशयही वेगळा असणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

या पोस्टर लाँच सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. चित्रपटाशी संबंधित कलाकार, निर्माते आणि तांत्रिक टीमसोबतच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनीही हजेरी लावली होती. ‘गल्ली नं. १३’ची निर्मिती आरबी सिनेमॅटिक्सने पिकल एन्टरटेन्मेंटच्या सहकार्याने केली असून, रामनाथ बोडके आणि राजश्री बडगुजर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. विशेष म्हणजे, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असलेले रामनाथ बोडके यांची ही पहिलीच चित्रपट निर्मिती असून, त्यामुळे या प्रकल्पाकडे अधिक उत्सुकतेने पाहिले जात आहे.

Dhurandhar 2: लपून- छपून यामी गौतमने पाहिला 3 तास 49 मिनिटांचा ‘हा’ चित्रपट; नक्की काय आहे कारण?

चित्रपटाचे दिग्दर्शन, पटकथा आणि संवादलेखन महेंद्र रामभाऊ बोरकर यांनी केले आहे. मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये लेखनाचा मोठा अनुभव असलेल्या बोरकर यांनी या चित्रपटातून एक वेगळी कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या साहित्यिक कार्यालाही मोठी दाद मिळाली असून, ‘ब्युटिफाईंग रिलेशन्स’ या पुस्तकासाठी त्यांना गोल्डन बुक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनातून साकार होणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरण्याची शक्यता आहे.

चित्रपटाच्या पोस्टरनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टरमध्ये नायक पाठमोरा उभा असून, त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक गूढता दिसून येते. स्टायलिश जॅकेट परिधान केलेल्या या नायकाच्या मागे वीज पडल्यासारखा इफेक्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे तो दुभंगल्यासारखा भासतो. शहराच्या पार्श्वभूमीवर साकारलेले हे पोस्टर चित्रपटाच्या कथेबद्दल कोणतीही थेट कल्पना देत नसले, तरी त्यातून एक वेगळा आणि थरारक अनुभव मिळणार असल्याचे संकेत मिळतात.

‘गल्ली नं. १३’ ही कथा मुख्यतः तरुणाईभोवती फिरणारी असली, तरी त्यात कुटुंबव्यवस्था, सामाजिक बदल आणि आधुनिक जीवनशैलीतील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा असेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. कुटुंब, प्रेम, संस्कृती, स्वप्न आणि मानवी नात्यांमधील गुंतागुंत या सगळ्यांचा सुंदर मिलाफ या कथेत पाहायला मिळणार आहे.

Ram Charan चा ‘पेड्डी पहलवान’ अवतार चर्चेत; क्रिकेटपासून कुस्तीपर्यंतचा दमदार प्रवास प्रेक्षकांना घालणार भुरळ

दिग्दर्शक महेंद्र बोरकर यांच्या मते, हा चित्रपट आजच्या जेन झी पिढीपासून ते ज्येष्ठ प्रेक्षकांपर्यंत सर्वांना भावेल. प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाच्या आठवणी जाग्या करणारा, तसेच नात्यांची वेगवेगळी रूपं दाखवणारा हा सिनेमा असेल. प्रेक्षकांना कधी हसवणारा, तर कधी भावूक करणारा असा हा एक परिपूर्ण मनोरंजनाचा पॅकेज ठरणार आहे.

चित्रपटाची कथा डॉ. एस. डी. पाटील यांनी लिहिली असून, संगीतकार रोहित नागभिडे या चित्रपटातील गीतांना सुरेल संगीत देणार आहेत. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी प्रज्ञा पाटील सांभाळणार असून, एपीएच स्टुडिओकडे पोस्ट-प्रॉडक्शनची धुरा सोपवण्यात आली आहे. सध्या चित्रपटासाठी कलाकारांची निवड प्रक्रिया सुरू असून, लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. ‘गल्ली नं. १३’ हा चित्रपट आपल्या वेगळ्या शीर्षक, आशयघन कथा आणि ताकदीच्या टीममुळे आधीपासूनच चर्चेत आला आहे. आता पोस्टरनंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या असून, हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

Web Title: Galli no 13 marathi movie poster launch first look details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन
1

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
2

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
3

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा
4

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.