
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Dia Mirza on Nawazuddin Siddiqui: बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा सध्या तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला थेट टॅग करत त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. या पोस्टमध्ये दियाने नवाजुद्दीनच्या सेटवरील वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या या वक्तव्यामुळे मनोरंजन विश्वात चर्चांना उधाण आले आहे.
दिया मिर्झाने अलीकडेच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने अभिनेत्याच्या बोलण्याच्या पद्धतीवर आणि अॅटिट्यूडवर नाराजी व्यक्त केली आहे.
दियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच त्रासदायक होता. त्याची बोलण्याची पद्धत अजिबात चांगली नाही आणि अॅटिट्यूडची तर वेगळीच लेव्हल आहे. अत्यंत आक्षेपार्ह व्यक्तिमत्त्व.”
दियाने केलेल्या या वक्तव्यामुळे नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वागणुकीबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
(फोटो सौजन्य- दिया मिर्झा)
दियाच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
दिया मिर्झाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी नवाजुद्दीन सिद्दीकीची बाजू घेत तो चांगला व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी ही पोस्ट एखाद्या आगामी चित्रपट किंवा वेब सीरिजच्या प्रमोशनचा भाग असू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.
मात्र, या पोस्टमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच दियाच्या वक्तव्यावर नवाजुद्दीन सिद्दीकीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दिया मिर्झाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, ती अलीकडे ‘ऑपरेशन सफेद सागर’मध्ये झळकली होती. तसेच ‘इक्का’ या चित्रपटात तिने सनी देओल आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत भूमिका साकारली आहे. सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अशातच नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.